DOCUMENTS REQUIRED FOR DOCUMENTS VERIFICATION

Documents Required for Documents Verification
डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशन साठी लागणारे डॉक्युमेंट्स

लेखी परीक्षेच्या आधारे अंतिम निवड यादी लावल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशन होत असते. डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशनसाठी पुढील डॉक्यूमेंट्सची आवश्यकता असते.

1. स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र : आधारकार्ड / पॅन कार्ड / निवडणूक आयोगाने दिलेले आय कार्ड / पासपोर्ट

2. अर्जामधील नमूद केलेल्या पत्त्यावर राहात असल्याबाबतचा पुरावा म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र

3. जन्म तारखेचे प्रमाणपत्र : जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र

4. जात प्रमाणपत्र  ( caste certificate )

5. जात वैधता प्रमाणपत्र ( caste validity )

6. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे ( नॉन क्रिमीलेअर ) सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र

7. अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate )

8. एस. एस. सी. ( दहावी ) मार्क्सशिट व सर्टिफिकेट

9. एच. एस. सी. ( बारावी ) मार्क्सशिट व सर्टिफिकेट

10. पदविका किंवा पदवी मार्क्सशिट व सर्टिफिकेट

11. इतर सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र

12. MS – CIT certificate / मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र.

13. अंशकालीन / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / खेळाडू / माजी सैनिक / अपंग / अनाथ यापैकी असल्यास जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.

14. निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडून प्रमाणपत्र.

15. कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड झाली असेल तरच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचे शासन मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.

16. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

17. स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो

18. अनुभव प्रमाणपत्र ( आवश्यकता असेल तरच जोडावे )

19. EWS Certificate

वरील सर्व डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सचे दोन सेट करावेत. प्रत्येक झेरॉक्सच्या खाली स्वतःची सही करावी.