जागतिक वारसा स्थळे
World Heritage Sites
1. जागतिक वारसा स्थळांना मान्यता युनेस्कोमार्फत देण्यात येते.
2. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.
3. जगामध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे चीन व इटली या देशात आहेत. या दोन देशांमध्ये प्रत्येकी 55 जागतिक वारसा स्थळे आहेत.
4. जागतिक वारसा स्थळांमध्ये दुसरा क्रमांक स्पेन ( 48 ), तिसरा क्रमांक जर्मनी ( 46 ), व चौथा क्रमांक फ्रान्स ( 45 ) या देशाचा लागतो.
5. महाराष्ट्रामध्ये सहा जागतिक वारसा स्थळे आहेत. ( ऑक्टोंबर 2022 पर्यंत ).
6. भारतामध्ये एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत. ( ऑक्टोंबर 2022 पर्यंत ).
7. भारतामध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्र या राज्यात आहेत.
8. भारतातील जागतिक वारसा स्थळांची विभागणी तीन प्रकारांमध्ये केली जाते –
अ. सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे – 32 आहेत.
ब. नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे – 7 आहेत.
क. मिश्र जागतिक वारसा स्थळे – 1 आहे.
9. ऑक्टोंबर 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक राज्यातील जागतिक वारसा स्थळांची संख्या –
महाराष्ट्र – 6
राजस्थान – 4
गुजरात – 4
तमिळनाडू – 4
उत्तर प्रदेश – 3
दिल्ली – 3
मध्य प्रदेश – 3
कर्नाटक – 2
आसाम – 2
बिहार – 2
पश्चिम बंगाल – 2
हिमाचल प्रदेश – 2
गोवा – 2
ओरिसा – 1
सिक्किम – 1
चंढीगड – 1
उत्तराखंड – 1
तेलंगणा – 1
केरळ – 1
महाराष्ट्र राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. अजिंठा लेणी – 1983
2. वेरूळची लेणी ( एलोरा लेणी ) – 1983
3. एलिफंटा लेणी ( घारापुरी लेणी ) – 1987
4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ( CSMT ) मुंबई – 2004
5. पश्चिम घाट ( पाच राज्यातील ) / सह्याद्री पर्वत – 2012
6. मुंबईमधील चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील ब्रिटिश काळातील व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील इमारती – 2018
राजस्थान राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. केवलादेव – घाणा पक्षी राष्ट्रीय उद्यान – 1985
2. जंतरमंतर, जयपूर – 2010
3. राजस्थान मधील डोंगरी किल्ले ( एकूण सहा ) – 2013
अ. जैसलमेर किल्ला
ब. रणथंबोर किल्ला
क. चित्तोडगड किल्ला
ड. आहेर किल्ला
इ. कुंभलगड किल्ला
ई. गागरोन किल्ला
4. जयपुर शहर – 2019
गुजरात राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. चंपानेर पावागढ पुरातत्व उद्यान – 2004
2. राणी की बाव – 2014
3. अहमदाबाद ऐतिहासिक शहर – 2017
4. हडप्पा संस्कृतीमधील नगर ढोलावीरा – 2021
मध्य प्रदेश राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. खजुराहो स्मारक समूह – 1986
2. सांची स्तूप – 1989
3. भीमबेटका गुंफा – 2003
उत्तर प्रदेश राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. आग्रा किल्ला – 1983
2. ताजमहल – 1983
3. फत्तेपूर सिक्री – 1986
दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. कुतुब मिनार – 1993
2. हुमायूनचा मकबरा – 1993
3. लाल किल्ला – 2007
तमिळनाडू राज्यातील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. महाबलीपुरम स्मारक समूह – 1984
2. महाचोल मंदिर समूह ( तीन मंदिर ) – 1987
अ. बृहदेश्वर मंदिर, तंजावर
ब. बृहदेश्वर मंदिर, गंगाईकोंडाचोलापुरम
क. ऐरातेश्वर मंदिर – दारासुरम
3. निलगिरी पर्वतीय रेल्वे – 2005
4. पश्चिम घाट – 2012
कर्नाटकमधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. हम्पी स्मारकांच्या समूह – 1986
2. पट्टदकलमधील मंदिरे– कर्नाटक – 1987
3. पश्चिम घाट – 2012
बिहारमधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. महाबोधी मंदिर परिसर, बोधगया – 2002
2. नालंदा विश्वविद्यालय (महाविहार) – 2016
आसाममधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान – 1985
2. मानस वन्यजीव अभयारण्य – 1985
पश्चिम बंगालमधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान – 1987
2. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे – 1999
हिमाचल प्रदेशमधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. कालका – शिमला रेल्वे – 2008
2. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान – 2014
केरळमधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. पश्चिम घाट – 2012
तेलंगणामधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. काकतीय रामप्पा मंदिर / काकतीय रुद्रेश्वरा मंदिर – 2021
उत्तराखंड मधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – 1988 व 2005
चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. चंदीगड शहर / ली कोर्बुजिए यांचे स्थापत्य कार्य – 2016
सिक्कीममधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान – 2016 ( मिश्र प्रकारातील जागतिक वारसा स्थळ आहे. )
ओरिसामधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. कोणार्क सूर्य मंदिर – 1984
गोव्यामधील जागतिक वारसा स्थळांची यादी :
1. गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट – 1986
नैसर्गिक विभागातील जागतिक वारसा स्थळं
1. काझिरंगा नॅशनल पार्क
2. केवलागदेव – घाना नॅशनल पार्क
3. मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी
4. नंदा देवी नॅशनल पार्क व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
5. सुंदरबन नॅशनल पार्क
6. पश्चिम घाट– महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यातील.
7. ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेली भारतातील पर्वतीय रेल्वे :
1. दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे – 1999
2. निलगिरी पर्वतीय रेल्वे – 2005
3. कालका – शिमला रेल्वे – 2008