भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न पुरस्कार

 1. भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
 2. हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष कार्यासाठी दिला जातो. 2011 पासून सर्व क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो.
 3. क्रीडा क्षेत्रातील फक्त सचिन तेंडुलकरलाच भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
 4. भारतरत्न पुरस्कार मिळणारी सर्वात तरुण व्यक्ती सचिन तेंडुलकर आहे. 
 5. महर्षी धोंडो केशव कर्वे भारतरत्न पुरस्कार मिळणारे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत.
 6. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 4 जानेवारी 1954 रोजी झाली.
 7. 1955 मध्ये भारतरत्न(मरणोत्तर) पुरस्कार देण्याची सुरुवात झाली.
 8. 1977 साली जनता पक्ष सरकारने भारतरत्न पुरस्कारावर बंदी आणली होती, पण 1980 साली काँग्रेस सरकारने हा पुरस्कार देण्यास परत सुरुवात केली.
 9. भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप :

अ. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला रोख रक्कम दिली जात नाही.

ब. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला भारत सरकार मार्फत मानपत्र व सन्मानचिन्ह दिले जाते.

क. एका प्लॅटिनमच्या धातूवर पिंपळाच्या पानावर भारतरत्न असे देवनागरी लिपीत लिहिलेले सन्मानचिन्ह असते. पिंपळाच्या पानावर चमकता सूर्य सुद्धा असतो.

 1. फेब्रुवारी 2024 पर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 2. भारताबाहेरील दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. 

अ. खान अब्दुल गफार खान (1987)

ब. नेल्सन मंडेला (1990)

 1. 1954 साली सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. वी. रमण व चक्रवर्ती राजगोपालचारी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.
 2. फेब्रुवारी 2024 पर्यंत 19 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार वापस घेण्यात आला म्हणून आता ही संख्या 18 आहे.
 3. भारतरत्न पुरस्कार सर्वात शेवटी 2024 साली कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पि. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला.
 4. एका वर्षी जास्तीत जास्त तीनच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो, परंतु 2024 मध्ये एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 1999 मध्ये चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
 5. भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान थेट भारताच्या राष्ट्रपतींना करतात.
 6. इतर अनेक पुरस्कारांप्रमाणे भारतरत्न पुरस्काराला औपचारिक शिफारसींची आवश्यकता नाही.

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी :

 1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1954)
 2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1954)
 3. डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण (1954)
 4. डॉ. भगवान दास (1955)
 5. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (1955)
 6. पंडित जवाहरलाल नेहरू (1955)
 7. गोविंद वल्लभ पंत (1957)
 8. महर्षी धोंडो केशव कर्वे (1958)
 9. बिधान चंद्र रॉय (1961)
 10. पुरषोत्तम दास टंडन (1961)
 11. डॉ. राजेंद्र प्रसाद (1962)
 12. डॉ. झाकिर हुसैन (1963)
 13. डॉ. पांडुरंग वामन काणे (1963)
 14. लाल बहादुर शास्त्री (मरणोत्तर) (1966)
 15. इंदिरा गांधी (1971)
 16. वराहगिरी व्यंकट गिरी (1975)
 17. कुमारस्वामी कामराज (मरणोत्तर) (1976)
 18. मदर मेरी बोयाजियु (मदर तेरेसा) (1980)
 19. आचार्य विनोभा भावे (1983)
 20. खान अब्दुल गफ्फार खान (1987)
 21. मारुदुर गोपालन रामचंद्रन (मरणोत्तर) (1988)
 22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) (मरणोत्तर) (1990)
 1. डॉ. नेल्सन खोलिशासा मंडेला (1990)
 2. राजीव गांधी (मरणोत्तर) (1991)
 3. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1991)
 4. मोरारजी रणछोडजी देसाई (1991)
 1. मौलाना ब्दुल कलाम आझाद (मरणोत्तर) (1992)
 2. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (1992)
 3. सत्यजीत रे (1992)
 4. गुलजारी लाल नंदा (1997)
 5. अरुणा आसफ अली (मरणोत्तर) (1997)
 6. डॉ. आवुल पाकिर जैनुलआबदीन अब्दुल कलाम (एपीजे अब्दुल कलाम) (1997)
 1. मदुरै षणमुखवडिवू सुब्बुलक्ष्मी (1998)
 2. चिदंबरम सुब्रहमण्यम (1998)
 3. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1999)
 4. अमर्त्य सेन (1999)
 5. गोपीनाथ बरदोलोई (मरणोत्तर) (1999)
 6. पंडित रवी शंकर (1999)
 7. लता मंगेशकर (2001)
 8. उस्ताद बिस्मिल्लाह खां (2001)
 9. पंडित भीमसेन गुरुराज जोशी (2008)
 10. चिंतामणी नागेश रामचंद्र राव (2014)
 11. सचिन रमेश तेंडुलकर (2014)
 12. पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) (2015)
 13. अटल बिहारी वाजपेयी (2015)
 14. नानाजी देशमुख (मरणोत्तर) (2019)
 15. भूपेंद्र कुमार हजारिका (मरणोत्तर) (2019)
 16. प्रणब मुखर्जी (2019)
 17. कर्पूरी ठाकूर (मरणोत्तर) (2024)
 18. लालकृष्ण अडवाणी (2024)
 19. पी. व्ही. नरसिंहराव (मरणोत्तर) (2024)
 20. चौधरी चरण सिंह (मरणोत्तर) (2024)
 21. एम. एस. स्वामीनाथन (मरणोत्तर) (2024)