Current affairs in Marathi 6 April 2022

6 एप्रिल 2022 च्या चालू घडामोडी

Current Affairs in Marathi

1. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी केली ?
A. 2021
B. 2022
C. 2020
D. 2019
विशेष माहिती :
अ. ही योजना महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलांसाठी आहे.
ब. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
क. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 23 लाखांचे बजेट तयार केले आहे.
ड. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
इ. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
ई. जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा 900 रुपये पेन्शन म्हणून दिले जातात.

2. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ( Geographical Survey of India ) या संस्थेचे नवनियुक्त महानिर्देशक कोण आहेत ?
A. राजीव खन्ना
B. डॉ. एस. राजू
C. दीपक सूद
D. मोहित सूरी
विशेष माहिती :
अ.  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची स्थापना 4 मार्च 1851 या वर्षी झाली.
ब.  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

3. प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट निर्णायक प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत  ?
A. दिलीप संघानी
B. टी. एस. तिरुमूर्ती
C. विनोदानंद झा
D. विनोद रॉय
विशेष माहिती :
अ. PMLA – Prevention of Money Laundering Act.
ब. PMLA हा कायदा 2002 मध्ये संसदेत मंजूर झाला.
क. PMLA या कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2005 पासून सुरु झाली.
ड. PMLA हा एक फौजदारी गुन्ह्याबाबतचा कायदा आहे.
इ. या कायद्याअंतर्गत संपत्ती जप्त करणे, संपत्तीचे हस्तांतरण, रुपांतरण आणि विक्री याच्यावर बंदी घालणे अशी कारवाई केली जाऊ शकते.

4. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2022 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
A. भारत
B. न्युझीलँड
C. इंग्लंड
D. ऑस्ट्रेलिया
विशेष माहिती :
अ. या स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंड या देशामध्ये करण्यात आले होते.
ब. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.
क. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा आतापर्यंत सात वेळा जिंकली आहे.
ड. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात 1973 या वर्षी झाली. प्रथम विजेता इंग्लंड हा देश आहे.
इ. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू भारताची झुलन गोस्वामी आहे.
ई. एकूण 6 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळणारी जगातील पहिली महिला खेळाडू भारताची मिताली राज आहे.

5. Yangtze River Three Gorges 1 काय आहे ?
A. इलेक्ट्रिक क्रूझ जहाज
B. पुलाचे नाव
C. इलेक्ट्रिक सॅटेलाइट
D. इलेक्ट्रिक रेल्वे
विशेष माहिती :
अ. हे इलेक्ट्रिक क्रूझ जहाज चीन या देशाने तयार केले आहे.
ब. या जहाजाची रुंदी 16 मीटर असून उंची 100 मीटर आहे.
क. या जहाजाची क्षमता 1300 प्रवासी इतकी आहे.

6. विश्व आत्मकेंद्रित दिवस / ऑटिज्म जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो ?
A. 1 एप्रिल
B. 2 एप्रिल
C. 3 एप्रिल
D. 4 एप्रिल
विशेष माहिती :
अ. ऑटिज्म या आजारात लहान मुलाच्या मेंदूचा विकास होत नाही.
ब. 2022 साली या दिवसाची थिम – Inclusive Quality education for all

7. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 कारण ही स्पर्धा कोणत्या राज्यात झाली ?
A. महाराष्ट्र
B. आंध्र प्रदेश
C. कर्नाटक
D. तेलंगणा
विशेष माहिती :
अ. कोरोनाच्या लाटेमुळे ही स्पर्धा 2021 मध्ये होऊ शकली नाही.
ब. 2021 ऐवजी ही स्पर्धा 2022 साली झाली.

8. मणिपूर या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. ला. गणेशन
B. पी व्यंकट
C. किरण रिजुजू
D. बिरेन सिंह
विशेष माहिती :
अ. मणिपूर या राज्याची राजधानी इम्फाळ आहे.
ब. मणिपूर या राज्याचे राज्यपाल ला. गणेशन आहेत.
क. मणिपूर या राज्याला लागून पुढील तीन राज्य आहेत – आसाम, मिझोराम, नागालँड.
ड. मणिपूर या राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत, तर राज्यसभेची एक जागा आहे आणि विधानसभेच्या साठ जागा आहेत.
इ. लोकटोक सरोवर मणिपूर या राज्यात आहे.
ई. राखाल हे लोकनृत्य मणिपुर राज्याशी संबंधित आहे.

9. भारत व कोणत्या देशादरम्यान आठ वर्षानंतर रेल्वे सेवा सुरू झाली आहे ?
A. नेपाळ
B. बांग्लादेश
C. भूटान
D. पाकिस्तान
विशेष माहिती :
अ. भारत व नेपाळ दरम्यान जयनगर – जनकपूर रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
ब. बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील जनकपूरहून कुर्था पर्यंत ही रेल्वे धावणार आहे.
क. या रेल्वेचे‌ अंतर 34.9 किमी आहे.
ड. नेपाळची राजधानी काठमांडू आहे.
इ. नेपाळचे राष्ट्रपती विद्या देव भंडारी असून पंतप्रधान शेर बहादुर देउबा आहेत.
ई. नेपाळच्या सीमेवर भारतातील पाच राज्य आहेत – उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व सिक्किम.

10. सेना प्रशिक्षण केंद्राचे नवीन प्रमुख कोण आहेत ?
A. एस. सोमनाथ
B. एस. एस. महल
C. एन. श्रीनिवासन
D. जनरल राज शुक्ला
विशेष माहिती :
अ. एस. एस. महल यांच्या अगोदर राज शुक्ला प्रमुख होते.
ब. Army Training Command ची स्थापना 1991 साली झाली.
क. सेना प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय सिमला या ठिकाणी आहे.

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. 2022 साली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला ?
A. शंभूराज देसाई
B. दिलीप वळसे-पाटील
C. जयंतराव पाटील
D. अजित पवार

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B