अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर

अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, कोल्हापूर
शिपाई ( परिचर ) पदाचा पेपर
परीक्षा दिनांक : 01 / 03 / 2020
———————————————————————–
१ ते ५० पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

५१. जर ABC =६, BC = ५ तर A = ?
१) २          २) ३            ३) ४        ४) १
५२. ५,१५ व २५ या संख्यांची सरासरी किती ?
१) २५        २) १५         ३) ९         ४) ५
५३. (५ × ३) – (२ + ३) = ?
१) १०        २) ५           ३) १५       ४) २०
५४. ७२.३१४ x १००० = किती ?
१) ०.७२३१४  २) ०.०७२३१४  ३) ७२३१.४  ४) ७२३१४
५५. शिवपूर्वकालिन – या शब्दातील उजवीकडून दुस-या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते ?
१) पू             २) र्व                 ३) का           ४) ल
५६. गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.
पणजी, पाटणा, जयपूर
१) ग्वाल्हेर    २) गुरगाव          ३) लखनौ     ४) सुरत
५७. अक्षरांचे चार गट दिले आहेत. कोणते अक्षर फक्त एकाच गटात आहे ?
GVOPML  KPMOVB  BNGOKY  NGOVBK
१) G          २) M                 3) L            ४)N
प्रश्न क्रमांक ५८, ५९व ६० या प्रश्नात पहिल्या व दुस-या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसा संबंध तिस-या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणा-या पदाचा आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी सर्वांत योग्य पर्याय निवडा.
५८ लोकसभा – ५ वर्षे : : राज्यसभा – ?
१) ६ वर्षे     २) १० वर्षे         ३) ५ वर्षे      ४) २ वर्षे
५९. मोतिबिंदु – डोळा : : गलगंड – ?
१) कान      २) मेंदु               ३) गळा       ४) पोट
६०. १२५ – ३६ :: १००० – ?
१) ९२४     २) १२१              ३) ५३४       ४) ८१
६१. ३,७,१५,३१, ६३, —–?
१) १२६     २) १०९              ३) १२७       ४) ९४
६२. ११, १३, १७, १९, २३, —-?
१) २७       २) २८                ३) ३१         ४) २९
६३. काल पाऊस पडत होता. आज रविवार आहे.
ही दोन विधाने सत्य असतील तर, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर ठरेल.
१) आज पाऊस पडेल.        २) शनिवारी पाऊस पडला.
२) शुक्रवारी पाऊस नव्हता  ४) उद्याही पाऊस पडेल.
६४. एका सांकेतिक भाषेत करवत हा शब्द १२३४ असा आणि परखड हा शब्द ५२७८ असा लिहितात तर या भाषेत वरकड हा शब्द कसा लिहाल ?
१) ३२२८    २) ३२१८     ३) ३२८१      ४) ३१८२
६५. एका सांकेतिक भाषेत SCALE हा शब्द TDEMI असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ?
१) QSUAE २) QSUEA 3) QUSAE  ४) OSUAE
६६. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाटयाला गूळ म्हटले, गूळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालिलपैकी मानवनिर्मित वस्तू कोणती ?
१) आंबा     २) गूळ       ३) बटाटा       ४) गवत
६७. सुबोध हा अमोघ पेक्षा १० वर्षांनी मोठा आहे, १० वर्षानंतर त्यांचे एकूण वय ४० वर्षे असेल, तर सुबोधचे आजचे वय किती आहे ?
१) १५ वर्षे  २) २० वर्षे  ३) २४ वर्षे     ४) ३० वर्षे
६८. ३६१ हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ?
१) ११        २) १९       ३) २१           ४) २९
६९. पुढील पाच वाक्यांचा क्रम सुधारुन अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा.
१) शिक्षक कविता शिकवित होते.
२) वर्गात एकच हशा पिकला.
३) महेश मात्र पेंगत होता.
४) शेवटी तो घोरु लागला.
५) वर्ग रंगून गेला होता.
१) १, ३, ५, ४,२              २) १, ३, ४, २, ५
३) १, ५, ३, ४,२              ४) ५, १, २, ३, ४
७०. एका स्त्रीच्या फोटोकडे निर्देश करुन एक पुरुष म्हणाला, “तिचा पती माझ्या वडीलांचा एकुलता एक मुलगा आहे.” तर त्या पुरुषाचे फोटोतील स्त्रीशी कोणते नाते असेल ?
१) पती          २) दिर          ३) भाऊ       ४) मेव्हणा
७१. १३ जानेवारी, २००८ रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालिलपैकी कोणता वार ५३ वेळा आला आहे ?
१) रविवार   २) शुक्रवार   ३) सोमवार   ४) मंगळवार
७२. कोबी, गवार, पालक, मेथी, शेपू या भाज्यांची मोठी विक्री आज बाजारात झाली. या वाक्यात कोणती भाजी पालेभाजी नाही.
१) कोबी      २) गवार       ३) मेथी       ४) शेपू
७३. विजोड पद ओळखा.
१) निरामय  २) निरोगी   ३) निरुपद्रवी  ४) निकोप
७४. पुढीलपैकी कोणत्या वेळी घड्याळयाच्या दोन काट्यांमध्ये ९० अंश मापाचा कोन होतो ?
१) ६ : १५ वा. २) ३:०० वा. ३) ५:४५ वा. ४) ९:४५ वा.
७५. एका रांगेत अभिरामच्या पुढे २४ जण व मागे १५ जण आहेत. तर, ३५ व्या स्थानावर उभ्या असलेल्या केतकीच्या मागे किती जण आहेत ?
१) ९            २) ७             ३) ५             ४) ३

उत्तरे

51-4, 52-2, 53-1, 54-4, 55-3, 56-3, 57-3, 58-1, 59-3, 60-2, 61-3, 62-4, 63-2, 64-2, 65-1,66-1, 67-1, 68-2, 69-3, 70-1, 71-4, 72-2, 73-3, 74-2, 75-3.

2 COMMENTS

  1. हवं तर इमेजेस डिस्प्ले करा ..
    paper नाव आणि Link द्या DOWNLOAD ची

Comments are closed.