नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)

नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)

1) नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे होते. त्यांचे आडनाव मुरकुटे होते.
2) १८२२ मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना त्यांनी केली. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय मानसाने स्थापन केलेली ही पहिली शैक्षणिक संस्था होती. या संस्थेच्या माध्यमातून १८४८ मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुलिंची पहिली शाळा सुरु केली. (देशातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुणे येथे सुरु केली)
3) १८४५ मध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडीकल कॉलेजची स्थापना केली. याच कॉलेजमधून १८६१ पासून वैद्यकिय शिक्षण मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था केली.
4) १८४५ मध्ये शंकरसेठ यांनी स्टुडंट लिटररी ॲन्ड सायंटीफिक सोसायटीची स्थापना मुंबई येथे केली.
5) १८५० ते १८५६ या कालावधीत मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे नाना सदस्य होते.
6) नाना शंकरसेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून काम केले आहे.
7) नाना शंकरसेठ ब्रिटीश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते.
8) नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी एल्फिस्टन हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. तसेच आजचे मुंबईतील जे. जे. हॉस्पीटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले होते.
8) २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोशिएशन ही भारतातील पहिली राजकिय संघटना नाना जगन्नाथ शंकरसेठ व दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली.
9) १८५७ मध्ये शंकरसेठ यांनी दि जगन्नाथ शंकरसेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल स्थापन केले.
10) नाना जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे सदस्य होते.
11) नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचा मृत्यु ३१ जुलै १८६५ रोजी झाला.
12) मुंबईचा पहिला गव्हर्नर एल्फिस्टन हा होता. नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गर्व्हनर एल्फिस्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते.
13) मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही नानांचा सहभाग मोलाचा होता.
14) नाना जगन्नाथ शंकरसेठ यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात.
15) आचार्य अत्रे यांच्या मते नाना जगन्नाथ शंकरसेठ हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते.