MUHS ACT 1998 in Marathi

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998

 

कलम               कशाशी संबंधित आहे
1.          संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व लागू होणे.
2.          व्याख्या
3.          विद्यापीठाची स्थापना व विधिद्वारा संस्थापन
4.          विद्यापीठाची उद्दिष्टे
5.          विद्यापीठाचे अधिकार व कर्तव्य
6.          विद्यापीठाची अधिकारिता आणि त्यांचे विशेषाधिकार बहाल करणे
7.          स्त्री – पुरुष भेद, पंथ, वर्ग, जात, जन्मस्थान, धर्म किंवा मतप्रणाली इत्यादी काहीही असली तरी विद्यापीठ सर्वांना खुले असणे.
8.          शासकीय महाविद्यालयांचे विद्यापीठाकडे हस्तांतरण
9.          शासनाचे नियंत्रण
10.         कुलपती आणि त्यांचे अधिकार
11.         प्रतिकुलपती
12.         विद्यापीठाचे इतर अधिकार
13.         कुलगुरू व प्रति-कुलगुरु
14.         कुलगुरूची नियुक्ती
15.         प्रति-कुलगुरुची नियुक्ती करण्याची रीत
16.         कुलगुरुचे अधिकार व कर्तव्य
17.         विद्याशाखांचे अधिष्ठाते
18.         कुलसचिव
19.         परीक्षा नियंत्रक
20.         वित्त व लेखा अधिकारी
21.         अधिकारी, प्राधिकरणाचे, निकायाचे सदस्य आणि विद्यापीठाचे कर्मचारी हे लोकसेवक असल्याचे मानण्यात येणे.
22.         विद्यापीठाची प्राधिकरणे
22 अ.     विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य होण्यासाठी पात्रता अटी विनिर्दिष्ट करण्याकरिता शासनाचे अधिकार
23.         अधिसभा
24.         अधिसभेच्या बैठकी
25.         अधिसभेचे अधिकार व कामे
26.         व्यवस्थापन परिषद
27.         व्यवस्थापन परिषदेचे अधिकार व कर्तव्य
28.         विद्यापरिषद
29.         विद्यापरिषदेचे अधिकार व कर्तव्य
30.         परीक्षा मंडळ
31.         परीक्षा मंडळाचे अधिकार व कर्तव्य
32.         विद्याशाखा
33.         विद्याशाखेचे अधिकार व कर्तव्ये
34.         नियोजन मंडळ
35.         नियोजन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये
36.         अभ्यास मंडळ
37.         अभ्यास मंडळाचे अधिकार आणि कर्तव्ये
38.         प्राधिकरणांचे अधिकार, कामे व कर्तव्ये
39.         प्राधिकरणाच्या सदस्यांचा पदावधी
40.         सदस्यत्वाची समाप्ती
41.         प्राधिकरणाच्या सदस्यत्वासाठी निरर्हता
42.         लागोपाठच्या दुसऱ्या मुदतीकरता सदस्य असण्यास अपात्र
43.         प्राधिकरणाच्या निर्णयाची निर्णायकता
44.         प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे निवडणूक घेणे
45.         सदस्यत्वाचा राजीनामा आणि प्रासंगिक रिक्त पद भरणे
46.         प्राधिकरणांची बैठक
47.         प्रासंगिक रिक्त पद व ते स्थायी समितीने भरणे
48.         परिनियम
49.         परिनियम कसे करावयाचे
50.         आदेश व त्यांचा विषय
51.         आदेश व ते तयार करणे
52.         विनियम व नियम
53.         गाऱ्हाणी निवारण समिती
54.         प्रवेश
55.         परिक्षा
56.         निकाल जाहीर करणे
57.         कार्यक्रम पत्रिकेचे पालन न केल्यामुळे परीक्षा अवैध ठरणार नाही.
58.         क्रीडा व अभ्यासेतर कार्यक्रम
59.         समित्या
60.         विद्यापीठ अध्यापकांची निवड व नेमणूक
61.         विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी आणि सलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी, अध्यापकांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी निवड समित्या.
62.         समित्या
63.         संलग्नीकरण व मान्यता याकरिता शर्ती
64.         परवानगी संबंधीची कार्यपद्धती
65.         संलग्नीकरण करण्यासाठी कार्यपद्धती
66.         संस्थांना मान्यता देण्याची कार्यपद्धती
67.         संलग्न महाविद्यालयांची स्थानिक व्यवस्थापन किंवा सल्लागार समिती
68.         संलग्नीकरण किंवा मान्यता चालू ठेवणे
69.         संलग्नीकरण किंवा मान्यता यांच्या व्याप्तीमध्ये वाढ करणे
70.         स्थायी संलग्नीकरण व मान्यता
71.         स्वायत्त विभाग किंवा संस्था किंवा महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त संस्था
72.         महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांचे निरीक्षण व अहवाल
73.         संलग्नीकरण किंवा मान्यता काढून घेणे
74.         महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त संस्था बंद करणे
75.         पदव्युत्तर अध्यापन व संशोधन
76.         विद्यार्थ्यांची नावनोंदणी
77.         शिस्तविषयक अधिकार व विद्यार्थ्यांमधील शिस्त
78.         पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक  विशेषोपाधी
79.         सन्मानाच्या पदव्या
80.         दीक्षांत समारंभ
81.         नोंदणीकृत पदवीधर
82.         पदवीधरांच्या नोंदवहीतून नाव काढून टाकणे
83.         वार्षिक वित्तीय अंदाज
84.         विद्यापीठ निधी
85.         वार्षिक लेखे व लेखा परीक्षा
86.         वार्षिक अहवाल
87.         नुकसानीबद्दल प्राधिकरण आणि अधिकारी जबाबदार असणे.
88.         राज्य विधानमंडळाचे व संसदेचे सदस्यत्व
89.         अर्थविष्कारासंबंधातील प्रश्न आणि विद्यापीठ प्राधिकरण किंवा निकाय इत्यादींच्या रचनेसंबंधातील विवाद.
90.         कृती व आदेश यांचे संरक्षण
91.         अधिकाराचे प्रत्यारोपण
92.         कृती व कार्यवाही ही रचनेतील दोष, रिक्त पदे, कार्यपद्धतीतील नियमबाह्यता इत्यादी या केवळ कारणावरून विधिअग्राह्य नसणे.
93.         पहिल्या कुलगुरूचे संक्रमणकालीन अधिकार
94.         विद्यापीठाचे विशेषाधिकार देण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश
95.         इतर अधिनियमांवर हा अधिनियम अधिभावी असणे
96.         अडचण दूर करणे
97.         सन 1998 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 11 याचे निरसन व व्यावृत्ती अनुसूची

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998 मधील प्रकरणांची माहिती :
या कायद्यामध्ये एकूण 13 प्रकरणे आहेत.

प्रकरण               कशाशी संबंधित आहे
प्रकरण एक          प्रारंभिक ( कलम 1 व 2 )
प्रकरण दोन          विद्यापीठ ( कलम 3 ते 9 )
प्रकरण तीन          विद्यापीठाचे अधिकारी ( कलम 10 ते 21 )
प्रकरण चार          विद्यापीठाची प्राधिकरणे ( कलम 22 ते 47 )
प्रकरण पाच          परिनियम, आदेश, नियम व विनिमय ( कलम 48 ते 52 )
प्रकरण सहा          अध्यापक आणि कर्मचारी ( कलम 53 )
प्रकरण सात          प्रवेश, परीक्षा व विद्यार्थ्यांची संबंधित इतर बाबी ( कलम   54 ते 58 )
प्रकरण आठ         समित्या ( कलम 59 ते 62 )
प्रकरण नऊ          परवानगी, संलग्नीकरण व मान्यता ( कलम 63 ते 74 )
प्रकरण दहा          नावनोंदणी, पदव्या व दीक्षांत समारंभ ( कलम 75 ते 82 )
प्रकरण अकरा       विद्यापीठ निधी, लेखे व लेखापरीक्षा ( कलम 83 ते 86 )
प्रकरण बारा         संकिर्ण ( कलम 87 ते 92 )
प्रकरण तेरा          संक्रमणात्मक तरतूद ( कलम 93 ते 97 )

  1. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी 3 जून 1998 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अध्यादेश 1998 हा प्रख्यापित केला होता. ( काढला होता ).
  2. दिनांक 20 जुलै 1998 रोजी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विधेयक, 1998 ( 1998 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 ) हे वरील अध्यादेशाचे राज्य विधान मंडळाच्या अधिनियमांमध्ये रूपांतर करण्याकरिता दिनांक 21 जुलै 1998 रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडण्यात आले.
  3. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विधेयक 1998 हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 30 जुलै 1998 रोजी संमत करण्यात आले.
  4. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विधेयक 1998 हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 7 ऑगस्ट 1998 रोजी सुधारणांसह संमत करण्यात आले.
  5. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वरील अध्यादेश मागे घेऊन व निरसित करून त्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 1998 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ( चालू ठेवणे ) अध्यादेश, 1998 भूतलक्षी प्रभावाने म्हणजेच दिनांक 3 जून 1998 पासून प्रख्यापित केला.
  6. वरील अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 हा अधिनियम3 जून 1998रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येते.
  7. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 या अधिनियमास महाराष्ट्राच्या राज्यपालांची दिनांक 21 जानेवारी 1999 रोजी अनुमती मिळाली.
  8. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 हा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार, असाधारण यामध्ये दिनांक 21 जानेवारी 1999 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
  9. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये एकूण 13 प्रकरणे 97 कलमे आहेत. 22  या पोट कलमाचा विचार केल्यास एकूण 98 कलमे आहेत.