MHADA EXAM PREVIOUS QUESTION PAPER 3/2/2022

MHADA QUESTION PAPER

EXAM DATE – 3 फेब्रुवारी 2022

1. मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असलेले ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

2. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

3. काळा कायदा असे कोणत्या कायद्याला म्हटले होते ?
रोलेट कायदा

4. लक्ष्मणशास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही पदवी कोणी दिली आहे ?
शासकीय संस्कृत महाविद्यालय, कोलकाता

5. पुण्यातील भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?
महात्मा ज्योतिबा फुले

6. पंचशिल तत्वाचे जनक कोण आहेत ?
पंडित जवाहरलाल नेहरू

7. अवचेतन या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
चैतन्य विरहित

8. कुत्रे या शब्दाचे लिंग ओळखा.
नपुंसक लिंग

9. त्याने हरणास धरले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
भावे प्रयोग

10. कोणत्या प्रयोगातील वाक्याचा कर्ता प्रथमा विभक्ती मध्ये असतो ?
कर्तरी प्रयोग

11. मुलगा चेंडू खेळतो. या वाक्यातील कर्ता ओळखा.
मुलगा

12. तू पुस्तक वाच. या वाक्याचा प्रकार ओळखा.
आज्ञार्थी वाक्य

13. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहितात ?
देवनागरी लिपी ( बाळबोध लिपी )

14. नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
आस्तिक

15. श्वशुर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
सासरा

16. वासरु या शब्दाचे अनेकवचन सांगा.
वासरे

17.किरण चपाती खातो. या वाक्याचे रूपांतर रिती भूतकाळात करा.
किरण चपाती खात असे.

18. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?
प्रल्हाद केशव अत्रे

19. पालापाचोळा या शब्दाचा समास ओळखा.
समाहार द्वंद्व समास