मराठी व्याकरण || Marathi Grammar सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर

मराठी व्याकरण || Marathi Grammar
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर
शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर
परीक्षा दिनांक : 01 / 03 / 2020
———————————————————————–

१. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?
१) २          २) १२          ३) ३४          ४) ४८
२. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
१) ओ        २) ई            ३) ऋ           ४) ज्ञ
३. पुनर्जन्म – या सदर शब्दाची संधी सोडवा.
१) पुन + जन्म              २) पुनर् + जन्म
३) पुन्ह + जन्म             ४) पुन्हा + जन्म
४. पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते ?
१) राजाराम २) सौंदर्य   ३) शहर        ४) नदी
५. पुढीलपैकी सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा.
१) मी शाळेत जातो            २) ताई अभ्यास करते.
३) शंकर खुर्चीवर बसला     ४) सानिका लवकर उठते.
६. पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी ओळखा.
१) विधुर – विधवा              २) बोका – भाटी
३) उंट – उंटणी                  ४) खोंड – कालवड
७. कर्तरी प्रयोगात कर्ता हा ………………
१) क्रियापदाच्या रुपावर अधिकार चालविणारा असतो.
२) कर्माच्या रुपावर अधिकार चालविणारा असतो.
३) तृतीयान्त असतो     ४) फक्त अनेकवचनीच असतो.
८. अरे व्वा! किती सुंदर हे फूल आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
१) विधानार्थी   २) प्रश्नार्थी   ३) उद्गारार्थी   ४) आज्ञार्थी
९. मी निबंध लिहीत असतो. या वाक्याचा काळ ओळखा.
१) अपूर्ण वर्तमानकाळ      २) रिती भूतकाळ
३) साधा वर्तमानकाळ       ४) रिती वर्तमानकाळ
१०. खालिल शब्दसमुहाबद्दल एक शब्द वापरा.
जुन्या रुढी व चालीरिती यांना अनुसरुन वागणारा.
१) सनातनी २) सुधारक ३) चालबध्द ४) यापैकी नाही.
११. पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा. : अश्व
१) भुजंग    २) फाल्गुन ३) घोडा       ४) सिंह
१२. पुढील शब्दासाठी विरुध्दार्थी शब्द शोधा. : अतिवृष्टी
१) सुकाळ २) अनासक्त ३) महापूर ४) अवर्षण
१३. कानावर हात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
१) माहित नसल्याचा बहाणा करणे  २) कानाखाली देणे
३) अगदी लक्षपूर्वक ऐकणे  ४) अतिशय आग्रह करणे
१४. उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ सांगा.
१) बुध्दीजीवी व्यक्ती फारच बोलतात.
२) अल्पज्ञानी मनुष्य बढाया मारतो.
३) कमी पाण्याचा जास्त आवाज येतो.
४) बुध्दीमान माणसे इतरांशी स्पर्धा करतात.
१५. खालिलपैकी जोडीने शब्द येणारा पर्याय निवडा.
१) कपडा – भांडी             २) खाणे – चालणे
३) गाडी – सायकल          ४) गुरे – ढोरे
१६. ‘ग्लोबल वार्मिंग’ – या शब्दास मराठी भाषेतील शब्द कोणता ?
१) जागतिक प्रदुषण          २) जागतिक पर्जन्यमान
३) जागतिक तापमानवाढ  ४) जागतिक शांतता
१७. पाहण्यासाठी जमलेले लोक – शब्दसमुहाबद्दल खालिलपैकी शब्द सांगा.
१) प्रेक्षक     २) श्रोते        ३) रसिक     ४) वक्ते
१८. खालिलपैकी चुकीचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा.
१) पानांची – सळसळ       २) वाघाची – डरकाळी
३) नाण्यांचा – खडकडाट  ४) पक्षांची – किलबिल
१९. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. : भीष्मप्रतिज्ञा
१) खोटी प्रतिज्ञा               २) जाहीर दवंडी
३) बढाई                         ४) खात्रीचे वचन
२०. खालिल पर्यायांपैकी अशुध्द शब्द ओळखा.
१) आशिर्वाद  २) विहीर    ३) सिंह      ४) प्रार्थना
२१. दिलेल्या म्हणीतील रिकाम्या जागा भरा. आवळा देऊन …………… काढणे.
१) रस         २) पैसा       ३) कोहळा  ४) गर
२२. अचुक जोडी ओळखा.
१) त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
२) नारायण सुर्याजीपंत ठोसर – संत तुकाराम
३) प्रल्हाद केशव अत्रे – कुसुमाग्रज
४) कृष्णाजी केशव दामले – केशवकुमार
२३. खालिलपैकी लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे ?
१) गीतारहस्य  २) ययाति  ३) स्मृतिचित्रे  ४) स्वामी
२४. खालिलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ?
१) पु.ल.देशपांडे              २) ना.धो.महानोर
३) वि.वा.शिरवाडकर       ४) प्र.के.अत्रे
२५. अव्ययीभाव, तत्पुरुष, व्दंव्द, बहुव्रीही, हे सर्व कशाचे प्रकार आहेत ?
१) केवल वाक्य २) वाक्यविचार ३) समास ४) पृथ्थकरण

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

उत्तरे

1 – 3, 2 – 1, 3 – 2, 4 – 2, 5 – 2, 6 – 3, 7 – 1, 8 – 3,
9 – 4, 10 – 1, 11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2,
15 – 4, 16 – 3, 17 – 1, 18 – 3, 19 – 4, 20 – 1,
21 – 3, 22 – 1, 23 – 1, 24 – 3, 25 – 3