GATI SHAKTI YOJNA गती शक्ती योजना

गती शक्ती योजना

गती शक्ती योजनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 ऑक्टोंबर 2021 या दिवशी झाली. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 या दिवशी लाल किल्ल्यावर भाषण करताना केली होती.

ही योजना रेल्वे व रस्त्यांसह 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे. हा डिजिटल मंच पुढील तीन संस्थांनी एकत्र येऊन तयार केला आहे : माहिती सूचना व प्रसारण मंत्रालय, भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ अनुप्रयोग व भू सूचना विज्ञान संस्था.

गती शक्ती योजनेअंतर्गत संपूर्ण देशासाठी हॉलिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया रचणारा एक मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. हा प्लॅन भारतातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मदत करेल. संपूर्ण देशामध्ये होणाऱ्या रेल्वे व रस्ते प्रकारच्या दळणवळणाध्ये समन्वय साधण्याच काम या योजनेमार्फत केले जाणार आहे.

या योजने मार्फत तयार करण्यात येणारा डिजिटल मंच उद्योगधंद्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील महत्त्वाचं ठरणार आहे. भविष्यात आर्थिक क्षेत्रांच्या निर्मितीसाठी नवीन संधी विकसित करण्यास देखील याची मदत होणार आहे.

ही योजना 100 लाख कोटी रुपये किमतीची आहे. या योजनेअंतर्गत येणार्‍या 16 मंत्रालयांनी 2024 – 25 पर्यंत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांना जीआयएस मोडमध्ये टाकले आहे.

गती शक्ती योजनेची उद्दिष्टे :
1) सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करणे.
2) नवीन आर्थिक क्षेत्र विकसित करणे.
3) स्थानिक निर्मात्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल.
4) युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
5) पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार करणे.
6) दळणवळणाच्या साधनांमध्ये ताळमेळ ठेवणे.
7) या योजनेचा मुख्य उद्देश विविध प्रकल्पांना संपर्काच्या माध्यमातून मजबुती देण्याचा आणि एकीकृत करण्यासह समन्वय करण्याचा राहणार आहे.
8) उद्योगधंद्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत करणे.
9) अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प एकाच वेळी योजनाबद्ध पद्धतीने कार्यान्वित करणे.