महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१)
Mahadev Govind Ranade
1) न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवरी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला.
2) रानडे यांच्या वडिलांचे नाव गोविंद व आईचे
नाव गोपीकाबाई होते.
3) न्या. रानडे यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे पुर्ण केले.
4) १८५६ मध्ये पुढील शिक्षणसाठी ते मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज मध्ये गेले.
5) १८६२ मध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयामध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले. याच वर्षी इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संपादकपद न्या. रानडे यांच्याकडे आल्ले.
6) १८६५ मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. (१८९३ रोजी महर्षी कर्वे यांनी पुणे येथे “विधवा उत्तेजक मंडळी’ या नावाने संस्था स्थापन केली)
7) १८६६ साली मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची नेमणुक केली होती. याच वर्षी न्या. रानडे यांनी LLB करीता प्रवेश घेतला.
8) १८६८ मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते इतिहास व इंग्रजी विषय शिकवू लागले.
9) १८७१ मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामध्ये न्या. रानडे यांनी महत्वपर्ण भुमिका बजावली होती.
10) ३१ मार्च १८७६ रोजी न्या. रानडे, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, डॉ. रा. गो. भंडारकर या सर्वांनी मिळून मुंबई येथे प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना केली. तसेच भारतीय सामाजिक परीषद या महत्वपूर्ण संस्थेची स्थापना न्या. रानडे यांनी केली होती.
11) ११ मे १८७८ रोजी पुणे मधील हिराबाग येथे न्या. रानडे यांच्या पुढाकाराने भारतातील पहिले साहित्य संमेलन भरविण्यात आले. या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न्या. महादेव गोविंद रानडे यांनीच भुषविले. १८८५ मध्ये दुसरे साहित्य संमेलन पुणे येथेच भरविण्यात आले होते व मे १९०५ मध्ये तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे भरविण्यात आले. तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद र. गो. करंदिकर यांनी भुषविले होते.
12) १८८५ मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांना मुंबई कायदे काऊन्सीलवर कायद्याचे सल्लागार म्हणून नियुक्त केले.
13) १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ही रानडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
13) १८८५ मध्ये त्यांनी सामाजिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले व १८९० मध्ये त्यांनी औद्योगिक परीषदेचे अध्यक्षपद भुषविले.
14) म. गो. रानडे यांना हिंदी अर्थशास्त्रचा जनक असे म्हणतात.
15) भारताच्या स्वातंत्र पूर्व काळातील मवाळवादी विचारसरणीचे प्रमुख नेते म्हणुन न्या. रानडे यांना ओळखले जातात.
16) विवीध न्यायालायांमध्ये न्या. रानडे यांनी न्यायाधिश म्हणून काम केले होते.
17) १८९३ मध्ये ब्रिटीश शासनाने न्या. रानडे यांची मुंबई उच्च न्यायालायाचे मुख्य न्यायाधिश म्हणून नेमणूक केली होती.
18) न्या. रानडे यांनी वृत्कृत्तोजक सभेची स्थापना केली. याच सभेच्या माध्यमातून पुणे येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
19) रानडेंनी पुणे येथे नेटिव्ह जनरल लॅयब्ररी ची स्थापना केली.
20) न्या. रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) हा महत्वपुर्ण ग्रंथ लिहीला. तसेच
त्यांनी एस्से इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे या नावाने अर्थशास्त्र विषयक ग्रंथही लिहीला.
21) १६ जानेवारी १९०१ रोजी म. गो. रानडे यांचे निधन झाले.
22) न्या. के. टी. तेलंग हे न्या. म. गो. रानडे यांचे राजकीय गुरु होते.
23) न्या. म. गो. रानडे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु होते.
24) गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते.