मिशन इंद्रधनुष्य

मिशन इंद्रधनुष्य योजना

मिशन इंद्रधनुष्य या योजनेची सुरूवात 25 डिसेंबर 2014 या दिवशी झाली.

ही योजना सुरू झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते, तर भारताचे आरोग्य मंत्री जेपी नड्डा हे होते.

मिशन इंद्रधनुष्य ही योजना शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालक आणि गरोदर महिला यांच्यासाठी आहे.

2020 पर्यंत दोन वर्षापर्यंतची बालके आणि गरोदर महिला यांचे 90% लसीकरण पूर्ण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते.

भारतातील ज्या जिल्ह्यांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये लसीकरण झाले होते असे त्यावेळी 201 जिल्हे निवडण्यात आले होते आणि त्या 201 जिल्ह्यांमध्ये मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू करण्यात आली.

महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि बारा महानगरपालिकांमध्ये मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू आहे. महाराष्ट्रातील सात जिल्हे पुढील प्रमाणे आहेत : नाशिक, धुळे, जळगाव, ठाणे, नांदेड, हिंगोली व बीड.

ही योजना सुरू झाली तेव्हा फक्त सात आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला होता. सात आजार पुढील प्रमाणे आहेत : क्षयरोग (TB ), गोवर ( Measles ), कावीळ ब ( Hepatitis B ), पोलिओ ( Polio ), घटसर्प ( Diptheria ), डांग्या खोकला ( Pertussis or Whooping Cough ), धनुर्वात ( Tetanus ).

नंतरच्या कालावधीत अजून चार आजारांचा समावेश मिशन इंद्रधनुष्य या योजनेमध्ये करण्यात आला. ते चार आजार पुढीलप्रमाणे आहेत : जपानी मेंदूज्वर, सुधारित पोलिओ लस , रोटाव्हायरस लस , गोवर रुबेला लस.

सध्या मिशन इंद्रधनुष्य या योजनेअंतर्गत एकूण अकरा आजारांवर लसी दिल्या जातात.

काही निवडक राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) या आजारांवरील लसी सुद्धा या योजनेअंतर्गत दिल्या जातात.

मिशन इंद्रधनुष्य योजनेचा पहिला टप्पा : या योजनेचा पहिला टप्पा जानेवारी 2015 ते जून 2015 असा होता पण तो ऑगस्ट 2015 पर्यंत राबविण्यात आला.

मिशन इंद्रधनुष्य योजनेचा दुसरा टप्पा : 7 ऑक्टोबर 2015 या दिवशी या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यामध्ये चार आजारांचा समावेश नव्याने या योजनेमध्ये करण्यात आला.

मिशन इंद्रधनुष्य योजनेचा तिसरा टप्पा : फेब्रुवारी 2021 मध्ये या योजनेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला. कोविड – 19 या महामारी मुळे ज्या बालकांना आणि गरोदर महिलांना नियमित लसीकरण मिळाले नाही त्यांचे लसीकरण करणे हे उद्दिष्ट आहे.