बुध्दिमत्ता चाचणी Reasoning
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14
औरंगाबाद पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017
—————————————————————–
1 ते 50 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
51. सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास 13 व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल ?
1) सिंह
2) उंट
3) घोडा
4) जिराफ
52. आर्याचा रांगेत पुढून दहावा व मागून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
1) 17
2) 16
3) 15
4) 14
53. एका बागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिकू, पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावाल्यास 34 व्या स्थानी कोणते झाड येईल ?
1) आंबा
2) पपई
3) पेरु
4) यापैकी नाही
54. निकितीचा जन्म 10 सप्टेंबर 1990 ला सोमवारी झाला, तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी साजरा झाला ?
1) मंगळवार
2) बुधवार
3) गुरुवार
4) शुक्रवार
55. 4 मार्चला शुक्रवार होता तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले होते ?
1) सोमवार, मंगळधार
2) बुधवार, गुरूवार, रविवार
3) शुक्रवार, सोमवार, रविवार
4) यापैकी नाही
56. 7 एप्रिलला गुरूवार आहे तर 15 ऑगस्टचा वार कोणता ?
1) रविवार
2) सोमवार
3) मंगळवार
4) बुधवार
57. खालीलपैकी बरोबर तारीख कोणती ?
1) 31/04/1996
2) 31/09/1994
3) 29/02/1902
4) 29/02/1992
58. राजेंद्रच्या शाळेला 5 मे पासुन सुट्टी लागली व 12 जूनला त्याची शाळा सुरू झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती ?
1) 37
2) 38
3) 39
4) 40
59. 8 सप्टेंबरला बुधवार आहे तर सप्टेंबर महिण्यात 5 वेळा येणारे वार कोणते ?
1) मंगळवार, बुधवार
2) बुधवार, गुरूवार
3) बुधवार, गुरूवार , शुक्रवार
4) गुरूवार, शुक्रवार
60. 1 रिम कागदापैकी 1 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील ?
1) 24
2) 30
3) 28
4) 26
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
51 – 1, 52 – 2, 53 – 4, 54 – 1, 55 – 4,
56 – 2, 57 – 4, 58 – 2, 59 – 2, 60 – 3.