Articles Part 2

Definite Article

The is called the definite article.
Definite Article normally points out some particular person or thing.

USE OF THE DEFINITE ARTICLE THE ( The या उपपदाचा वापर करण्याचे नियम ) :
1. Article the is used before a particular person or thing or one already referred to.
2. Article the is used before countable or uncountable nouns.
3. Article the is used before singular or plural countable nouns.

The हे उपपद वापरण्याचे महत्वाचे नियम :
1. दोन वाक्ये लागोपाठ आलेले असतील व त्यापैकी पहिल्या वाक्यात एखाद्या नामाचा उल्लेख झालेला असेल आणि त्याच नामाचा उल्लेख त्यानंतर लगेच आलेल्या दुसऱ्या वाक्यात झालेला असेल तर दुसऱ्या वाक्यातील त्या नामाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. There was a cow. The cow was red.
Ex. Sanjay loves a dog. The dog is very useful.

2. जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Red fort, The Gateway of India, The India Gate, The Taj Mahal etc.

3. धर्मग्रंथांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Bhagwad Geeta, The Mahabharat, The Ramayana, The Quran, The Bible

4. महासागर, उपमहासागर, समुद्र यांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Indian Ocean, the Pacific Ocean, the Atlantic Ocean, the Arabian sea.

5. नद्यांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Ganga, The Yamuna, The Godawari, The Krishna, The Kaveri.

6. पर्वतांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Himalaya, the Sahyadri, the Satpuda, the Vindhya, the Aravali.

7. दिशांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The East, the West, the North, the South, the North East, the North West, the South East, the South West.

8. अवकाशातील खगोल दर्शविण्यासाठी the हे उपपद वापरतात.
Ex. The sun, the stars, the Earth, the moon, the milkyway.

9. Superlative degree च्या वाक्यात विशेषणापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. Mumbai is one of the biggest cities.
Ex. Vijaya is the most brilliant girl.
Ex. Sanjay is the tallest boy.

10. एखाद्या सामान्य नामावर विशेष जोर द्यायचा असेल, तर त्या सामान्य नामाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. This is the book which I want to buy.

11. क्रमवाचक संख्या विशेषणांपूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The first, the second, the third, the fourth, the fifth.

12. उजवी व डावी बाजू दर्शविण्यासाठी त्यांच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The right, the left.

13. विशेषणापूर्वी the हे उपपद वापरत नाहीत. पण विशेषनानंतर कोणतेही नाम आलेले नसेल, तर त्या वाक्यात ते विशेषण त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करीत असते म्हणून त्या विशेषणाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The black ( सर्व काळे लोकं )
Ex. The white ( सर्व गोरे लोकं )
Ex. The brave ( सर्व शूर लोकं )

14. एखादे एकवचनी सामान्यनाम संपूर्ण वर्गाचे किंवा संपूर्ण गटाचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्या नामाच्या अगोदर the हे उपपद वापरतात. ( अपवाद : man, woman )
Ex. The dog is an honest animal.

15. देशाच्या व राज्याच्या नागरिकत्वापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Indian, the Maharashtrian, the British, the American.

16. संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करण्यासाठी आडनावाच्या अनेकवचनापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. We are invited by the Jadhavs.

17. Same या शब्दाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. I saw the same dress.
Ex. I bought the same pen.

18. एका विशेष नामाची तुलना दुसऱ्या विशेष नामासोबत केली असेल आणि त्या दुसऱ्या विशेष नामानंतर लगेच देशाच्या, राज्याच्या किंवा शहराच्या नावाचा उल्लेख केला असेल तर त्या दुसऱ्या विशेष नामाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. Samudra Gupta is called the Napolean Bonapart of India.
Ex. Kalidas is called the Shakespear of India.

19. धर्माच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Hindus, the Shikhs, the Muslims, the

20. वर्तमानपत्राच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Times of India, The Indian Express, The Lokmat Times

21. राजकीय पक्षांच्या नावाच्या अगोदर सुद्धा the हे उपपद वापरावे.
The BJP, The Congress, The Shiv Sena

22. रेल्वेच्या नावाच्या पूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. The Mahabharata Express, The Nandigram Express, The Devgiri Express, The Marathwada Express

23. जहाजांच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरावे.
Ex. The Titanic, The Vikrant

24. दिवसाच्या भागांच्या नावापूर्वीसुद्धा the हे उपपद वापरतात.
Ex. in the morning, in the afternoon, in the evening.

25. किल्ल्यांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. Ex. The Raigad Fort, The Visapur Fort, The Panhala Fort.

26. लेण्यांच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The Ellora Caves, The Ajanta Caves.

27. ऐतिहासिक क्रांती, ऐतिहासिक युद्ध, ऐतिहासिक राजांचे किंवा राणींचे युग व ऐतिहासिक कालावधी दर्शविण्यासाठी the हे उपपद वापरतात.
Ex. The French revolution, the Russian revolution, the industrial revolution, the battle of Panipat, the Victorian age, the Restoration period.

28. ऐतिहासिक साम्राज्यांच्या नावापूर्वीसुद्धा the हे उपपद वापरतात.
Ex. The Maurya Empire, the Gupta Empire, the Mughal Empire.

29. शैक्षणिक संस्थांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. The Rayat shikshan Sanstha, The Bhor Education Society the Pune Jilha Shikshan Mandal.

30. शरीरातील इंद्रियांच्या नावाच्या अगोदर the हे उपपद वापरावे.
Ex.The head, the leg, the hand.

31. संगीतामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या नावाअगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The piano, the Tabla, the Guitar, the Flute, the Violin.
अपवाद :
वरील वाद्यांचा उपयोग जर countable noun म्हणून एखाद्या वाक्यात केला असेल तर मात्र त्या वाद्याच्या नावाच्या अगोदर a किंवा an हे उपपद वापरावे.
Ex. Savitra bought a flute.

32. चित्रपटगृह व नाट्यगृहांच्या नावाअगोदर the हे उपपद वापरावे.
The Mahaveer Talkies, Tha Alka Talkies, The Sant Eknath Rang Mandir, the Balgandharv Natyagruh.

33. ग्रंथालय, संग्रहालय, क्लब व हॉटेलच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
The Ganesh Library, The Oberoi Hotel, The Rotary club of Bhor, The Kelkar Museum.

34. लष्करी दलांच्या नावापूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. The Navy, the, Airforce, the Army.

35. एखाद्या पदार्थवाचक नामांतर लगेच of असेल आणि of नंतर लगेच एखादे नाम असेल तर त्या पदार्थ वाचक नामाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The water of Godawari, the milk of cow, the tea of Darjiling.

36. समान वाढ किंवा समान घट दर्शविण्यासाठी more या शब्दाच्या अगोदर the हे उपपद वापरतात.
Ex. The more you learn the more you will be wise.

37. Comparative degree च्या वाक्यात शेवटी of the two असेल तर त्या वाक्यात to be नंतर the वापरतात.
Ex. Swayam is the taller of the two brothers.
Ex. Aditi is the more beautiful of the two.

38. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या नावापूर्वी the हे उपपद  वापरतात.
Ex. The President of India, the Prime Minister of India, the Chief Minister of Maharashtra.

अपवाद :
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यानंतर लगेच त्या पदावर असलेल्या व्यक्तीचे नाव असेल तर मात्र त्यांच्या अगोदर the वापरू नये.
Ex. Chief Minister Eknath Shinde is a good person.

39. पुढील नावांपूर्वी the हे उपपद वापरतात.
Ex. The Legislature, the Judiciary.

40. घराच्या खिडक्या व दरवाजे यांच्यापूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. Open the door.
Ex. Shut the window.

41. विशिष्ट विद्यापीठाचे नाव असेल तर त्याच्या अगोदर the हे उपपद वापरतात. पण एक विद्यापीठ या अर्थाने मात्र a university वापरतात.
Ex. The University of Mumbai is very famous.
Ex. There is a university in Mumbai.

42. हवामान दर्शक शब्दांपूर्वी the हे उपपद वापरावे.
Ex. The rain, the wind, the air.

उपपद न वापरण्याचे नियम :
1. नाष्टा तसेच जेवणाच्या नावापूर्वी उपपद वापरत नाहीत.
Ex Breakfast, Lunch, Dinner.
अपवाद :
जेवणाच्या नावापूर्वी एखाद्या विशेषण आले असेल तर मात्र त्याच्या अगोदर a / an हे उपपद वापरतात.
Ex. a delicious dinner, a tasty breakfast.

2. Home या शब्दाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. Radhika came home.
अपवाद :
Home या शब्दाच्या नंतर लगेच of असे आणि of नंतर लगेच एखादे नाम असेल तर मात्र home च्या अगोदर the वापरतात.
Ex. This is the home of my uncle.

3. आजारांच्या नावापूर्वी उपपद वापरत नाहीत.
Ex. Plauge, Fever, Dysentery.

4. खेळांच्या नावांपूर्वी उपपद वापरत नाहीत.
Ex. Cricket, hockey, football.

5. विषयांच्या नावाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. English, Mathematics, Science.

6. रस्त्यांच्या नावाच्या अगोदर कोणतेही उपपद वापरत नाहीत.
Ex. Gandhi road, JM road, Savarkar road.

7. दिवसांच्या नावाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. Monday, Tuesday, Wednesday, Thursday

8. महिन्यांच्या नावाच्या अगोदर कोणतेही उपपद वापरत नाहीत.
January, February, March, April

9. ऋतूंच्या नावाच्या अगोदर उपपद वापरू नये.
Ex. Monsoon, Winter, Summer.

10. संबोधन विभक्ती मध्ये सामान्य नामाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Friend, this is my village.
Brother, stop there.

11. कला क्षेत्र दर्शविणाऱ्या शब्दांच्या अगोदर उपपद वापरू नये.
Ex. Drawing, Painting, Singing.

12. एखादे अनेकवचनी सामान्यनाम संपूर्ण समूहाचा उल्लेख करत असेल तर त्याच्या अगोदर उपपद वापरू नये.
Ex. Children are usually naughty.
Ex. Poets are seldom impersonal.

13. जर नामाच्या अगोदर पदवीचा किंवा पदाचा उल्लेख केलेला असेल तर त्या नामाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. Lord Byron, King Akbar, General Kaul,
Dr. Seth

14. भाववाचक नामांच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. Wisdom, Poverty, honesty.

15. पदार्थवाचक नामांच्या अगोदर उपपद वापरत नाहीत.
Ex. water, milk, sugar.

16. पुढील वाक्प्रचारांमध्ये उपपद वापरू नये.
To give ear, to set foot on, to turn tail, to take root, to send word, to lose heart, to follow suit, to call to mind, to take offence, to set sail, to take to task, to bring to book, on land, at sea, out of doors, at arm’s length, out of place, on foot, sick at heart.