रोग व रोगांचे प्रकार
जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची त्रिमितीय व्याख्या.
” रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक मानसिक व सामाजिक रित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होईल “
अधिशयन काळ ( Incubation period ) :
” रोग जंतू शरीरात शिरल्यापासून ते रोगाची लक्षणे दिसू लागेपर्यंतच्या काळालाच अधिशयन काळ असे म्हणतात “
रोगाची व्याख्या ( definition of disease ) :
1) शरीराची किंवा मनाची रोगट अवस्था म्हणजे रोग होय.
2) आरोग्यपूर्ण अवस्थेपासून दूर गेलेली शरीराची अवस्था म्हणजे रोग होय.
3) रोग म्हणजे शरीरक्रियात्मक किंवा मानसिकरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारे स्थिती होय.
रोगाची लक्षणे ( Symptoms of diseases ) :
1) रोगाची लक्षणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजारी किंवा अस्वस्थ करणारे शरीरातील बदल होय.
2) वेगवेगळ्या रोगांची लक्षणे वेगवेगळी असतात.
3) काही रोगांची लक्षणे सारखी असू असतात.
4) रोगाच्या लक्षणांवरून शरीरात एखादा आजार झालेला आहे हे कळते परंतु नेमका कोणता आजार झाला आहे, हे कळत नाही.
5) रोगांची प्रमुख लक्षणे : ताप येणे, डोके दुखणे, भूक न लागणे, पोट दुखणे.
रोगाची चिन्हे ( Signs of diseases ) :
1) रोगांच्या लक्षणांच्या आधारे डॉक्टर रोग्यांमध्ये जे काही पाहतात त्यांना चिन्हे असे म्हणतात.
2) रोगाच्या चिन्हांवरून नेमका कोणता आजार झाला आहे हे कळते.
3) शरीरातील ज्या अवयवाला आजार झालेला आहे त्या अवयवाशी संबंधित रोगाची चिन्हे असतात.
उदा. यकृताचा दाह झाला की डोळे पिवळे पडतात.
उदा. फुफ्फुसाचा दाह झाला की खोकला येतो.
4) प्रत्येक रोगाची चिन्हे निश्चित ठरलेले असतात.
5) वेगवेगळ्या रोगांची चिन्हे वेगवेगळी असतात.
रोगांचे प्रकार ( Types of diseases ) :
* रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार
1) विषाणूजन्य आजार
2) जीवाणूजन्य आजार
3) आदिजीवजन्य आजार
4) कवके ( Fungus ) व कृमी ( Worms ) यांच्यामुळे होणारे आजार
* संक्रामक रोगांचे प्रकार ( Types of infectious diseases ) :
1) संसर्गजन्य रोग ( Communicable Diseases )
2) संपर्कज्यन्य रोग ( Contagious Diseases )
3) साथीचे आजार
* असंक्रामक रोग ( Non Infectious Diseases )
* कालावधीनुसार रोगांचे प्रकार
1) जुनाट रोग ( Chronic Diseases )
2) तीव्र रोग ( Acute Diseases )
* प्रसारानुसार रोगांचे प्रकार :
1) सर्वदेशिक रोग ( Pandemic diseases )
2) प्रदेशनिष्ठ रोग ( Endemic Diseases )
3) व्यापक रोग ( Epidemic Diseases )
* असंक्रामक रोग ( Non Infectious Diseases )
1) जे रोग शरीरातील अंतर्गत व असंक्रामक कारणामुळे होतात त्यांना असंक्रामक रोग असे म्हणतात.
2) जे आजार रोगजंतूंमुळे होत नाहीत त्यांना सुद्धा असंक्रामक रोग असे म्हणतात.
उदा. मधुमेह, रातांधळेपणा, कर्करोग, संधिवात, सर्व अनुवंशिक आजार
संक्रामक रोग : जे अजार रोग जंतूमुळे होतात त्यांनाच संक्रामक रोग असे म्हणतात.
* संक्रामक रोगांचे तीन प्रकार ( Types of infectious diseases ) :
1) संसर्गजन्य रोग ( Communicable Diseases )
2) संपर्कज्यन्य रोग ( Contagious Diseases )
3) साथीचे आजार
संसर्गजन्य रोग ( Communicable Diseases ) : आजारी व्यक्तीमधील रोगजंतूंचा हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास त्यालाच संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदा. क्षय रोग, इन्फ्युएंझा
संपर्कज्यन्य रोग ( Contagious Diseases ) :
आजारी व्यक्तीमधील रोगजंतूंचा स्पर्शावाटे निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास त्यालाच संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदा. कुष्ठरोग, गजकर्ण, खरुज, नायटा, इसब
साथीचे आजार : जे आजार दूषित पाण्यामुळे किंवा हवामानातील विशिष्ट बदलामुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना होतात त्यांनाच साथीचे रोग असे म्हणतात.
उदा. कॉलरा, हगवण, डोळे येणे, इन्फ्युएंझा, विषमज्वर
प्रसारानुसार रोगांचे प्रकार :
1) सार्वदेशिक रोग ( Pandemic diseases )
2) प्रदेशनिष्ठ रोग ( Endemic Diseases )
3) व्यापक रोग ( Epidemic Diseases )
सार्वदेशिक रोग ( Pandemic diseases ) : जे आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेले असतात त्यांनाच सार्वदेशिक रोग असे म्हणतात.
उदा. कोरोना, कर्करोग, एड्स, मधुमेह
प्रदेशनिष्ठ रोग ( Endemic Diseases ) : जे आजार विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात त्यांनाच प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात.
उदा. केरळ मधील अल्लापुझा, कोट्टायम व एर्नाकुलम या तीन जिल्ह्यांमध्ये हत्तीपाय ( फायलेरिआसिस ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे.
व्यापक रोग ( Epidemic Diseases ) : जे आजार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्यांनाच व्यापक आजार असे म्हणतात.
उदा. कॉलरा, टायफाईड, क्षयरोग
कालावधीनुसार रोगांचे प्रकार
1) जुनाट रोग ( Chronic Diseases )
2) तीव्र रोग ( Acute Diseases )
जुनाट रोग ( Chronic Diseases ) : जे रोग संपूर्ण आयुष्यभर बरे होत नाहीत किंवा बराच काळ शरीरामध्ये राहतात त्यांनाच जुनाट रोग असे म्हणतात.
उदा. मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा, क्षयरोग, एड्स
तीव्र रोग ( Acute Diseases ) : जे आजार मानवी शरीरामध्ये खूप कमी कालावधीसाठी राहतात त्यांनाच तीव्र रोग असे म्हणतात.
उदा. कोरोना, स्वाईन फ्लू, इबोला, कॉलरा.