PM KISAN SANMAN NIDHI YOJNA पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

 पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

योजनेचा उद्देश :
अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.

पात्रता : दोन हेक्‍टरपर्यंत शेती असणारे अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेची सुरुवात : 24 फेब्रुवारी 2019
उत्तर प्रदेशात गोरखपूर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली.

योजनेचे स्वरुप : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या  अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जाते. हे सहा हजार रुपये एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

पहिला हप्ता : दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.
दुसरा हप्ता : दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत दिला जातो.
तिसरा हप्ता : दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :
१. सातबारा
२. आधार कार्ड
३. रहिवासी प्रमाणपत्र
४. बँक खाते

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज कोठे करावा :
१. https://www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येतो.
२. सामान्य सेवा केंद्र ( CSC ) वर जाऊन अर्ज करता येतो.
३. तलाठी किंवा महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी राज्य सरकारने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांकडे संपर्क करू शकता.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहावी :
१. www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे.
२. वरील वेबसाइटच्या मेनूबार वर शेतकरी कॉर्नर / किसान कॉर्नर वर क्लिक करावे.
३. लाभार्थ्यांची यादी आणि लाभार्थ्यांची स्थिती यावर क्लिक करावे.
४. त्यानंतर राज्याचे नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव, आपल्या तालुक्याचे नाव आणि आपल्या गावाचे नाव टाकावे.
५. वरील माहिती भरल्यानंतर अहवाल मिळवा या वर क्लिक करा. तुम्हाला लाभार्थ्यांची यादी मिळेल.

या योजनेची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

योजनेची अधिकृत वेबसाईट

1 COMMENT

Comments are closed.