दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४ – १८८२) Dadoba Pandurang Tarkhadkar

दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४ – १८८२)
Dadoba Pandurang Tarkhadkar

1. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबई येथे झाला.
2. त्यांचे मूळ गाव पालघर ( पूर्वीचा ठाणे जिल्हा ) जिल्हयातील वसई जवळील तर्खड हे होते.
3. तर्खडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले.
4. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी शिक्षण सुरु असतानाच मराठी भाषेचे व्याकरण हे महत्वपुर्ण पुस्तक लिहीले.
5. दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. तर विष्णु शास्त्री चिपळुणकर  मराठी भोषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात.
5. प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे दादोबा तर्खडकरांचे मोठे बंधू होते. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते.
6. १८३७ मध्ये माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी पारशी भाषेचा अभ्यास केला.
7. १८४४ मध्ये तर्खडकरांनी सुरत येथे मानवधर्म सभा व १८४८ मध्ये ज्ञानप्रसारक सभा या सभांची स्थापना केली.
8. १८५७ च्या उठावाच्यावेळी नोकरीच्या निमीत्ताने अहमदनगर येथे असताना तर्खडकरांनी भिल्लांचे बंड मोडून काढले. त्यांच्या या महत्वपुर्ण कामगिरी बद्दल ब्रिटीश सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली.
9. मोरोपंतांच्या केकावली या ग्रंथावर टिका करण्याकरीता तर्खडकरांनी लिहीलेला यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ म्हणजे मराठी समिक्षेची सुरुवात होय.
10. चरित्र व आत्मचरित्र हे दादोबा पांडुरंग यांचे आत्मचरित्र्य आहे. तर्खडकरांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्युनंतर १९४७ मध्ये प्रकाशित झाले.
11. २२ जुन १८४४ रोजी त्यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. तसेच त्यांनी १८५९ मध्ये परमहंस सभा मुंबई येथे स्थापन केली.
12. १८४८ मध्ये मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन करुन त्या सभेचे अध्यक्षपद दादोबांना दिले.
13. मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहीली. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख लिहीला.
14. १८१६ मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालक पदी शासनाने त्यांची नेमणूक केली.
15. १८५२ मध्ये डेप्युटी कलेक्टर या पदावर शासनाने त्यांची नेमणूक केली.
16. डेप्युटी कलेक्टर पदावरून निवृत्त झाल्यावर तर्खडकरांनी बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केले.
17. तर्खडकरांनी सुरत येथील एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले.
18. १७ ऑक्टोबर १८८२ रोजी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन झाले.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी पुढील ग्रंथ लिहिले :
1) मराठी भाषेचे व्याकरण
2) शिशिबोध
3) मराठी नकाशांचे पुस्तक
4) मराठी लघु व्याकरण
5) विद्येच्या लाभाविषयी.
6) धर्म विवेचन
7) यशोदा पांडुरंगी
8) परमहंसीक ब्राह्मण धर्म