तांत्रिक प्रश्न 40 Arogya Sevak Question Paper 2015 Part 3

तांत्रिक प्रश्न 40
Arogya Sevak Question Paper 2015 Part 3
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2015 भाग 3
———————————————————————-
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

61. त्वचेला काळा रंग कशामुळे येतो ?
(A) अनास्थेशिया (B) मेलॅनीन (C) पेनिसिलीन (D) व्हेगस
62. मानसाच्या शरीरात ——— गुणसुत्रे असतात ?
(A) 46               (B) 23        (C) 33            (D) 12
63. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण प्रति १०० मि.ली. रक्तात किती असते ?
(A) 14 ग्रॅम       (B) 16 ग्रॅम   (C) 10 ग्रॅम     (D) 20 ग्रॅम
64. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता आहे ?
(A) इंद्रिय     (B) उती        (C) अवयव संस्था (D) पेशी
65. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे ?
(A) कॅलोरीमिटर                (B) मॅग्नोमिटर
(C) स्फिग्मोमॅनोमिटर         (D) स्पेक्ट्रोमॅनोमिटर
66. कोणत्या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते ?
(A) काचबिंदू                    (B) निकदृष्टिता
(C) मोतीबिंदू                    (D) रातांधळेपणा
67. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो ?
(A) मायकोबॅक्टेरिअम      (B) प्लास्झोडीअम
(C) मॅनिंगोकोकस            (D) यापैकी नाही
68. ‘मायकोबॅक्टेरिअम’ या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो ?
(A) क्षय   (B) एडस्   (C) हिवताप   (D) यापैकी नाही
69. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते ?
(A) कॅन्सर (B) एडस्  (C) पोलिओ  (D) मलेरिया
70. टायफॉईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात ?
(A) स्वल्पविराम                       (B) दंडाकृती
(C) त्रिकोणी                            (D) यापैकी नाही
71. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ कोणत्या साली सुरू झाली ?
(A) 1970   (B) 1972   (C) 1975   (D) 1978
72. जीवनसत्व ‘अ’ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमा अंतर्गत ६ वर्षाखालील मुला-मुलींना दर ………… महिन्याला ‘अ’ जीवनसत्वाचा डोस दिला जातो ?
(A) 3 महिने (B) 6 महिने (C) 12 महिने (D) 18 महिने
73. डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते ?
(A) 20 ते 25%                           (B) 25 ते 30%
(C) 30 ते 30%                           (D) 45 ते 50%
74. पालेभाज्यात जीवनसत्व ……… हे कॅरोटिन या द्रव्याच्या स्वरूपात असते ?
(A) ब           (B) अ           (C) क               (D) ड
75. सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते ?
(A) पेरू        (B) लिंबू        (C) आवळा        (D) टोमॅटो
76 कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते ?
(A) हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी
(B) रक्त गोठण्यासाठी
(C) त्वचा चांगली राहण्याकरिता
(D) 1 व 2 बरोबर
77. लोहाच्या कमतरतेमुळे ……… हा रोग होतो ?
(A) गलगंड (B) कॅन्सर (C) रक्तक्षय (D) मलेरिया
78. भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे ?
(A) हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश
(B) महाराष्ट्र व कर्नाटक
(C) काश्मिर व आसाम   (D) गुजरात व मध्य प्रदेश
79. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
(A) मुडदूस                   (B) रातआंधळेपणा
(C) क्षय                        (D) मलेरिया
80. खरूज हा ………. चा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो ?
(A) केसाचा                  (B) त्वचेचा
(C) फुफ्फुसाचा             (D) यापैकी नाही
81. डिपीटी या त्रिगुणी लीसमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही ?
(A) घटसर्प  (B) डांग्या खोकला (C) हगवण (D) धनुर्वात
82. ब्लीचींग पावडर कशासाठी वापरतात ?
(A) दुर्गंधीनाशक म्हणून
(B) पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
(C) मलमुत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
(D) वरील सर्व बरोबर
83. जगातून कोणत्या रोगाचे १००% निर्मूलन झाले आहे ?
(A) मलेरिया      (B) प्लेग      (C) देवी      (D) कॉलरा
84. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला ?
(A) चीन           (B) जपान   (C) भारत     (D) अमेरिका
85. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते ?
(A) 1885       (B) 1990   (C) 1991    (D) 1995
86. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे ?
(A) 1950      (B) 1952   (C) 1955    (D) 1956
87. ‘डॉटस्’ हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे ?
(A) कुष्ठरोग    (B) एडस्    (C) क्षयरोग   (D) मलेरिया
88. भारताची पहिली महिला डॉक्टर कोण ?
(A) ईरावती कर्वे.               (B) डॉ. आनंदीबाई जोशी
(C) डॉ.आनंदीबाई देशपांडे (D) डॉ. आनंदीबाई पटवर्धन
89. राष्ट्रीय एडस् संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
(A) कोलकाता   (B) मुंबई   (C) बंगळुरू   (D) पुणे
90. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
(A) जीवनसत्वे (B) आयोडीन (C) कर्बोदके (D) इन्सुलीन
91. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
(A) पहिला      (B) दुसरा       (C) तिसरा    (D) चौथा
92. शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते ?
(A) पहिली ते चौथी           (B) तिसरी ते पाचवी
(C) पाचवी ते सातवी         (D) सातवी ते दहावी
93. कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते ?
(A) आरएच+   (B) ओ                (C) बी   (D) ए
94. मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते ?
(A) 3             (B) 5                   (C) 7    (D) 8
95. ‘जागतिक एडस् निर्मूलन दिन’ म्हणून कोणता दिन पाळला जातो ?
(A) 1 नोव्हेंबर                     (B) 1 जानेवारी
(C) 1 डिसेंबर                      (D) 1 ऑगस्ट
96. रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो ?
(A) मांजर     (B) कुत्रा     (C) म्हैस     (D) लांडगा
97. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते ?
(A) 10        (B) 12       (C) 7         (D) 9
98. दूरदर्शन पाहतांना ……. ते…….. फुट असे अंतर असावे ?
(A) 3 ते 5 फुट                    (B) 6 ते 7 फुट
(C) 10 ते 12 फुट               (D) 8 ते 9 फुट
99. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली ?
(A) 1945    (B) 1948    (C) 1950    (D) 1956
100. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला ?
(A) आईनस्टाईन.               (B) कार्ल बेंझ
(C) कार्ल लँड स्टायनर        (D) लुई पाश्चर

उत्तरे
61-B, 62-A, 63-A, 64-D, 65-C,66-C, 67-B, 68-A, 69-C, 70-B, 71-C, 72-B, 73-A, 74-B, 75-C, 76-D,77-C, 78-C, 79-B, 80- B, 81- C, 82-D, 83-C,  84-C, 85-C, 86-C, 87-C, 88-B, 89-D, 90-B, 91-B, 92-A, 93-B, 94-B, 95- C, 96- B, 97-D, 98-B, 99-B, 100-C