आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका Arogya Sevak Question Paper Part 4

सामान्य ज्ञान GK
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका भाग ३
आरोग्य विभाग आरोग्य कर्मचारी (४० टक्के) 
परिक्षा दि. ८-०१-२०१७
———————————————————
1 ते 75 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

76. भारत कोणत्या वर्षी अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला ?
A)१९७१     B)१९७३     C)१९७७     D) १९७५
77. ‘ग्राहक संरक्षक कायदा’ कोणाच्या काळात राबविला गेला ?
A) राजीव गांधी            B) इंदिरा गांधी
C) पंडीत नेहरु             D) मोरारजी देसाई
78. हिमाचल प्रदेशात मणिकरण येथील विद्युत केंद्र —– केंद्र आहे.
A) सौर ऊर्जा                B) पवन ऊर्जा
C) भूऔष्णिक ऊर्जा      D) कोळसा ऊर्जा
79. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ———- येथे आहे.
A) जिनिव्हा    B) पॅरिस    C)न्युयॉर्क    D) रोम
80. रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ?
A) गुजरात  B) महाराष्ट्र  C) उत्तर प्रदेश   D) राजस्थान
81. ‘वीस कलमी कार्यक्रम’ कोणी सुरु केला ?
A) पंडीत नेहरु           B) महात्मा गांधी
C) इंदिरा गांधी           D) मोरारजी देसाई
82. भारतात सर्वप्रथम ‘व्हॅट’ लागू करणारे राज्य कोणते आहे ?
A) उत्तर प्रदेश  B) पंजाब  C) राजस्थान  D) हरियाणा
83. शून्याधारित अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला ?
A)१९८५    B)१९८७    C)१९८९    D) १९९१
84. लोकसंख्येत घट झाल्यास ——— होईल.
A) दरडोई उत्पन्नात घट  B) बचतीत घट
C) गुंतवणुकीत वाढ      D) दरडोई उत्पन्नात वाढ
85. भारताने ‘दक्षिण गंगोत्री’ हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे ?
A) अटलांटीक B) पॅसिफिक C) अंटार्क्टिका D) हिंदी
86. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?
A) सायट्रीक                  B) हायड्रोक्लोरीक
C) सल्फ्युरिक               D) नायट्रिक
87. गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळट ——— तयार होते.
A) वर्णक  B) जनुक  C) जीवनसत्व  D) रसायन
88. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?
A) सरदार पटेल             B) पंडीत नेहरु
C) महात्मा गांधी            D) विनोबा भावे
89. महात्मा गांधीचे राजकीय गुरू कोण होते ?
A) गो. कृ. गोखले          B) गो. ग. आगरकर
C) मोतीलाल नेहरु         D) न्या. म.गो. रानडे
90. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ याचे लेखक कोण ?
A) पंडीत नेहरु              B) राजेंद्र प्रसाद
C) मौलाना आझाद        D) दादाभाई नौरोजी
91. क्रांतिसिंह नाना पाटील पदसिद्ध ———- होते.
A) समाजसेवक            B) राजकारणी
C)समाजसुधारक          D) स्वातंत्रसैनिक
92. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधि कोणी दिली?
A) पंडीत नेहरु             B) रविंद्रनाथ टागोर
C) सुभाषचंद्र बोस        D) लो. टिळक
93. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतिने दिली ?
A) अमेरिकन    B) फ्रेंच    C) चीन    D) आफ्रिकन
94. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना कोणी केली?
A) महात्मा फुले           B) भाऊराव पाटील
C) धोंडो केशव कर्वे      D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
95. शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले ?
A) मराठ्यांसाठी          B) ब्राह्मणांसाठी
C)अस्पृश्यांसाठी          D) सैनिकांसाठी
96. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली झाली ?
A)१८३३    B)१८७३    C)१८५७    D)१८७५
97. नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
A) उत्तर प्रदेश              B) कर्नाटक
C) जम्मू काश्मीर          D) उत्तरांचल
98. चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले ?
A)१९७१    B)१९६९    C)१९६५    D) १९७३
99. सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे हे कोणी म्हटले आहे ?
A) महात्मा गांधी          B) लोकमान्य टिळक
C) लालबहादुर शास्त्री   D) दादाभाई नौरोजी
100. माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते ?
A) ४५        B) ५५        C) ६५        D) ७५

उत्तरे

76 – C, 77 – A, 78 – C, 79 – A, 80 – B, 81 – C,
82 – D, 83 – B, 84 – D, 85 – C, 86 – A, 87 – A,
88 – D, 89 – A, 90 – C, 91 – D, 92 – B, 93 – B,
94 – D, 95 – C, 96 – B, 97 – D, 98 – B, 99 – A,
100 – C

1 COMMENT

  1. सर ST catogary गडचिरोली जिल्हा परिषद प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी झालेला पेपर टाका

Comments are closed.