DADASAHEB PHALKE AWARD

दादासाहेब फाळके पुरस्कार
Dadasaheb Phalke Award

1. दादासाहेब फाळके पुरस्कार‌ भारतीय चित्रपट सृष्टीशी ( सिनेमा ) संबंधित सर्वोच्च पुरस्कार आहे.

2. भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.

3. दादासाहेब गोविंद फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहेत.

4. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.

5. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.

6. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 साली झाली.

7. 1969 हे दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष होते.

8. सर्वप्रथम 1969 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला.

9. सुवर्णकमळ, शाल व दहा लाख रुपये रोख असे दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप आहे.

10. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम आत्तापर्यंत सहा वेळा बदलण्यात आली आहे.
1969 – 1972 – 11000
1973 – 1976 – 20000
1977 – 1983 – 40000
1982 – 2002 – 100000
2003 – 2005 – 200000
2006 पासून – 10,00000

11. 1969 पासून 2021 पर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले मान्यवर पुढीलप्रमाणे आहेत.

रजनीकांत ( अभिनेता ) – 2019
अमिताभ बच्चन ( अभिनेता ) – 2018
विनोद खन्ना ( मरणोत्तर ) ( अभिनेता ) – 2017
के विश्वनाथ ( दिग्दर्शक ) – 2016
मनोज कुमार ( अभिनेता ) – 2015
शशि कपूर ( अभिनेता ) – 2014
गुलजार ( गीतकार ) -2013
प्राण ( अभिनेता ) – 2012
सौमित्र चॅटर्जी ( अभिनेता ) – 2011
के. बालाचंदर ( दिग्दर्शक ) – 2010
डी. रामानायडू ( दिग्दर्शक व निर्माता ) – 2009
व्ही के मूर्ती ( चलचित्रकार ) – 2008
मन्ना डे ( पार्श्र्वगायक ) – 2007
तपन सिन्हा ( दिग्दर्शक ) – 2006
श्याम बेनेगल ( दिग्दर्शक ) – 2005
अटूर गोपालकृष्णन ( दिग्दर्शक ) – 2004
मृणाल सेन ( दिग्दर्शक ) – 2003
देव आनंद ( अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता ) – 2002
यश चोप्रा ( दिग्दर्शक व निर्माता ) – 2001
आशा भोसले ( पार्श्र्वगायिका ) – 2000
ऋषिकेश मुखर्जी ( दिग्दर्शक ) – 1999
बलदेव राज चोप्रा ( दिग्दर्शक व निर्माता ) – 1998
कवी प्रदीप ( गीतकार ) – 1997
शिवाजी गणेशन ( अभिनेता ) – 1996
डॉ. राजकुमार ( अभिनेता व गायक ) – 1995
दिलीप कुमार ( अभिनेता ) – 1994
मजरूह सुलतानपुरी ( गीतकार ) – 1993
भूपेन हजारिका ( संगीतकार, गीतकार व गायक ) – 1992
भालजी पेंढारकर ( दिग्दर्शक निर्माता व लेखक ) – 1991
अक्किनेनी नागेश्वर राव ( अभिनेता ) – 1990
लता मंगेशकर ( गायिका ) – 1989
अशोक कुमार ( अभिनेता ) – 1988
राज कपूर ( अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता ) – 1987
बोम्मी रेड्डी नागी रेड्डी ( निर्माता ) – 1986
व्ही. शांताराम ( अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता ) – 1985
सत्यजित रे ( दिग्दर्शक ) – 1984
दुर्गा खोटे ( अभिनेत्री ) – 1983
एल व्ही प्रसाद ( अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता ) – 1982
नौशाद ( संगीतकार ) – 1981
जयराज ( अभिनेता व दिग्दर्शक ) – 1980
सोहराब मोदी ( अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता ) – 1979
रायचंद बोराल ( संगीतकार व दिग्दर्शक ) – 1978
नितीन बोस ( दिग्दर्शक व लेखक )  – 1977
कानन देवी ( अभिनेत्री ) – 1976
धीरेंद्रनाथ गांगुली ( अभिनेता व दिग्दर्शक ) – 1975
बी एन रेड्डी ( दिग्दर्शक ) – 1974
सुलोचना ( अभिनेत्री ) – 1973
पंकज मलिक ( संगीतकार ) – 1972
पृथ्वीराज कपूर ( अभिनेता ) – 1971 ( मरणोत्तर )
वीरेंद्र नाथ सरकार ( निर्माता ) – 1970
देविका राणी ( अभिनेत्री ) – 1969