OSCAR AWARDS / ACADEMY AWARDS

ऑस्कर पुरस्कार

अकॅडमी पुरस्कार

1. ऑस्कर पुरस्कारालाच अकॅडमी पुरस्कार असे सुद्धा म्हणतात.
2. ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रामधील जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे.

3. ऑस्कर पुरस्कार American Academy of Motion Pictures Arts and Science या संस्थेमार्फत दिला जातो.
4. ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रांमधील सर्वोत्तम दर्जाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना दिला जातो.

5. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात 1929 साली Douglas Fairbanks यांनी केली. पहिल्या ऑस्कर पुरस्काराचे आयोजन The Hollywood Roosevelt Hotel याठिकाणी केले होते.
6. ऑस्कर पुरस्कारांचे रेडिओवर पहिले प्रक्षेपण 1930 साली झाले, तर टिव्हीवर पहिले प्रक्षेपण 1953 साली झाले.

7. ऑस्कर पुरस्कार प्राप्त कलाकाराला सुवर्ण प्रतिमा मिळते तिला ” अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट “ असे म्हणतात.
8. सुरूवातीला ऑस्कर पुरस्कार 12 कॅटेगरीमध्ये दिला जात असे पण आता 2022 मध्ये हा पुरस्कार 17 कॅटेगरीमध्ये दिला जातो.

9. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवणारा अभिनेता एमिल जेनिंग्स आहे.
10. 2002 साली झालेल्या 74 व्या ऑस्कर पुरस्कार समारोहामध्ये सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ ॲनिमेटेड फिचर यासाठी पुरस्कार देण्यात आला.

11. ऑस्कर पुरस्कारांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रतिमेची उंची 13.5 इंच ( 34.3 सेमी ) असते, तर त्या प्रतिमेचे वजन 8.5 LB ( 3.856 Kg ) असते.
12. ऑस्कर पुरस्कार अमेरिका देशातील आहे.

13. 1957 सालापासून सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट या श्रेणीसाठी भारतीय चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवले जातात.
14. आतापर्यंत पुढील भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे – मदर इंडिया, सलाम बॉम्बे, लगान, श्वास ( मराठी चित्रपट ).

15. 2022 साली तमिळ चित्रपट “कूजांगल” ला भारताने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी पाठवले आहे.
16. 2022 साली 94 वे ऑस्कर पुरस्कार देण्यात आले.