आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका भाग 2 Arogya Sevak Question Paper

मराठी व्याकरण
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका भाग 2
आरोग्य विभाग आरोग्य कर्मचारी (४० टक्के).                        परिक्षा दिनांक – 08 / 01 / 2017
———————————————————————–
१ ते २५ पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

२६. शरीर या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही ?
A) देह            B) तनुज     C) काया        D) कायापूर
२७. प्रशंसा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
A) निंदा         B) असूया    C) शाबासकी  D) शिक्षा
२८. खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
A) मुली फुले वेचतात         B) मुले मैदानावर खेळतात
C) आजीने गोष्ट सांगितली  D) मुलांनी गृहपाठ लिहिला
२९. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
A) २५ वर्षे- रौप्य महोत्सव     B) ५० वर्षे- सुवर्ण महोत्सव
C) १०० वर्षे- शतक महोत्सव D) ६५ वर्षे- हीरक महोत्सव
३०. मला जवळच जायचे होते या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा.
A) मला जवळ जायचे होते B) मला दूर जायचे नव्हेत
C) मला दूर जायचे होते      D) मला जायचे होते
३१. कंठस्नान घालणे – या वाकप्रचाराचा अर्थ ओळखा.
A) आंघोळ घालणे
B) कंठापर्यंत नदीत उभे राहत स्नान
C) ठार मारणे        D) नामस्मरणाने स्नान घालणे
३२. चुकीची जोडी शोधा.
A) श्यामची आई – सानेगुरुजी
B) कन्हेचे पाणी – आचार्य अत्रे
C) स्वामी – रणजीत देसाई
D) गीताई –  लोकमान्य टिळक
33. पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचा अर्थ काय तो निवडा ?  ना च ल य वा
A) नृत्यालय  B) संचालनालय C) ग्रंथालय D) देवालय
३४. हर्ष्याच्या कानात वारे शिरले या वाक्यांतील प्रयोग ओळखा.
A) सकर्मक भावे B) अकर्मक भावे C) कर्तरी D) कर्मणी
३५. संकटग्रस्त या शब्दाचा समास ओळखा.
A) चतुर्थी विभक्ती तत्पुरुष  B) षष्ठी विभक्ती तत्पुरुष
C) तृतीया विभक्ती तत्पुरुष D) पंचमी विभक्ती तत्पुरुष
३६. शहाणा या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
A) मोठेपण B) शहाणपण C) देवपण D) यापैकी नाही
३७. अशोक आंबा खातो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
A) सकर्मक  B) अकर्मक  C) संयुक्त  D) सहायक
३८. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील सामान्य सर्वनाम कोणते ?
A) हसू    B) कोणास    C) कोणी    D) यापैकी नाही
३९. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
A) विक्षीप्त  B) वीक्षिप्त   C) वीक्षीप्त   D) विक्षिप्त
४०. अशुद्ध शब्द ओळखा.
A) धर्मादाय  B) निष्क्रीय   C) तात्कानिक   D) दिलगिरी
४१. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच ?
A) कार्बन     B) क्लोरीन   C) हायड्रोजन   D) ऑक्सिजन
४२. मलेरिया ——— मुळे होतो.
A) सारकॉप्टीस स्केबी      B) मायकोबॅक्टोरीयम लेप्री
C) स्वल्पविरामी जीवाण   D) प्लाझमोडीयम
४३. कुंजर या अर्थाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.
A) गर्दभ     B) अश्व      C) गज      D) श्वान
४४. अरण्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A) कुरण    B) विपीन   C) वनश्री   D) रान
४५. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे ?
A) कृष्णाजी केशव दामले    B) ग.दी. माडगूळकर
C) त्र्यंबक बापूजी ठोंबरे       D) रामगणेश गडकरी
४६. विकास या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.
A) -हास     B) भरभराट     C)धाड     D) उत्कर्ष
४७. आपण छान बोलतात. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
A) प्रथम पुरुषवाचक      B) द्वितीय पुरुषवाचक
C) तृतीय पुरुषवाचक     D) अनिश्चित सर्वनाम
४८. वाड्.निश्चय या शब्दाचा संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा.
A) वाक + निश्चय            B) वाक् + निश्चय
C) वाकः + निश्चय           D) वाग् + निश्चय
४९. खालील शब्दातील अयोग्य शब्द ओळखा.
A) कर्ता     B) कर्म     C) संप्रदान     D) कारण
५०. देवा सर्वांना सुखी ठेव. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
A) स्वार्थ   B) आज्ञार्थ C) विध्यर्थ     D) संकेतार्थ

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे
26 – B, 27 – A, 28 – B, 29 – D, 30 – B, 31 – C,
32 – D, 33 – C, 34 – C, 35 – C, 36 – B, 37 – A,
38 – C, 39 – D, 40 – B, 41 – C, 42 – D, 43 – C,
44 – B, 45 – C, 46 – A, 47 – B, 48 – B, 49 – D,
50 – B