आरोग्यशास्त्र || Arogyashastra || Health Science
१) पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.
२) डाळी, मांस, यांमध्ये प्रथिने असतात.
३) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.
४) भुईमूग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते.
५) व्यक्तींच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते.
६) अन्नघटकांच्या कमतरतेमुळे काही विकार होतात, त्यांना त्रुटीजन्य विकार म्हणतात.
७) रातांधळेपणा ‘ए’ जीवसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
८) गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध यांमध्ये ‘ए’ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असते.
९) ‘बी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे इ. आजार होतात.
१०) ‘सी’ जीवनसत्वांच्या कमतरतमुळे हिरडयांतून रक्त जाणे इ. आजार होतात.
११) ‘डी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे पायाची हाडे वाकणे, पाठीचा बाक येणे इ.आजार होतात.
१२) ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा कोरडी व खवलेयुक्त होते. त्याला ‘झिरोडर्मा’ म्हणतात.
१३) थायमिन (ब-१) च्या अभावामुळे बेरी-बेरी नावाचा रोग होतो.
१४) पेलाग्रा हा रोग नायसीन (ब-३) च्या अभावामुळे उद्भवतो.
१५) ‘क’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘स्कर्ही’ हा रोग होतो.
१६) सामान्यतः स्कहीं हा रोग अर्भकांमध्ये आढळतो.
१७) लोहाच्या अभवामुळे रक्तक्षय (अॅनिमिया) होतो.
१८) ‘ड’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘मुडदूस’ रोग होतो.
१९) मधुमेह या रोगामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.
२०) रक्त-ग्लुकोज पातळी ‘इन्सुलिन’ या संप्रेरकामुळे नियंत्रित केली जाते.
२१) संतृप्त स्निग्ध पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मधुमेह, धमनीकाठिण्य, उच्च रक्तदाब इ.रोग होतात.
२२) मीठ आणि साखर हे खाद्यपदार्थ टिकवणारे पदार्थ आहेत.
२३) वाळवणे, थंड जागी ठेवणे, आरवणे अशा पध्दतींनी अन्नपदार्थ टिकवतात.
२४) रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात.
२५) एकाच वेळी अनेकांना लागण होणाऱ्या रोगांना साथीचे रोग म्हणतात.
२६) रोगी व्यक्तीच्या सहवासामुळे होणाऱ्या रोगांना साथीचे रोग म्हणतात.
२७) टायफॉईड, कॉलरा, जुलाब हे आतडयाचे रोग आहेत.
२८) कावीळ, हगवण, कॉलरा, टायफॉईड, पोलिओ इ. रोगांचा प्रसार पाण्याच्या माध्यमातून होतो.
२९) घटसर्प हा घशाचा रोग आहे.
३०) फुफ्फुसाच्या व घशाच्या रोगाचा प्रसार हवेच्या माध्यमातून होतो.
३१) खरूज, नायटा यासारखे त्वचेचे रोग स्पर्शामुळे होतात. त्यांना संपर्कजन्य रोग म्हणतात.
३२) डास, पिसू व काही कीटकांच्या माध्यमातूनही रोगप्रसार होतो.
३३) अमांश आणि मलेरिया हे रोग आदिजीवजन्य आहेत.
३४) अमांश रोग एन्टमिबा हिस्टोलिटिका आदिजीवांमुळे होतो.
३५) मलेरिया रोग प्लासमोडिअम या आदिजीवांमुळे होतो.
३६) घटसर्प रोग कोरिनेबॅक्टेरिअम दंडाणूमुळे (जीवाणू) होतो.
३७) मेनिंगोकोकस गोलाणूंमुळे (जीवाणू) मेनिंजायटिस रोग होतो.
३८) घटसर्प, मेनिंजायटिस, कॉलरा, क्षय, विषमज्वर इ. जीवाणूंमुळे होणारे रोग आहेत.
३९) पोलिओमायेलायटिस, गोवर, कांजिण्या, हगवण, सर्दी इ. विषाणूंमुळे होणारे रोग आहेत.
४०) कुत्र्याला होणारा रेबीज रोग विषाणूजन्य आहे.
४१) सर्दी, एन्फ्लुएंझा विषाणूमुळे होणारे रोग आहेत.
४२) उंदरावरील पिसा प्लेग हा रोग मानवात पसरवतात.
४३) मलेरिया रोगाचा प्रसार अॅनॉफिलिस जातीच्या मादी डासातून होतो.
४४) पेनिलिसीन प्रतिजैविकांमुळे घटसर्प, न्युमोनिया इ.रोगजंतू मरतात.
४५) क्लोरोमायसेटिन प्रतिजैविकांमुळे विषमज्वराचे रोगजंतू नाहीसे होतात.
४६) स्टेप्टोमायसिन प्रतिजैविकांमुळे क्षय रोगांचे रोगजंतू नाहिसे होतात.
४७) तंबाखुमध्ये निकोटिन हे उत्तेजक द्रव्य असते.
४८) जिभेचा शेंडा – गोड चव.
४९) जिभेच्या कडा – खारट व आंबट चव.
५०) जिभेच्या पाठीमागील भाग – कडू चव.
५१) हत्तीरोग क्युलेक्स नावाचा डास चावल्याने होतो.
५२) कुष्ठरोग हा रोग मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जीवाणूंपासून होतो.
५३) कर्करोगात पांढऱ्या पेशींची अमर्यादित वाढ होते.
५४) ‘ई’ जीवसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो.
५५) देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी लावला.
५६) डॉ.हन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला.
५७) पांढऱ्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात.
५८) बी.सी.जी लस घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या रोगांसाठी दिली जाते.