आचार्य बाळशास्त्री जांभेकर ( १८१२ – १८४६ ) Balshatri Jambhekar

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ( १८१२ – १८४६ )
Balshatri Jambhekar

1. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले या गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर आहे.
2. वयाच्या १३ व्या वर्षी रामदास स्वामी, संत तुकाराम, वामन व मोरोपंत यांच्या मराठी साहीत्य कृतीचा अभ्यास जांभेकरांनी केला.
3. १८२५ मध्ये बाळशास्त्री जांभेकर हे मुंबई येथे आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. तसेच जांभेकर यांनी गणित विषयात प्राविण्य मिळविले. विद्यार्थी असतानाच गणित विषयातील प्राविण्यामुळे जांभेकर हे गणिताचे प्राध्यापक बनले.
4. १९३० साली वयाच्या १८ व्या वर्षी जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उप सचिव / डेप्युटी
सेक्रेटरी झाले.
5. पुढे ब्रिटीश शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणुन त्यांची नेमणुक झाली होती. या दरम्यान त्यांनी कानडी भाषेचा अभ्यास केला.
6. ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतील पहीले वृत्तपत्र दर्पण हे त्यांनी सुरु केले. हे वृत्तपत्र एकुण आठ पानाचे होते. दर्पण वृत्तपत्राचे त्रैमासिक शुल्क सहा रुपये इतके होते. दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी भाषेतून प्रकाशित होत होते. दर्पण वृत्तपत्र सुरु केल्यामुळेच बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार असे म्हणतात.
7. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. ते मराठी भाषेतील आद्यसंपादक आहेत.
8. १८३४ मध्ये जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजचे साहाय्यक प्राध्यापक झाले. भारतीय शिलालेख व ताम्रपटाचे त्यांनी वाचन केले.
9. १८४० मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडले म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहीले मासिक दिग्दर्शन सुरु केले. दिग्दर्शन हे मासिक प्रकाशित करण्यामागे भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश बाळशास्त्री जांभेकर यांचा होता.
10. १७ हे १८४६ रोजी वयाच्या ३६ व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.
11. ब्रिटीशांच्या वतीने १८४० मध्ये सर जेम्स कर्नाक यांनी त्यांना जस्टीस ऑफ पिस ही पदवी दिली.
12. जांभेकरांनी ‘बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची स्थापना केली.
13.  6 जानेवारी हा जांभेकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढील ग्रंथ लिहिले :
1) शून्यलब्धी
2) इंग्लंड देशाची बखर – १८३२
3) बाल व्याकरण – १८६३
4) हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास – १८४९
5) सार संग्रह १८३७
6) भूगोल विद्या व ज्योतिषशास्त्र.
7) हिंदुस्तानचा इतिहास – १८४६
8) जांभेकर यांनी ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली.