सामान्य ज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी Arogya Sevak Question Paper 2015 Part 2 आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2015 भाग 2

सामान्य ज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी
Arogya Sevak Question Paper 2015 Part 2
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2015 भाग 2
———————————————————————-
1 ते 30 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

31. एकविसाव्या शतकात मनुष्याला अधिक कार्यक्षम व गतीमान बनविण्यात कोणाचा वाटा मोठा आहे ?
(A) टि.व्ही.   (B) रेडीओ   (C) संगणक   (D) विमान
32. राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात ?
(A) राष्ट्रपतीचे                     (B) लोकसभेचे
(C) राज्याचे                        (D) मुख्यमंत्र्याचे
33. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधिश कोण ?
(A) विजयालक्ष्मी पंडीत      (B) सुजाता मनोहर
(C) फातिमा बिबी               (D) मिराकुमार
34. राज्यपालाला खालीलपैकी कोण शपथ देतो ?
(A) राष्ट्रपती                       (B) उपराष्ट्रपती
(C) सरन्यायाधीश (D) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
35. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कारकिर्दीनुसार योग्य क्रम लावा.
(1) शंकरराव चव्हाण         (2) मारोतराव कन्नमवार
(3) वसंतराव नाईक           (4) यशवंतराव चव्हाण
(A) 2,1,3,4                     (B) 3,1,2,4
(C) 1,3,4,2                     (D) 4,2,3,1
36. ‘सार्क’ म्हणजे काय ?
(A) सात दक्षिण आशियाई राष्ट्रांची सहकारी संघटना
(B) प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना
(C) हिंदी महासागरात सापडणारा मोठा मासा
(D) दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक औद्योगिक वसाहत
37. 26 जानेवारी हा दिवस भारतात ——– म्हणून साजरा केला जातो.
(A) स्वातंत्र्य दिन                          (B) प्रजासत्ताक दिन
(C) शिक्षक दिन                            (D) महाराष्ट्र दिन
38. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते आहेत ?
(A) पंडित जवाहरलाल नेहरू          (B) सरदार पटेल
(C) डॉ. राजेंद्र प्रसाद                      (D) यापैकी नाही
39. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासीत प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य पाठविले जातात ?
(A) दिल्ली                             (B) दमन व दीव
(C) दादरा व नगर हवेली          (D) चंदीगड
40. सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागतो ?
(A) पृथ्वी       (B) गुरू       (C) मंगळ    (D) शुक्र
41. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
(A) 8 एप्रिल  (B) 13 मार्च  (C) 18 मे  (D) 8 मार्च
42. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी होतो ?
(A) पंढरपूर   (B) शेगांव   (C) शिर्डी   (D) नाशिक
43. औरंगाबाद जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
(A) औटरमघाट               (B) म्हैसमाळ
(C) जायकवाडी              (D) वैराट
44. कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(A) अकोला (B) चंद्रपूर (C) गडचिरोली (D) अमरावती
45. एका रेखावृत्तास सूर्यासमोरून जाण्यास किती मिनीटे लागतात ?
(A) 10 मिनीटे                       (B) 15 मिनीटे
(C) 4 मिनीटे                         (D) 6 मिनीटे
46. जॉनचा जन्म 1980 साली झाला व डेव्हिडचा जन्म 1940 साली झाला, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(A) जॉनचे वय डेव्हिडच्या दुप्पट आहे
(B) डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट आहे
(C) डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे
(D) 2000 साली डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट होईल
47. अ) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला. ब) परवा सोमवार आहे. पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे ?
(A) काल गुरूवार होता       (B) बुधवारी पाऊस पडला
(C) उद्या पाऊस पडेल        (D) गुरूवारी पाऊस पडला
48. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ? A, C, F, J, 0, ?
(A) U         (B) V         (C) T         (D) W
49. रमेशला प्रत्येक 30 मिनीटास 1 गोळी याप्रमाणे 6 गोळ्या संपवण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल ?
(A) 180    (B) 120    (C) 150     (D) 145
50. अहमदनगरमधील मदनलाल हिराचंद बालचंद यांच्या जैन वस्त्र भांडारमधील 20 मीटर सुती कापडाच्या ताग्याचे प्रत्येकी एक मीटर असे 20 तुकडे करण्यासाठी किती काप घ्यावे लागतील ?
(A) 19     (B) 18       (C) 20       (D) 21
51. रामरावने एक सायकल 1250 रूपयाला खरेदी केली. तिच्या दुरूस्तीसाठी 150 रूपये खर्च आला. त्याने ती सायकल किती रूपयांना विकावी म्हणजे त्याला 8 टक्के नफा होईल ?
(A) 1500 रूपये              (B) 1600 रूपये
(C) 1620 रूपये              (D) 1564 रूपये
52. दोन चौरस कोणत्याही बाजूने जोडल्यास निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल ?
(A) आयत                       (B) चौरस
(C) समभूजचौकोन          (D) पतंग
53. 8 मजूर 4 दिवसात 1600 रूपये कमवतात तर 12 मजूर 3 दिवसात किती रूपये कमावतील ?
(A) 1200 रूपये            (B) 1700 रुपये
(C) 1800 रूपये.           (D) 1500 रुपये
54. द.सा.द.शे. 6 दराने 2500 रू.ची 5 वर्षानी किती रूपये रास होईल ?
(A) 150 रूपये              (B) 700 रूपये
(C) 750 रूपये              (D) 3250 रूपये
55. 1 ते 100 या संख्यापैकी 9 ने नि:शेष भाग जाणाऱ्या संख्या किती ?
(A) 8       (B) 9       (C) 10       (D) 11
56. एका वर्गामध्ये मुलांची जेवढी संख्या आहे त्याच्या दीडपट संख्या मुलींची आहे जर वर्गात एकूण 150 विद्यार्थी संख्या असेल तर मुलांची संख्या किती ?
(A) 100  (B) 45    (C) 60      (D) 90
57. खालीलपैकी सम संख्या आणि विषम संख्या यांची वजाबाकी किती येईल ?
21, 26, 34, 43, 48, 53, 69, 72
(A) 9      (B) 102  (C) 46      (D) 6
58. 32 x 9 = ?
(A) 36 x 6 (B) 24 x 12 (C) 24 x 16 (D) 18 x 18
59. खालीलपैकी विषम संख्या कोणती ?
(A) 336     (B) 334        (C) 772       (D) 227
60. 2, 5, 11, 23, 47, ?
(A) 90       (B) 95           (C) 96         (D) 99

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे
31-C, 32-A, 33-C, 34-D, 35- D, 36-B, 37-B, 38-A, 39-A, 40-B, 41- D, 42-D. 43-C, 44-D, 45-C, 46-C, 47-D, 48-A, 49-C, 50-A,51-C, 52-A, 53-C, 54-D, 55-D, 56-C, 57-D, 58-B, 59-D, 60-B.