भारतीय राज्यघटनेतील 12 अनुसूच्या

अनुसूच्या

भारतीय राज्यघटनेतील अनुसूच्या.
Indian Constitution Schedule.

अनुसूची पहिली – राज्य, संघ राज्यक्षेत्र
अनुसूची दुसरी – राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यभा सभापती, उपसभापती, राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती व उपसभापती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याबाबत तरतुदी.
अनुसूची तिसरी – शपथ/प्रतिज्ञांचे नमूने
अनुसूची चौथी – राज्यसभेतील जागांची वाटणी.
अनुसूची पाचवी – अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण
अनुसूची सहावी आसाम, मेघालय व त्रिपूरा या राज्यांमधील व मिझोराम या संघ राज्यक्षेत्रांमधील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी.
अनुसूची सातवी – संघ, राज्य व समवर्ती सूची.
अनुसूची आठवी – भाषा
अनुसूची नववी – विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राहय करणे.
अनुसूची दहावी पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी.
अनुसूची अकरावी पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या.
अनुसूची बारावी – नगरपालिका, इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या
भारतीय राज्यघटनाः एकदृष्टिक्षेप
# सर्वप्रथम भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी सन १९१९ साली अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आली.
#भारतमंत्री लॉड बर्कनहेड यांनी भारतीयांनी एकत्र येऊन भारतासाठी राज्यघटना तयार करावी, असे आवाहन केले.
# भारतातील सर्व राजकीय पक्षांनी लॉर्ड बर्कनहेड यांचे आव्हान स्विकारले व भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती स्थापन केली.
# कॅबिनेट मिशनच्या (त्रिमंत्री शिष्टमंडळ) शिफारशीनुसार भारतात जुलै १९४६ मध्ये भारतीय घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
# दिल्ली येथे घटना परिषदेची (समितीची) पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. (२०९ सदस्य उपस्थित होते.)
# घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते.
# डॉ.राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
# डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
# २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय जनतेने (घटना समिती मार्फत) भारताची राज्यघटना संमत व स्वीकृत केली.
# २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. म्हणून २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतात.
# राज्यघटना निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवस (१८ दिवस) इतका कालावधी लागला.
# डॉ.बी.एन. राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते.
# पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली.
# उद्देशपत्रिकेला राज्यघटनेची गुरूकिल्ली असे म्हणतात.
# प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांनी घटना समितीच्या सदस्यांची निवड केली.
# १४ ऑगस्ट १९४७ च्या ठरावानुसार संविधानसभा (घटना समिती) सार्वभौम झाली.
# भारतीय राज्यघटनेने इतर देशांच्या राज्यघटनांकडून घेतलेली तत्वे.
इंग्लंड (ब्रिटन)  – संसदीय लोकशाही
कॅनडा, अमेरिका – संघराज्य
फ्रान्स, अमेरिका – मुलभूत हक्क
आयर्लंड, म्यानमार – मार्गदर्शकतत्वे
जपान, रशिया – मुलभूत कर्तव्ये
कॅनडा – संघसूची
ऑस्ट्रेलिया – समवर्ती सूची
अमेरिका – न्यायिक पुनर्विलोकन
दक्षिण आफ्रिका – घटना दुरूस्ती
रशिया – पंचवार्षिक योजना, समाजवाद
जर्मनी – पंचवार्षिक योजना, समाजवाद
ब्रिटन (इंग्लंड) – घटनात्मक उपाय योजनांबाबत तरतूद.
# सुरूवातीला (मुळ) भारतीय राज्यघटनेत ३९५ कलमे व ८ परिशिष्टये होती.
# सध्या भारतीय राज्यघटनेत ४४४ कलमे, १२ परिशिष्टये व २६ भाग (प्रकरणे) आहेत.
# घटना समितीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष- सरदार वल्लभभाई पटेल.

1 COMMENT

Comments are closed.