मराठी भाषेचा उगम व विकास

मराठी भाषेचा उगम व विकास

भाषा : विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा होय.
भाषा हा शब्द भाष् या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे.
भाषेचे दोन प्रकार आहेत :
1) स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा
2) सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा

अभिजात भाषा : जी भाषा प्राचीन असते तसेच ज्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असते आणि ज्या भाषेमधील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असते तिला अभिजात भाषा असे म्हणतात.
भारत सरकारने अभिजात भाषेचे निकष पुढील प्रमाणे ठरवले आहेत.
1) भाषेचे वय सुमारे दीड हजार वर्षे ते अडीच हजार वर्षे असावे.
2) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे
3) भाषा प्राचीन असावी
4) भाषा साहित्य श्रेष्ठ असावी
5) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक स्वरूप यांचा गाभा समान असावा
भारतात पुढील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे : संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम व ओडिआ
संस्कृत भाषेपासून हिंदी, मराठी, गुजराती व बंगाली या भाषा निर्माण झाल्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही.

लिपी : भाषा ज्या खुणांच्या साह्याने लिहिली जाते त्याला लिपी असे म्हणतात.
लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ सारवणे किंवा रंगवणे असा आहे.
लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झाले आहे.

मराठी भाषेचा उगम व लिपी :
1) मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे.
2) मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे.
3) देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हणतात.
4) देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे.
5) देवनागरी लिपी लेखकाच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
6) संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती व पाली या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे.
7) संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे.
8) मराठी भाषेच्या एकूण 52 बोलीभाषा आहेत.
9) वराडी, हळबी, खानदेशी ( अहिराणी ), नागपुरी, डांगी, कोकणी
10) मराठी भाषेतील आद्य ( पहिला ) ग्रंथ विवेकसिंधु हा आहे.
11) विवेकसिंधु हा ग्रंथ अद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिला आहे.
12) मराठी साहित्यातील आद्यकवी मुकुंदराज आहेत.
13) आद्य कवी मुकुंदराज यांना मराठी साहित्यातील पहाटेचा शुक्रतारा असे म्हणतात.
14. गद्य स्वरूपात लिहिलेला मराठी भाषेतील पहिला ग्रंथ  लीळाचरित्र हा आहे.
15. लीळाचरित्र हा ग्रंथ म्हाईभट्ट यांनी लिहिला. लीळाचरित्र हा ग्रंथ महानुभव पंथाची संबंधित आहे.