मराठी व्याकरण 25 प्रश्न
अहमदनगर जिल्हा पोलीस भरती
Ahmednagar District Police Bharti
परीक्षा दिनांक : दि. 9 एप्रिल 2017
–—————————————————————–
1 ते 25 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
26. वाटाघाटी म्हणजे …………
1) मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
2) समान वाटणी करणे
3) वाटणे व घाटणे
4) शपथ घेणे
27. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
केलेले उपकार जो जाणत नाही असा.
1) कृतज्ञ 2) कृतघ्न 3) कर्मयोगी 4) कर्मदरिद्री
28. दिलेल्या शब्दसमुहाबद्दल एक योग्य शब्द सांगा.
शत्रूला सामील झालेला.
1) सैनिक 2) शूरवीर 3) वेंधळ्या 4) फितूर
29. दिलेल्या नामासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द सांगा.
जसा पाण्याचा : खळखळाट तसा विजांचा : ?
1) खळखळाट 2) खणखणाट
3) कडकडाट 4) छनछनाट
30. दिलेल्या वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह द्या.
केवढी शुभवार्ता आणलीस तू
1) , 2) . 3) ? 4) !
31. पुरुषोत्तम या शब्दाची संधी सोडवा.
1) पुरुषा + तम 2) पुरुष + उत्तम
3) पुरुषात् + उत्तम 4) पुरुषो + त्तम
32. महा + उत्सव = ……….. ( संधी करा )
1) महोत्सव 2) महात्सव 3) महोत्सव 4) महीत्सब
33. दिलेल्या शब्दाचा संधी करा. वाग्विहार
1)वाग् + विहार 2) वाइ + विहार
३) वाक् + विहार 4) बान् + विहार
34. विद्वान या नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते ?
1) विधवा 2) विद्वानीण 3) विदुषी 4) विद्या
35. दिलेल्या शब्दांपैकी अनेकवचनी शब्द ओळखा ?
1) नदी 2) वेली 3) रोपटे 4) झाड
36. कोण काय करणार आहे माझे? या वाक्यातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करत आहे ?
1) आश्चर्य 2) तुच्छता 3) अगतिकता 4) विलक्षणपणा
37. दिलेल्या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
मी आज साखर – काकडी खाल्ली.
1) धातुसाधित विशेषण 2) सार्वनामिक विशेषण
3) नामसाधित विशेषण 4) अव्ययसाधित विशेषण
38. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा.
1) मोठा ग्रंथ 2) अकरा मुलगे
3) बारा गायी 4) पंधरा पुस्तके
39. तिने सारे धान्य निवडून ठेवले या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
1) सिध्द क्रियाविशेषण अव्यय
2) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) प्रत्ययस्पषित क्रियाविशेषण अव्यय
4) धातूसाधित क्रियाविशेषण अव्यय
40. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. या वाक्यातील “वर” या शब्दाची जात ओळखा.
1) शब्दयोगी अव्यय 2) अविकारी
3) अव्यय 4) संबंधवाचक
41. रिकाम्या जागी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे ?
……….. ! काय अवस्था झाली तुझी !
1) छान 2) अरेरे 3) हो 4) फुस
42. दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.
त्याची गोष्ट लिहुन झाली.
1) प्रधान कर्तृक कर्मणी 2) शक्य कर्मणी
3) पुरुष कर्मणी 4) समापन कर्मणी
43. समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामूहिक स्वरुपाचे कार्य आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
1) समाजात परिवर्तन घडवून आणधे हे सामूहिक स्वरूपाचे कार्य नाही.
2) समाजात परिवर्तन पडवून आणणे हे वैयक्तीक स्वरूपाचे कार्य नाही.
3) समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामूहिक स्वरुपाचे कार्य आहे.
4) समाजात परिवर्तन घडू न देणे हे सामूहिक स्वरुपाचे कार्य आहे.
44. पुढील अर्थाचा योग्य वाक्प्रचार शोधा.
जेमतेम खाण्यास मिळणे.
1) हात टेकणे 2) हात धरणे
3) हातातोंडाशी गाठ पडणे 4) हाडाची काडे करणे.
45. विसंगत जोडी ओळखा.
1) हृदयाला भिडणारे – हृदयस्पर्शी
2) स्वतःशी केलेले भाषण – स्वगत
3) दोनदा जन्मलेला – दानशूर
4) मोजके असे बोलणारा – मितभावी
46. दिलेल्या जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.
1) गरज + अनुरुप = गरजेनुरुप
2) पुनर + आगमन = पुनश्चअवागमन
3) वन + औषधी = वनौषधी
4) दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी
47. पुढील पैकी कोणती विसंगत जोडी आहे.
1) पायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
2) कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराङमुख
3) कवितेची रचना करणारा – गीतकार
4) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
48. भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
1) माणूस राक्षसासारखा भित्रा असतो.
2) जो भितो व घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.
3) ब्रम्हराक्षसाला भिऊ नये.
4) भीती वाटते तेव्हा ब्रम्ह राक्षसाचा जप करावा.
49. पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
शाबास ! असेच यश पुढेही मिळव.
1)आश्चर्यदर्शक 2) हर्षदर्शक
3) संमतिदर्शक 4) प्रशंसादर्शक
50. मरावे ; परि कीर्ति रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी ओळखा.
1) किर्ती 2) रुपे 3) परि 4) उरावे
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
26 – 1, 27 – 2, 28 – 4, 29 – 3, 30 – 4, 31 – 2,
32 – 1, 33 – 3, 34 – 3, 35 – 2, 36 – 2, 37 – 3,
38 – 1, 39 – 4, 40 – 1, 41 – 2, 42 – 4, 43 – 2,
44 – 3, 45 – 3, 46 – 2, 47 – 3, 48 – 2, 49 – 4,
50 – 3