मुलकी प्रशासन MULKI PRASHASHAN

मुलकी प्रशासन

१) प्रशासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत – महसुल प्रशासन, नागरी प्रशासन, मुलकी प्रशासन, पोलीस प्रशासन, लष्करी प्रशासन
२) मुलकी प्रशासन किंवा नागरी प्रशासन महसुल प्रशासनामार्फत चालवले जाते.
३) महसुल म्हणजेच कर होय. महसुल किंवा कर शासनाच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन असते.
४) महाराष्ट्रामध्ये महसुल किंवा कर गोळा करण्यासाठी जे प्रशासन असते त्यास महसुल प्रशासन असे म्हणतात.
५) महाराष्ट्रामध्ये मुलकी प्रशासन पुढील प्रकारे आहे.
मंत्रालय → प्रशासकीय विभाग → जिल्हा → उपविभाग/प्रांत → तालुका →गट →गण → गांव
• मंत्रालयः मुलकी/नागरी/महसुल प्रशासनाचा मंत्रालयातील सर्वोच्च प्रमुख महसुल मंत्री असतो.
• प्रशासकीय विभागः प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची विभागणी सहा प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आलेली आहे – १) कोकण २) पूणे ३) नाशिक ४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर
१) काही जिल्हयांचा मिळून एक प्रशासकीय विभाग तयार होतो.
२) विभागीय आयुक्त प्रशासकीय विभागाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
• विभागीय आयुक्तांची नेमणूकः भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य शासन विभागीय आयुक्त या पदावर करते.
• विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्येः १) तपासणी व पर्यवेक्षन २) उधळपट्टी रोखणे ३) विशेष सभा बोलावणे
४) बेकायदेशीर ठराव रद्द करणे
• विभागीय आयुक्तांचे कार्यक्षेत्रः प्रशासकीय विभागातील प्रशासन व महसुल विभाग. प्रशासकीय विभागातील महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर विभागीय आयुक्तांचे नियंत्रण असते.

जिल्हा

१) प्रशासकीय विभागाची विभागणी जिल्हयामध्ये होते.
२) साधारणपणे दोन ते तीन प्रांत किंवा उपविभागांपासून जिल्हा तयार होतो.
३) जिल्हाधिकारी हा जिल्हयाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
• जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकः
१) जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार प्रत्येक जिल्हयात एका जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते.
२) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक राज्यशासन जिल्हाधिकारी या पदावर करते.
• जिल्हाधिकाऱ्यांची थोडक्यात माहितीः
१) जिल्हाधिकारी जिल्हयाचा सर्वोच्च महसुल अधिकारी असतो.
२) जिल्हाधिकाऱ्यांनाच जिल्हा न्यायदंडाधिकारी सुध्दा म्हणतात. कारण जिल्हा पातळीवर दिवाणी खटल्यांसंदर्भात न्यायदान करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
३) जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा पदसिध्द सचिव असतो.
४) जिल्हयाचे पालकमंत्री जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे पदसिध्द अध्यक्ष असतात.
५) जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणुक अधिकारी असतात.
६) जिल्हा जनगणना अधिकारी जिल्हाधिकारीच असतात.
७) रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरील प्रमुख जिल्हाधिकारी असतात.
८) जिल्हयातील रस्तेबांधणी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात.
९) जिल्हाधिकारी हा जिल्हयातील परिवहन मंडळाचा अध्यक्ष असतो.
१०) जिल्हाधिकारी हेच जिल्हा आमसभेचे सचिव असतात.
११) जिल्हा निवड समितीचे (मंडळाचे) अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात.
• जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार व कार्ये :
१) जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे.
२) जिल्हयात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करणे,
३) जिल्ह्यात गोळीबाराचा आदेश देणे.
४) जिल्हयात स्वस्त धान्य दुकाने उघडण्यास परवागी देणे.
५) दुष्काळ आणि अवर्षण काळात सरकारच्या मान्यतेनंतर जिल्हास्तरावर शेतसारा माफ करणे,
६) जिल्हास्तरावर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करणे.

प्रांत / उपविभाग

१) जिल्हयाची विभागणी प्रांत किंवा उपविभागात होते.
२) साधारणपणे दोन ते तीन तालुक्यांचा मिळून एक प्रांत किंवा उपविभाग तयार होतो.
३) प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी हे प्रांताचे सर्वोच्च प्रमुख असतात.
• प्रांताधिकारी/उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूकः
१) उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक राज्यशासन प्रांताधिकारी या पदावर करते.
२) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची नेमणूक सुध्दा उपविभागीय अधिकारी या पदावर राज्यशासन करते
• प्रांताधिकाऱ्यांची इतर माहिती
१) प्रांताधिकारी हा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यातील दुवा असतो.
२) प्रांताधिकारी हा उपविभागीय दंडाधिकारी असतो.
३) प्रांताधिकारी हा उपविभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतो.
४) प्रांताधिकारी हा उपविभागीय निवडणुक अधिकारी असतो.

तालुका

१) उपविभागाची विभागणी तालुक्यामध्ये करण्यात येते.
२) काही गटांपासून एक तालुका तयार होतो.
३) तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च प्रमुख असतो.
• तहसिलदाराची नेमणूकः
१) महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो.
२) तहसीलदार या पदावर निवड झालेल्या अधिकाऱ्याची राज्यशासन तहसीलदार म्हणून नेमणूक करते.
• तहसिलदारासंबंधी इतर माहिती
१) तहसीलदार हे तालुका न्यायदंडाधिकारी असतात,
२) तहसीलदार हे तालुक्यातील सर्वोच्च महसुल अधिकारी असतात.
३) तहसीलदार हे तालुका निवडणुक अधिकारी असतात.
४) तहसीलदार हे तालुका जनगणना अधिकारी असतात.
५) रोजगार हमी योजनेचा तालुकास्तरावरील प्रमुख तहसीलदार असतो.
६) तहसीलदार हे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतात.
७) तहसीलदारांना मदत करण्यासाठी नायब तहसीलदार असतात.
८) नायब तहसीलदारांना मदत करण्यासाठी मंडळ अधिकारी (सर्कल ऑफीसर) असतात.
२) मंडळ अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी तलाठी असतात.
१०) तलाठयांना मदत करण्यासाठी कोतवाल असतात.