PMC Clerk Paper 12 October 2022 First Shift

PUNE Mahanagarpalika Paper

PMC Clerk Paper

Exam Date – 12 / 10 / 2022

First Batch

1. खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाते ?
मध्य प्रदेश

2. छत्रपती संभाजी महाराज पुलाचे जुने नाव काय आहे ?
लकडी पूल

3. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
सोमेश्वरवाडी, पाषाण

4. पुणे शहर कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
मुळा व मुठा

5. पुणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ एकूण किती आहेत ?
21

6. सिरम इन्स्टिट्यूट पुण्याचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) कोण आहेत ?
आदर पूनावाला

7. फुलराणी टॉय ट्रेण पुणे शहरात कोणत्या उद्यानामध्ये आहे ?
पेशवे उद्यान, 1963 मध्ये सुरू झाली.

8. पुढीलपैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यात आहे ?
पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, पुणे शहर, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर.

9. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय सध्या दिल्ली येथे आहे पण त्याच्या आधी ते कोणत्या शहरात होते ?
सिमला ऑफिस, पुणे, 1928 साली सुरु झाले.

10. भाजे येथील लेणीमध्ये एकूण किती लेणी आहेत ?
22 लेणी, 21 विहार व 1 चैत्यगृह आहे. भाजे लेणी मावळ तालुक्यात लोहगड व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. भाजे लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहे.

11. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर

12. राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा करतात ?
31 ऑक्टोंबर, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस

13. पुढीलपैकी कोणत्या बँकेचे मुख्यालय पुणे शहरात आहे ?
कॉसमॉस बँक, स्थापना 1906

14. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत ?
सहा

15. राकेश झुनझुनवाला यांनी स्थापन केलेली एअरलाइन कंपनी कोणती आहे ?
आकाशा एअरलाइन