Articles English Grammar Part 1

Articles ( उपपदे )

The words a, an and the are called articles.
Articles come before nouns.
There are two types of Articles –
1. Indefinite Articles – a, an
2. Definite Article – the

Indefinite Articles : A or an is called the indefinite article.
The article which is not used with any particular noun is called indefinite article.
Use of article a ( a या उपपदाचा वापर करण्याचे नियम ) :
1. a हे article एकवचनी countable सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. ( a article used before singular countable common noun. )

2. ज्या एकवचनी countable सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होते त्या नामाच्या अगोदर a हे उपपद वापरतात. ( a article used before singular countable common noun which begin with a consonant. )
Ex. a boy, a book, a cat, a pen

अपवाद :
1. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते, पण त्या स्वराचा उच्चार मात्र व्यंजना सारखा होत असेल तर त्या नामाच्या अगोदर a हे उपपद वापरतात.
Ex. a European, a unit, a unity, a union, a uniform, a usual, a useful, a universal, a university, a unicorn, a ewe, a eau-de-cologne, a one rupee note, a one sided affair, a one eyed man, such a one.

2. पुढील शब्दांपूर्वी a हे उपपद वापरतात.
a noise, a pity, a shame, a nuisance, a bad cold, a thousand, a million, a score, a hundred, a dozen, a couple, a job, a hurry

3. पुढील phrases मध्ये a हे उपपद वापरतात.
a croud of, a group of, a gang of, a galaxy of, a great number of, a headache, a flock of, a lot of, a love of,  a number of, a pity, a shame, a surprise, a wonder, in a fix, in a hurry, in a mood, in a low voice, in a whisper, in a loud voice, have a bath, have a cough, have a fever, as a rule, catch a cold, at a discount, to be in a temper, take a risk, take a rest, at a discount, keep a promise.

Use of article an ( an या उपपदाचा वापर करण्याचे नियम ) :
1. an हे article एकवचनी countable सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. ( an article used before singular countable common noun. )

2. ज्या एकवचनी countable सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते त्या नामाच्या अगोदर an हे उपपद वापरतात. ( an article used before singular countable common noun which begin with a vowel. )

3. There are five vowels in English alphabets – a, e, i, o, u.
Ex. an ant, an elephant, an ink pot, an orange, an umbrella.

अपवाद :
1. ज्या सामान्य नामाची सुरुवात h ने झाली आहे, पण त्या h चा उच्चार मात्र silently केला जात असेल तर त्या सामान्य नामाच्या अगोदर an हे उपपद वापरतात.
Ex. an heir, an heiress, an hour, an hourly, an honorary, an honourable, an honest.

2. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे, पण त्या व्यंजनाचा उच्चार मात्र स्वरा सारखा होत असेल तर, त्या नामाच्या अगोदर an हे उपपद वापरतात.
Ex. an M.A., an M.P., an M.L.A., an M.Sc., an M.Com., an MBBS, an L.L.B., an S.P.

3. एखाद्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल पण त्याच्या अगोदर विशेषण वापरलेले असेल व त्या विशेषणाची सुरुवात स्वराने झालेली असेल तर त्या विशेषणापूर्वी an हे उपपद वापरतात.
Ex. an old man, an extremely hot city, an extraordinary person.

4. पुढील phrase मध्ये an वापरतात – have an interest in.

A व an च्या वापरासंदर्भात विशेष माहिती :
1. नामाच्या सुरुवातीला विशेषण आलेले असेल, तर त्या विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार article वापरावे. त्या विशेषनानंतर आलेल्या नामाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार article वापरु नये.
Ex. an attractive flower, a beautiful flower, an extraordinary boy, a tall boy, a big elephant, an active elephant.

2. जर एकाच नामासाठी दोन adjectives वापरले असतील आणि ते दोन्ही adjectives and ने जोडलेले असतील तर and च्या अगोदर आलेल्या adjective च्या आधी article वापरावे.
Ex. A yellow and white dress. ( एकच ड्रेस जो पिवळा व पांढरा आहे. )

3. दोन adjectives and ने जोडलेले असतील आणि त्या दोन्ही adjectives च्या अगोदर a / an वापरले असेल, तर मात्र त्याचा अर्थ वेगवेगळा असा होतो.
Ex. A yellow and a white dress. ( एक पिवळा ड्रेस व एक पांढरा ड्रेस. )

4. विशेषणानंतर नाम नसेल तर त्या विशेषणाच्या अगोदर article वापरू नये.
Ex. Avinash is tall.
Ex. Rekha is beautiful.

5. Possessive Adjective नंतर नाम असले तरीही त्या possessive adjective च्या अगोदर a / an वापरु नये.
Ex. My book, your pen, his dress, her uniform, our teacher, their friend.

6. एखाद्या महान व्यक्ती सोबत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची तुलना केली असेल तर त्या महान व्यक्तीच्या नावाच्या अगोदर a / an वापरावे.
Ex. He is an Einstein. ( तो आइन्स्टाइन सारखा महान शास्त्रज्ञ आहे. )

7. एखाद्या महान व्यक्ती सोबत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची तुलना केली असेल व त्या महान व्यक्ती नंतर लगेच स्थळाचा किंवा देशाचा / राज्याचा उल्लेख झाला असेल तर मात्र त्या महान व्यक्तीच्या नावाच्या अगोदर the वापरावे.
Ex. He is the Einstein of India. ( तो भारताचा आईन्स्टाईन आहे. )

8. Woman, man या नामांच्या अगोदर a वापरतात. पण संपूर्ण मानव जातीचा किंवा संपूर्ण स्त्री जातीचा उल्लेख करण्यासाठी man, woman वापरल्यास मात्र त्यांच्या अगोदर a वापरु नये.
Ex. a man, a woman. ( एक माणूस, एक स्त्री )
Ex. There is a man. ( एक माणूस )
Ex. Here is a woman. ( एक महिला )
Ex. Man is mortal. ( Man – संपूर्ण मानव जात )
Ex. Man is heaven’s Master piece. ( Man – संपूर्ण मानव जात )
Ex. Woman is more sensitive than man. ( Woman – संपूर्ण स्त्री जात, Man – संपूर्ण पुरुष जात. )

9. Another, this, that, these, those, the other या सर्व विशेषणांनंतर एखादे नाम आले तरीही त्यांच्या अगोदर a / an वापरत नाहीत.
Ex. This book, that chair, these tables, those pens, another girl, the other man.

10. Proper Noun ( विशेष नाम ), Plural Noun ( अनेकवचनी नाम ), Abstract Noun ( भाववाचक नाम ), Material Noun ( पदार्थवाचक नाम ), Uncountable Noun यांच्या अगोदर a / an वापरु नये.