चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती मराठी व्याकरण 25 प्रश्न परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2017

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती
मराठी व्याकरण 25 प्रश्न
परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2017
—————————————————
1. स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा. संयुक्त स्वर – ऐ
1) अ + इ
2) अ + ऊ
3) आ + इ
4) आ + उ
2. क्, ख्, ….., भ्, म् या वर्णांचा प्रकार ओळखा.
1) उष्मे
2) अर्धस्वर
3) स्पर्श व्यंजने
4) अल्पप्रमाण
3. मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत ?
1) 84
2) 12
3) 48
4) 32
4. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ?
1) मूलध्वनी
2) संयुक्त व्यंजन
3) महाप्राण
4) स्वर
5. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो …….. म्हणतात.
1) संयुक्त स्वर
2) जोडाक्षर
3) द्वित
4) वर्ण
6. ‘निष्फळ’ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ?
1) नि + फळ
2) नी + फळ
3) नि: + फळ
4) निशा + फळ
7. खालीलपैकी व्यंजनसंधीचा सामासिक शब्द कोणता ?
1) तेजोनिधी
2) दिगंबर
3) उमेश
4) देवालय
8. विद्यार्थी या शब्दाचा संधीप्रकार कोणता ?
1) स्वरसंधी
2) व्यंजनसंधी
3) विसर्गसंधी
4) यापैकी नाही
9. खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता ?
1) मुनीच्छा
2) षड्रिपू
3) उच्छेद
4) सच्चरित्र
10. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात ?
1) स्वरात संधी
2) विसर्ग संधी
3) स्वरसंधी
4) व्यंजनसंधी
11. य, व, र या अक्षराबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास काय होईल ?
1) यणादेश
2) संप्रसारण
3) प्रचिती
4) आदेश
12. पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मूळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत ?
1) मुलांनी वर्गात दंगा करु नये
2) सध्या उन्हाळा जाणवत आहे.
3) आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली
4) सुंदर जग नकाशात दिसते
13. विशेषनामाचे ….. होत नाही.
1) एकवचन
2) अनेकवचन
3) बहुवचन
4) सामान्यनाम
14. भाववाचक नामे ही कधी – कधी …….. कार्य करतात.
1) सर्वनामाचे
2) क्रियापदाचे
3) विशेषनामाचे
4) धातुसाधिताचे
15. पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेषनाम सामान्य नामासारखे वापरले आहे, ते कोणते ?
1) त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
2) विचारा तुम्हाला काही प्रश्न असेल तर !
3) श्रीमंतांना गर्व नसतो.
4) या गावात बरेच नारद आहेत.
16. गटात न बसणारा शब्द ओळखा.
1) यंदापेक्षा
2) थोडासुद्धा
3) खाली बसणे
4) जाण्यापेक्षा
17. पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे ?
1) री हा कर्तुवाचक प्रत्यय
2) आरी हा कर्तुवाचक प्रत्यय
3) ई हा कर्तुवाचक प्रत्यय
4) आर हा कर्तृवाचक व ई हा लिंगदर्शक प्रत्यय
18. कोण काय करणार आहे माझे ? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे ?
1) आश्चर्य
2) तुच्छता
3) आगतिकता
4) विलक्षणपणा
19. अव्ययसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे ?
1) बोलक्या बाहुल्यांचा खेळ सर्वांनाच आवडतो.
2) आज तुम्ही कोणत्या गावाला जाणार?
3) बनारसी बोरे रसाळ असतात
4) ते गव्हाचे पोते पुढच्या मालीनी ठेव
20. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ?
1) शक्य क्रियापद
2) संयुक्त क्रियापद
3) अधिकरण
4) यापैकी नाही
21. पुढील चार वाक्यांपैकी रिती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
1) मी प्रयोग करतो
2) मी प्रयोग करीत असतो
3) मी प्रयोग केला आहे
4) मी प्रयोग करीत आहे
22. कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक है कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
1) रितीवाचक
2) स्थलवाचक
3) कालवाचक
4) विशेषण
23. दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेवरहुकूम
1) हेतूवाचक
2) योग्यतावाचक
3) संबंधवाचक
4) भागवाचक
24. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मन:पूर्वक अभिनंदन करतो या वाक्यातील वर्ग ओळखा ?
1) येथे जमलेले सर्व लोक
2) आपले अभिनंदन
3) या कृत्याबद्दल मन:पूर्वक
4) आम्ही येथे जमलेले
25. इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात ?
1) पुरुषकर्मणी
2) समापनकर्मणी
3) कर्मकर्तरी
4) मनोवेधक

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
1 – 3, 2 – 3, 3 – 3, 4 – 2, 5 – 2, 6 – 3, 7 – 2, 8 – 1,
9 – 1, 10 – 2, 11 – 1, 12 – 4, 13 – 2, 14 – 3,
15 – 4, 16 – 3, 17 – 2, 18 – 2, 19 – 4, 20 – 2,
21 – 2, 22 – 3, 23 – 2, 24 – 2, 25 – 3.