CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 APRIL 2022

5 एप्रिल 2022 च्या चालू घडामोडी

Current Affairsi n Marathi

1. Payment council of India चे नवीन अध्यक्ष कोण आहेत ?
A. विश्वास पटेल
B. विश्वास पाटील
C. विलास पटेल
D. विलास पाटील
विशेष माहिती :
अ. Payment council of India ची स्थापना 2008 साली झाली
ब. पेमेंट काऊन्सिल ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे.

2. 2021 – 22 या आर्थिक वर्षात भाजीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात झाले ?
A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. आंध्र प्रदेश
D. मध्य प्रदेश
विशेष माहिती :
अ. 2021 – 22 या आर्थिक वर्षात भाजीचे सर्वात जास्त उत्पादन झालेले पहिले तीन राज्य पुढील प्रमाणे आहेत – उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश.
ब. 2021 – 22 या आर्थिक वर्षात फळांचे सर्वात जास्त उत्पादन झालेले पहिले तीन राज्य पुढील प्रमाणे आहेत – आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश.

3. 1 एप्रिल 2022 या दिवशी रिझर्व बँक ऑफ इंडियाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला ?
A. 88 वा
B. 86 वा
C. 87 वा
D. 90 वा
विशेष माहिती :
अ. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रील 1935 या दिवशी झाली. 1 जानेवारी 1949 या दिवशी RBI चे राष्ट्रीयकरण करण्यात आले. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 नुसार RBI ची स्थापना झाली.
ब. RBI चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे ( 1937 पासून ). त्याच्या अगोदर कोलकत्ता या ठिकाणी मुख्यालय होते.
क. RBI चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास आहेत. RBI चे चार डेप्युटी गव्हर्नर पुढील प्रमाणे आहेत – महेश कुमार जैन, मायकल पात्रा, एम. राजेश्वर राव, टी. रवी शंकर.
ड. RBI चे पहिले इंग्रज गव्हर्नर सर ओसबोर्न आहेत, तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख आहेत.
इ. अर्थमंत्र्यांच्या सल्ल्याने भारताचे पंतप्रधान RBI च्या गव्हर्नरची नियुक्ती करतात.

4. FASTER हे सॉफ्टवेअर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A. संसद
B. वर्तमानपत्र
C. क्रीडा
D. न्यायालय
विशेष माहिती :
अ. FASTER – Fast and Secured Transmission of Electronic Records.
ब. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमन्ना यांच्या हस्ते या सॉफ्टवेअरचे उद्घाटन झाले.
क. भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे.
ड. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून न्यायालयाचे अंतिम निर्णय, स्टे ऑर्डर आणि जमानतीचे आदेश कोणाच्याही मदतीशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहेत.

5. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. मीराबाई चानू
B. मेरी कोम
C. सायना नेहवाल
D. पि. व्ही. सिंधू
विशेष माहिती :
अ. या पुरस्काराची सुरूवात 2020 मध्ये झाली. हे पुरस्कार BBC HINDI मार्फत दिले जातात.
ब. मीराबाई चानू मणिपूर राज्यातील आहे. ती भारोत्तोलक ( वेट लिफ्टिंग ) आहे.
क.  टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिने भारोत्तोलन मध्ये 49 किलो वजनी गटात रौप्य पदक ( सिल्वर मेडल ) जिंकले.

6. भारतीय भाषांचा प्रचार करण्यासाठी भाषा सर्टिफिकेट सेल्फी या अभियानाची सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केली आहे ?
A. राजभाषा मंत्रालय
B. शिक्षण मंत्रालय
C. गृह मंत्रालय
D. सांस्कृतिक मंत्रालय
विशेष माहिती :
अ. भारतातील बहु भाषावाद व सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देऊन एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना जोपासणे या उद्देशाने वरील अभियान सुरू केले आहे.
ब. आपल्या भाषेच्या सर्टिफिकेट सोबत सेल्फी काढून तो सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करणे.
क. सध्या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आहेत.

7. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले ?
A. ऑपरेशन यमुना
B. ऑपरेशन ब्रह्मपुत्रा
C. ऑपरेशन गंगा
D. ऑपरेशन गोदावरी
विशेष माहिती :
अ. युक्रेन या देशाची राजधानी किव आहे.
ब. युक्रेन या देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आहेत.
क. रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आहेत.
ड. चेर्नेबल अणुभट्टी युक्रेन या देशात आहे.
इ. युक्रेन या देशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. युक्रेन या देशातून भारतामध्ये सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते.

8. प्रतिष्ठित बोल्ट्झमन पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत ?
A. राहुल महाजन
B. राहुल बजाज
C. मनोज वाजपेयी
D. दीपक धर
विशेष माहिती :
अ. दीपक धर हे सांखिकीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत.
ब. बोल्ट्झमन पुरस्कार सांखिकीय भौतिकशास्त्रज्ञ क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे.
क. या पुरस्काराची सुरुवात 1975 मध्ये झाली. हा पुरस्कार दर तीन वर्षांनी देण्यात येतो.
ड. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या स्टॅटिस्टिकल कमिशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो.
इ. 2022 साली हा पुरस्कार दीपक धर आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. जॉन हॉपफिल्ड यांना मिळाला आहे.
ई. डॉ. दीपक धर सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ( आयसर ), पुणे येथे भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

9. तुर्कमेनिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोण आहेत ?
A. सरदार बर्दिमुहमदोव
B. सपरमुरत नियाजोव
C. नायिब बुकेले
D. गेब्रिएल बोरिक
विशेष माहिती :
अ. तुर्कमेनिस्तान आशिया खंडामधील देश आहे.
ब. तूर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात आहे.
क. तुर्कमेनिस्तानचे चलन तूर्कमेनिस्तान मनत आहे.

10. आशियाई क्रिकेट परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?
A. सौरभ गांगुली
B. जय शहा
C. एन. श्रीनिवासन
D. नजमुल हसन
विशेष माहिती :
अ. आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 1983मध्ये झाली.
ब. आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य संघ एकूण चोवीस आहेत.
क. आशियाई क्रिकेट परिषदेचे मुख्यालय श्रीलंका या देशाची राजधानी कोलंबो येथे आहे.

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. अखिलेश यादव
B. मायावती
C. योगी आदित्यनाथ
D. केशव प्रसाद मौर्य

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B