सामान्य ज्ञान || General Knowledge सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर

सामान्य ज्ञान || General Knowledge
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर
शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर

परीक्षा दिनांक : 01 / 03 / 2020
———————————————————————–

1 ते 25 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत. 

२६. चलेजाव चळवळ, सन —— –या साली महात्मा गांधी यांनी सुरु केली.
१) सन १९४२ २) सन १९३० ३) सन १९१४ ४) सन १९४५
२७. भारतीय राष्ट्रिय काँग्रेसची स्थापना खालिलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ?
१) दिल्ली      २) पुणे           ३) लखनौ       ४) मुंबई
२८. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पहिली राजधानी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली?
१) प्रतापगड   २) रायगड    ३) राजगड    ४) शिवनेरी
२९. खालिलपैकी कोण प्रती सरकार या चळवळीशी संबंधित आहे.
१) बाळासाहेब खेर ज्ञज्ञ       २) क्रांतीसिंह नाना पाटील
३) पंडीत जवाहरलाल नेहरु ४) बाबू गेनू
३०. खालिलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते ?
१) कुंभी      २) वैनगंगा      ३) येरळा      ४) वैतरणा
३१. जांभा खडक कोणत्या जिह्यात सापडतो ?
१) लातूर     २) रत्नागिरी   ३) परभणी    ४) सोलापूर
३२. जिल्हा व थंड हवेची ठिकाणे, यातील चुकीची जोडी शोधा.
१) रायगड – माथेरान         २) सातारा – महाबळेश्वर
३) कोल्हापूर – पन्हाळा      ४) पुणे – तोरणमाळ
३३. खालिलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही.
१) झारखंड    २) त्रिपुरा    ३) मिझोराम    ४) मणिपूर
३४. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हटले जाते ?
१) डॉ.होमी भाभा                 २) डॉ.रघुनाथ माशेलकर
३) डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम ४) डॉ.हरगोविंद खुराणा
३५. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथ्रोब्मिन हे प्रथिन कोणत्या जीवनसत्त्वामुळे तयार होते ?
१) ए          २) बी           ३) डी           ४) के
३६ खालिलपैकी कोणता पर्याय धातू नाही.
१) पारा      २) सोडीयम  ३) अॅल्युमिनियम ४) लोह
३७. डॉ.विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा कोणता पहिला महासंगणक तयार करण्यात आला ?
१) करम    २) सी-डॅक   ३) पृथ्वी       ४) परम
३८. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
१) डॉ.राजेंद्रप्रसाद               २) महात्मा गांधी
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ४) सरदार वल्लभभाई पटेल
३९. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे ?
१) २८८         २) २५०         ३) ४८         ४) ४१५
४०. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालिलपैकी कोठे नाही ?
१) नागपूर    २) औरंगाबाद ३) पणजी    ४) पुणे
४१. उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची नियुक्ती खालिलपैकी कोण करते ?
१) संसद      २) पंतप्रधान  ३) राज्यपाल ४) राष्ट्रपती
४२. आयात  म्हणजे काय ?
१) परदेशागमन करणे        २) परदेशातून वस्तू आणणे
३) परदेशात वस्तू पाठविणे ४) परदेशात वस्तू निर्माण करणे
४३. भारतीय अर्थव्यवस्था खालिलपैकी कोणत्या घटकावर प्रामुख्याने अवलंबून आहे ?
१) व्यापार      २) उद्योग        ४) कृषि          ३) सेवा
४४. भारतीय पंचवार्षिक योजना केव्हा सुरु झाली ?
१) सन १९५१ २) सन १९४७ ३) सन १९५० ४) सन १९६०
४५. नुकताच श्री.अभिजित बॅनर्जी या भारतीय वंशाच्या व्यक्तीला खालिलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे ?
१) वैद्यकीय क्षेत्र २) शांतता ३) रसायनशास्त्र ४) अर्थशास्त्र
४६. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिला आहे ?
१) १८५७ चे स्वातंत्र्यसमर        २) हिंद स्वराज्य
३) शेतक-याचा आसुड             ४) माझे सत्याचे प्रयोग
४७. मराठी वृत्तपत्राचे जनक  ………‌  यांना म्हणतात.
१) आचार्य बाळशास्त्री जांभेकर २) जगन्नाथ शंकरशेठ
३) लोकहितवादी                      ४) विष्णुशास्त्री पंडित
४८. खालिलपैकी कोणत्या ठिकाणी भाषण करताना राजर्षि शाहु महाराजांनी अस्पृश्यांना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारण्याचे आवाहन केले ?
१) कुंभोज    २) बेळगाव    ३) पुणे    ४) माणगाव
४९. खालिलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन सभा ही संघटना स्थापन केली ?
१) डॉ.रा.गो.भांडारकर २) न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे
३) गोपाळ गणेश आगरकर ४) गोपाळ हरी देशमुख
५०. खालिलपैकी कोणती व्यक्ती  कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित नाही.
१) युवराज पाटील             २) खाशाबा जाधव
३) गणपतराव आंदळकर   ४) भाऊसाहेब पडसलगीकर

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे

26 – 1, 27 – 4, 28 – 3, 29 – 2, 30 – 1, 31-2, 32-4, 33 – 4, 34 – 3, 35 – 4, 36 – 2, 37 – 4, 38 – 3,
39 – 1, 40 – 4, 41- 4, 42 – 2, 43 – 3, 44 – 1,
45 – 4, 46 – 3, 47 – 1, 48 – 4, 49 – 2, 50 – 4