मराठी भाषेतील वर्णमाला भाग 2 स्वरादी

स्वरादी

स्वरादी : ज्या वर्णांचा उच्चार करायच्या अगोदर स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वरादी : ज्या वर्णाच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात.
मराठी वर्णमालेमध्ये स्वरादींचा समावेश मो. के. दामले यांनी केला.
अनुस्वार ( अं ) आणि विसर्ग ( अ: ) हे दोन वर्ण स्वरादी आहेत.

अनुस्वार : स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. उदा. अं

विसर्ग : विसर्ग या शब्दाचा अर्थ श्वास सोडणे असा आहे. विसर्गाचा उच्चार करताना श्वास बाहेर सोडला जातो. विसर्ग या वर्णाचा उच्चार ह् या व्यंजनाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा करतात. उदा. अ: