PHARMACY OFFICER QUESTION PAPER | MARATHI GRAMMAR

PHARMACY OFFICER QUESTION PAPER
औषध निर्माता अधिकारी प्रश्नपत्रिका
मराठी व्याकरण 15 प्रश्न
परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी 2021
————————————————–
1. खालील पर्यायांंमधील गुणविशेषण दर्शविणारे विधान कोणते ?
1) कडू कारले
2) दहा लिटर दूध
3) अर्धा मीटर कापड
4) पुष्कळ धान्य
2. शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते ?
1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
2) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
4) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
3. संयुक्त वाक्य ओळखा ?
1) लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात.
2) लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत
3) लोकांनी आपली स्तुती, निंदा करावी.
4) लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात.
4. खालील चिन्हांपैकी अर्धविराम चिन्ह ओळखा ?
1) ?
2) !
3) :
4) ;
5. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा.
केवढी शुभवार्ता आणलीस तू
1) ,
2) .
3) ?
4) !
6. कोटी + अवधी हा कोणत्या संधी युक्त शब्दाचा विरुद्ध आहे ?
1) कोट्यावधी
2) कोट्यवधी
3) कोट्यावधि
4) कोट्यवधि
7. पाण्याचा ……………….‌‌..
1) खळखळाट
2) गडगडाट
3) खणखणाट
4) छनछनाट
8. इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा ?
1) कामधेनू
2) चिंतामणी
3) देवगाय
4) कल्पवृक्ष
9. खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा.
चरख्याच्या साह्याने …….. कातून श्रम आणि कौशल्य यांचा त्यांनी मिळू साधला.
1) सूत
2) सुत
3) सुत्त
4) यापैकी नाही
10. ओढा या शब्दाचे लिंग ओळखा ?
1) पुल्लिंग
2) स्त्रीलिंग
3) नपुंसकलिंग
4) यापैकी नाही
11. सर्वनाम हे …………………..
1) पदार्थाचे नाव सांगते.
2) नामाबद्दल विशेष माहिती सांगते.
3) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते.
4) नामा ऐवजी येते.
12. उभयविध क्रियापद म्हणजे काय ?
1) दोन क्रियापदे एकत्र येतात.
2) वाक्यातील क्रियापद सकर्मक असते.
3) वाक्यातील क्रियापद अकर्मक असते.
4) क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते.
13. खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा.
1) माणूस
2) माणुसकी
3) माणसाळणे
4) माणूसपण
14. पावसासोबत गारा पडतील. या विधानातील काळ ओळखा.
1) रीती भविष्यकाळ
2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) संभवसूचक भविष्यकाळ
15. लिपी म्हणजे काय ?
1) लिंपणे म्हणजे लिपी
2) सारवणे म्हणजे लिपी
3) आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात
4) आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
1 – A, 2 – C, 3 – B, 4 – D, 5 – D, 6 – B, 7 – A, 8 – D,
9 – A, 10 – A, 11 – D, 12 – D, 13 – C, 14 – D,
15 – D