4 April 2022 CURRENT AFFAIRS IN MARATHI

4 एप्रिल 2022 च्या चालू घडामोडी

Current Affairs in Marathi

1. “वरुन युद्धाभ्यास 2022” हा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान झाला ?
A. भारत व फ्रान्स
B. भारत व जपान
C. भारत व ऑस्ट्रेलिया
D. भारत व अमेरिका
विशेष माहिती :
अ. 30 मार्च ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत वरुन युद्धाभ्यास 2022 झाला.
ब. वरुन युद्धाभ्यास अरबी समुद्रामध्ये आयोजित केला होता.
क. सन 1993 पासून भारत व फ्रान्स या दोन देशांदरम्यान नौसेना युद्धाभ्यास आयोजित केला जातो.
ड. सन 2000 पासून भारत व फ्रान्स यांच्या दरम्यानच्या नौसेना युध्दाभ्यासाला वरुन हे नाव देण्यात आले.

2. कारागृहातील कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सर्वप्रथम महाराष्ट्रातील कोणत्या काराग्रहामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे ?
A. आर्थर रोड कारागृह
B. येरवडा कारागृह
C. नाशिक कारागृह
D. नागपूर कारागृह
विशेष माहिती :
अ. कारागृहातील कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्याने सुरु केली.
ब. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मदतीने कैद्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
क. कैद्यांना 50,000 रुपये कर्ज मिळेल.
ड. व्याजाचा दर 7 % असेल.

3. सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
A. मध्य प्रदेश
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. उत्तराखंड
विशेष माहिती :
अ. हा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात आले.
ब. 1958 मध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला.
क. 1978 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला.
ड. 1982 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.

4. IQ Air 2021 ने जाहीर केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्ट नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ?
A. लंडन
B. पॅरीस
C. बीजिंग
D. नवी दिल्ली
विशेष माहिती :
अ. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे.
ब. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.
क. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा व स्वतःचे उच्च न्यायालय आहे.
ड. इंडिया गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, भारताची संसद, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथेच आहे.

5. वन संशोधन संस्थेच्या संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
A. रेणू सिंह
B. संजना बत्रा
C. सुशीला शर्मा
D. पुजा जात्यात
विशेष माहिती :
अ. वन संशोधन संस्था उत्तराखंडमधील देहराडून या ठिकाणी आहे.
ब. या संस्थेला deemed University चा दर्जा आहे.
क. 1878 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे.
ड. या संस्थेला 1991 मध्ये deemed University चा दर्जा मिळाला.
इ. वन संशोधन संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका सविता सिंह होत्या, त्यानंतर दुसऱ्या संचालिका रेणू सिंह आहेत.

6. गोवा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. भगवंत सिंह मान
B. प्रमोद सावंत
C. विश्वजीत राणे
D. दिगंबर कामत
विशेष माहिती :
अ. गोवा या राज्याची निर्मिती 30 मे 1987 या दिवशी झाली.
ब. 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
क. गोवा या राज्याची राजधानी पणजी आहे.
ड. गोवा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आहे.
इ. गोवा या राज्याला लागून महाराष्ट्र व कर्नाटक हे दोन राज्य आहेत.
ई. गोवा हे  क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
के. गोवा या लोकसभेच्या दोन जागा आहेत राज्यसभेची एक जागा आहे व विधानसभेच्या 40 जागा आहेत.

7. भारतीय वायुसेनेने कोणत्या भारतीय महारत्न कंपनी सोबत इंधन भरण्यासाठी Fleet Card Fuel On Money ही योजना सुरू केली ?
A. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई
B. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई
C. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली
D. वरील सर्व
विशेष माहिती :
अ. भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी झाली.
ब. भारतीय वायुसेनेचे मुख्यालय नवी दिल्ली आहे.
क. दरवर्षीच 8 ऑक्टोंबर हा वायू सेना दिवस म्हणून साजरा केला जातो.
ड. विवेक राम चौधरी सध्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत.

8. स्टॉकहोम जल पुरस्कार 2022 राष्ट्रवादी हा पुरस्कार पुढील पैकी कोणाला मिळाला आहे ?
A. गेब्रिएल बोरीक
B. कार्लोस अल्वाराडो
C. गिल्बर्ट एफ होंगबो
D. विल्फ्रेड ब्रुट्सर्ट
विशेष माहिती :
अ. हा पुरस्कार स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारा दिला जातो. स्थापना – 1991, स्वीडन.
ब. या पुरस्काराला पाण्याचा नोबेल पुरस्कार असेसुद्धा म्हणतात.
क. हा पुरस्कार दरवर्षी आंतरराष्ट्रीय जल दिन 22 मार्च या दिवशी दिला जातो.

9. विनय समरस्य योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे ?
A. कर्नाटक
B. तेलंगणा
C. आंध्र प्रदेश
D. छत्तीसगड
विशेष माहिती :
अ. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ब. तीन वर्षाचा दलित मुलगा विनय याच्या नावावरून या योजनेला नाव दिले आहे.
क. कर्नाटकची राजधानी बेंगलोर आहे.
ड. 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हैसूर राज्याची स्थापना झाली व 1973 मध्ये म्हैसूर राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.

10. भारतातील सर्व माजी पंतप्रधानांचे संग्रहालय कोणत्या शहरांमध्ये बनवण्यात आले आहे ?
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. कोलकाता
D. चेन्नई

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. भगवंत सिंह मान
B. प्रकाश बादल
C. कॅप्टन अमरिंदरसिंग
D. चरनजीत सिंग

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B