मराठी व्याकरण बीड जिल्हा पोलीस भरती परीक्षा दिनांक : 9 एप्रिल 2017

मराठी व्याकरण
बीड जिल्हा पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 9 एप्रिल 2017
———————————————————————-
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

61) खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा
किती छान गारवा आहे या ठिकाणी !
1) सामन्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) सर्वनाम
62. भाऊबहिण या शब्दाचे लिंग ओळखा.
1) पुल्लिंग
2) स्त्रिलिंग
3) नपुंसकलिंग
4) उभय लिंग
63. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
जो अभ्यास करेल ो परिक्षेत पास होईल.
1) दर्शक सर्वनाम
2) संबंधी सर्वनाम
३) प्रश्नार्थक सर्वनाम
4) आत्मवाचक सर्वनाम
64. खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोरास पकडले.
1) कर्तरी प्रयोग
2) कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग
4) मिश्र प्रयोग
65. खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा.
आहाहा! किती सुंदर आहे हे चित्र!
1) प्रश्नार्थक
2) आज्ञार्थक
3) नकारार्थी
4) उद्गारवाचक
66. खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा.
प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
1) केवल वाक्य
2) मिश्रवाक्य
3) संयुक्तवाचक
4) आज्ञार्थी वाक्य
67. खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी अभ्यास करीत होतो.
1) साधा भूतकाळ
2) पूर्ण भूतकाळ
3) अपूर्ण भूतकाळ
4) रिती भूतकाळ
68) त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे. या वाक्याचे मिश्र वाक्य करा.
1) दिवाळे निघाले असे दुकानदार म्हणाला
2) दुकानदाराने दिवाळे निघाल्याचे सांगितले
3) दुकानदाराचे दिवाळे निघाले
4) दुकानदार म्हणाला की, माझे दिवाळे निघाले
69. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. एका हाताने टाळी वाजत नाही.
1) टाळी वाजवायला दोन हात लागतात
2) भांडणाचा दोष एकाकडे नसतो
3) एका हाताने टाळी वाजत नाही, चुटकी वाजते
4) दोन्ही हाताने टाळी वाजते
70. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे.
1) मुक्काम हलवून पलायन करणे
2) अंथरुण गुंडाळणे
3) फसवणूक करणे
4) माघार घेणे

उत्तरे
61 – 3, 62 – 2, 63 – 2, 64 – 3, 65 – 4, 66 – 3,
67 – 3, 68 – 4, 69 – 2, 70 – 1