महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा-अभ्यासक्रम

MPSC Group C Syllabus In Marathi

Maharashtra Gr.C Services Examination

महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा-अभ्यासक्रम 

परीक्षेचे टप्पे :
१) पूर्व परीक्षा – १०० गुण
पूर्व परिक्षेला सर्व पदांचा एकच संयुक्त पेपर असतो.
२) मुख्य परीक्षा – २०० गुण 
मुख्य परिक्षेला दोन पेपर असतात. पेपर क्र.-१ सर्व पदांचा संयुक्त असतो व पेपर क्र.२- प्रत्येक पदाचा स्वतंत्र असतो.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा

Maharashtra Gr.C Services Combined (Pre) Examination
परीक्षा योजना:-
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक.
विषय व संकेतांक : सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. ०१२)
दर्जा : बारावी
माध्यम : इंग्रजी – मराठी
प्रश्न संख्या : १००
एकूण गुण : १००
कालावधी : एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पूर्व परिक्षेचा अभ्यासक्रम:-
१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
२) नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५) अर्थव्यवस्था:भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७) बुध्दिमापन चाचणी व अंकगणित :
बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
————————————–
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा
Maharashtra Gr.C Services (Main) Examination
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (मुख्य) परीक्षा
Excise Sub Inspector, Gr.C (Main) Exam
परीक्षा योजना
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन.
एकूण गुण – 200
पेपर क्र.1 (संयुक्त पेपर) – 100 गुण ( मराठी 60 गुण, इंग्रजी 40 गुण ), मराठीचा दर्जा बारावी, इंग्रजीचा दर्जा पदवी. कालावधी एक तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, प्रश्न संख्या : 100.
पेपर क्र.2 (स्वतंत्र पेपर) – 100 गुण, सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान, दर्जा : पदवी, माध्यम : मराठी व इंग्रजी, कालावधी एक तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी,
प्रश्न संख्या : 100.
                           पेपर क्रमांक – 1 चा अभ्यासक्रम
१. मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
२. इंग्रजी : – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their
meaning and comprehension of passage.
                          पेपर क्रमांक – 2 चा अभ्यासक्रम
1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
2. अधिमापन चाचणी – हमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
3. भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाचो मार्गदर्शक तत्वे शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ, विधानसभा, विधानपरिषद या त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
4. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५
5. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्यूनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नाॅलाॅजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व
त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम. जसे मिडीया लॅब, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
6. मानवी हक्क बजमावदान्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील संदर्भ, भारतातील मानवी हक्क व जवाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, समाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या
अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षणअधिनियम, १९५५,  मानवी हक्क संरक्षण अधिन्विन, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) आधनियम, १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
7. The Bombay Prohibition Act, 1949
8. The Maharashtra Excise Manual, Volume  l
9. The Maharashtra Excise Manunl, Volume-IIl
10. The Prohibition and Excise Manaul, Volume-II

5 COMMENTS

Comments are closed.