अंकगणित
बीड जिल्हा पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 9 एप्रिल 2017
————————————————–
1 ते 70 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
71. 9 + 9 x 9 – 9 ÷ 9 ची किंमत काढा.
1) 89
2) 79
3) 161
4) 81
72. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळविले तर 171 हे उत्तर येते. तर मुळ संख्या कोणती ?
1) 8
2) 9
3) 10
4) 7
73. 3636 बिस्किटमध्ये प्रत्येकी 18 बिस्किटांचा एक पुडा असे किती पुडे तयार करता येतील ?
1) 22
2) 202
3) 220
4) 222
74. 64² – 36² = ?
1) 2400
2) 2500
3) 2600
4) 2800
75. 6355 या संख्येला 13 ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी ?
1) 0
2) 3
3) 2
4) 1
76. 7*6*8 या पाच अंकी संख्येस 11 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असेल ?
1) 8
2) 5
3) 6
4) 7
77. एका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे 10-10 चे गट पाडले तर 2 उरतात 11-11चे गट केले तर 8 उरतात 12-12 चे गट केले तर 4 उरतात 13-13 चे गट केले तर एकही उरत नाही तर कमीत कमी विद्यार्थी किती असतील ?
1) 50
2) 51
3) 52
4) 53
78. सरळरुप दया. 1/2 ÷ 1/2 + 1/2 x 1/2 – 1/2 = ?
1) 1
2) 0
3) 3/4
4) -1/4
79. √49/√16 = ?
1) 4/3
2) 9/16
3) 7/4
4) 16/9
80. एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत ?
1) 43
2) 33
3) 37
4) 47
81. सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?
1) 81
2) 82
3) 75
4) 78
82. गणेश त्याच्या बहिणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज 29 वर्ष होती तर गणेशचे आजचे वय काय आहे ?
1) 17 वर्ष
2) 12 वर्ष
3) 22 वर्ष
4) 24 वर्ष
83. 60 चे 40% म्हणजे किती ?
1) 20
2) 24
3) 15
4) 240
84. एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. संख्येतील अंकांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या 18 ने वाढते तर दिलेली संख्या कोणती ?
1) 36
2) 42
3) 24
4) 63
85. अमरचे आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती ?
1) 16
2) 18
3) 24
4) 12
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्टमध्ये दिले आहेत.
उत्तरे
71 – 1, 72 – 2, 73 – 2, 74 – 4, 75 – 3, 76 – 2,
77 – 3, 78 – 3, 79 – 3, 80 – 2, 81 – 4, 82 – 3,
83 – 2, 84 – 3, 85 – 3