Current Affairs in Marathi 8 April 2022

8 एप्रिल 2022 च्या चालू घडामोडी

Current Affairs in Marathi

1. आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?
A. 7 एप्रिल
B. 6 एप्रिल
C. 5 एप्रिल
D. 8 एप्रिल
विशेष माहिती :
अ. 7 एप्रिल 1948 या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो
ब. WHO – WORLD HEALTH ORGANISATION
क. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे.
ड. जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे.

2. SEBI च्या नवीन अध्यक्षा कोण आहेत ?
A. सुशीला शर्मा
B. माधवी पुरी बुच
C. संजना बत्रा
D. रेहाना रियाज
विशेष माहिती :
अ.  SEBI – Securities and Exchange Board of India
ब.  सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 या तारखेला झाली.
क. सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे.
ड. NSE, BSE व भारतातील इतर सर्व स्टॉक एक्सचेंज वर सेबीचे नियंत्रण असते.

3. कोणत्या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने अँड्रॉइड डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी “प्ले पास” सबस्क्रिप्शन ही सेवा लॉन्च केली आहे ?
A. ॲपल
B. टिसीएस
C. गुगल
D. मायक्रोसॉफ्ट
विशेष माहिती :
अ. गुगल या कंपनीची स्थापना 4 सप्टेंबर 1998 या दिवशी झाली.
ब. गुगल या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे.
क. गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन व लॅरी पेज आहेत.
ड. गुगल या कंपनीचे CEO भारतीय वंशाचे सुंदर पीचाई आहेत.
इ. गुगलची पॅरेण्ट कंपनी अल्फाबेट इंक आहे.

4. पॅरा तिरंदाजी जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2022 या स्पर्धेत व्यक्तिगत प्रकारात सिल्वर मेडल कोणी जिंकले आहे ?
A. ज्योती बलियान
B. दीपिका कुमारी
C. मुस्कान किरार
D. पूजा जातयान
विशेष माहिती :
अ. या स्पर्धेत व्यक्तिगत प्रकारात सिल्वर मेडल मिळवणारी पूजा जातयान पहिली खेळाडू ठरली आहे.
ब. पुजा जातयान हरियाणा या राज्याची रहिवासी आहे.
क. 2022 साली या स्पर्धेचे आयोजन दुबई या शहरात करण्यात आले होते.
ड. दुबई हे शहर UAE मधील आहे.

5. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2022 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे ?
A. सातारा
B. पुणे
C. कोल्हापूर
D. सांगली
विशेष माहिती :
अ. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली.
ब. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
क. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्रातील कुस्ती खेळाशी संबंधित सर्वात मानाची स्पर्धा आहे.
ड. या स्पर्धेतील विजेत्याला चांदीची गदा दिली जाते. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा विजेत्या मल्लाला दिली जात होती. पण 1983 पासून अशोक मोहोळ स्वतःच्या खर्चाने ही चांदीची गदा तयार करून देतात.
इ. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकलेल्या मल्लाला जी चांदीची गदा दिली जाते त्या गदेच्या मध्यभागी एका बाजूला हनुमानाच चित्र तर दुसऱ्या बाजूला मामासाहेब मोहोळ यांची प्रतिकृती बसवलेली असते.

6. सुरजकुंड हस्तशिल्प मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
A. दिसपूर, आसाम
B. फरीदाबाद, हरियाणा
C. गढवाल, उत्तराखंड
D. रांची, झारखंड
विशेष माहिती :
अ. या मेळाव्याचे आयोजन 20 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत करण्यात आले होते.
ब. या मेळाव्याचे आयोजन हरियाणा शासनामार्फत करण्यात येते.
क. 2022 साली या मेळाव्याचे 35 वे वर्षे होते.
इतर महत्वाचे मेळावे.
अ. खजुराहो नृत्य महोत्सव , मध्य प्रदेश
ब. जगप्रसिद्ध वाळवंट उत्सव, जैसलमेर, राजस्थान
क. कंचोथ पर्व, जम्मू काश्मीर
ड. तोरग्या महोत्सव, अरुणाचल प्रदेश
इ. स्पितुक गुस्टर फेस्टिवल, लडाख

7. दुबई टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धा 2022 या स्पर्धेत पुरुष एकेरी याप्रकारचा विजेता कोण आहे ?
A. कॅस्पर रुड
B. कार्लोस अल्काराज
C. आंद्रे रुबलेव
D. राफेल नडाल
विशेष माहिती :
अ. आंद्रे रुबवेल चेक प्रजासत्ताक या देशाचा खेळाडू आहे.
ब. जेसेना ओस्टापेंका ही या स्पर्धेत महिला एकेरी प्रकारात विजेती आहे.
क. या स्पर्धेचे आयोजन दुबई या शहरामध्ये करण्यात आले होते.

8. वायुसेनेच्या पश्चिम कमांडचे नवीन कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. विक्रम सिंह
B. दिलीपकुमार पटनायक
C. विवेक राम चौधरी
D. श्रीकुमार प्रभाकरन
विशेष माहिती :
अ. भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी झाली.
ब. भारतीय वायुसेनेचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
क. वायुसेना दिवस 8 ऑक्टोंबर आहे.
ड. वायु सेनेचे प्रमुख विवेक राम चौधरी आहेत.
इ. भारतीय वायुसेनेची पहिली भारतीय महिला फायटर पायलट भावना कंठ आहे.
ई. वायुसेनेची प्रथम भारतीय महिला पायलट हरिता कौर देओल आहे.
के. राफेल उडवणारी पहिली महिला पायलट शिवांगी सिंह आहे.

9. 2022 साली 31 व्या आग्नेय आशियाई खेळाचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?
A. व्हिएतनाम
B. फिलीपिन्स
C. सिंगापोर
D. मलेशिया
विशेष माहिती :
अ. आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी होते.
ब. उद्देश : एक मजबूत आग्नेय आशिया बनविणे

10. टाटा ओपन टेनिस टूर्नामेंट 2022 चे आयोजन कोणत्या राज्यात केले होते ?
A. आंध्र प्रदेश
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. तेलंगणा
विशेष माहिती :
अ. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी पुणे या शहरात करण्यात येते.
ब. या स्पर्धेचे मुळनाव महाराष्ट्र ओपन असे आहे.
क. महाराष्ट्र ओपन या स्पर्धेची सुरुवात 1996 या वर्षी झाली.
ड. 1996 साली ही स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी झाली.
इ. 1997 ते 2017 या कालावधीत ही स्पर्धा चेन्नई या ठिकाणी झाली. तेव्हा या स्पर्धेला चेन्नई ओपन असे म्हटले जात होते.
ई. 2018 पासून ही स्पर्धा पुणे या शहरात होते.

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ?
A. अनिल देशमुख
B. सतेज पाटील
C. दिलीप वळसे पाटील
D. जयवंतराव पाटील

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B