Nobel prizes 2020 नोबेल पुरस्कार 2020

Nobel prizes 2020
नोबेल पुरस्कार 2020 

शांततेचा नोबेल पुरस्कार 2020
जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 2020 यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जागतिक अन्न कार्यक्रम ( वर्ल्ड फूड प्रोग्राम ) ( WFP – World Food Programme ) या संस्थेला देण्यात आला आहे.  जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य  परिस्थिती सुधारण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि युद्ध आणि संघर्षासाठी होत असलेला भुकेचा दुरुपयोग रोखण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी 2020 या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जागतिक अन्न कार्यक्रम या संस्थेला देण्यात आला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2020
ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन व अमेरिकन संशोधक हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस यांना 2020 या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. कॅन्सर आणि सिरोसिसला कारणीभूत ठरणाऱ्या हेपेटायसिस सी (Hepatitis C) या विषाणूचा शोध लावल्यामुळे वरील तीन संशोधकांना 2020 या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020
इमानुएल शॉपोंतिये (फ्रान्स) आणि जेनिफर ए डुडना (अमेरिका) या दोन महिला वैज्ञानिकांना 2020 यावर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. जीनोम एडिटिंगची एक पद्धत विकसित केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या संशोधनामुळे लाईफ सायन्स एका नव्या उंचीवर जाणार आहे.

भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार 2020
रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या तीन शास्रज्ञांना 2020 या वर्षीचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज यांनी ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्रामधील जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम केल आहे. रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेला अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला.

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020
पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना 2020 या वर्षाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑक्शन थिअरीमध्ये सुधारणा आणि ऑक्शन करण्याच्या नव्या पद्धतींचा शोध यासाठी त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2020
2020 यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लक यांना देण्यात आला आहे. लुईस ग्लक येल विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिक आहेत. त्यांच्या कविता बाल्यावस्था, कौटुंबिक जीवन, आई-वडील आणि भाऊ-बहिण यांच्या परस्पर संबंधांवर केंद्रीत असतात.

थोडक्यात माहिती
साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2020 – लुईस ग्लक

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020 – पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020 – रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020 – इमानुएल शॉपोंतिये आणि जेनिफर ए डुडना

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2020 – मायकल ह्यूटन, हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस

शांततेचा नोबेल पुरस्कार 2020 – जागतिक अन्न कार्यक्रम