PMC PREVIOUS QUESTION PAPER MARATHI GRAMMAR

पुणे महानगरपालिका लिपिक प्रश्नपत्रिका

मराठी व्याकरण

परीक्षा दिनांक – 8 / 10 / 2016

1. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे ?
अ. त्यांनी आपली चूक कबूल केली – कर्मणी प्रयोग
ब. तो गाणे गातो – सकर्मक कर्तरी प्रयोग
क. शिपायाने चोरास पकडले – भावे प्रयोग
ड. विद्यार्थी बसतो – सकर्मक कर्तरी प्रयोग

2. मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ?
अ. कालवड
ब. मोरनी
क. लांडोर
ड. मोर

3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही ?
अ. तो खाली बसतो.
ब. पाणी पितो.
क. ती जेवण करते.
ड. तो पत्र लिहितो.

4. मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
अ. मासे
ब. माशे
क. मासू
ड. माशी

5. खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही ?
अ. अर्णव क्रिकेट खेळतो.
ब. केदार बसतो.
क. तृप्ती अभ्यास करते.
ड. भूमी रांगोळी बनवते.

6. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही ?
अ. पुस्तक
ब. फूल
क. घर
ड. सूर्य

7. वंद्य या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
योग्य पर्याय निवडा.
1. उदार, 2. कृतघ्न, 3. शत्रू, 4. विंद्य
अ. पर्याय 3
ब. पर्याय 1
क. पर्याय 4
ड. पर्याय 2

8. पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा.
अ. रामलक्ष्मण
ब. पद्मनाभ
क. महादेव
ड. भक्तिवश

9. खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत ?
1. ढग, 2. कनक, 3. घन, 4. सारंग
अ. पर्याय 2 व 4
ब. पर्याय 3 व 4
क. पर्याय 1 व 2
ड. पर्याय 1 व 3

10. खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यातील चुकीचा गट कोणता ?
अ. घागर, घट, हटके
ब. नाखुशी, नाराजी, अप्रसन्नता
3. मुख्य, प्रमुख, गौण
4. काळा, कृष्ण, श्याम

11. ( विशाखा ) विवाह पारंपरिक ( पद्धती ) झाला. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
अ. विशाखाच्या विवाह पारंपरिक पद्धतीचे झाला.
ब. विशाखाशी विवाह पारंपारिक पद्धतीनो झाला.
क. विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीला झाला.
ड. विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला.

12. खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यातील चुकीचा गट कोणता ?
अ. तेजी × मंदी
ब. प्रसारण × आकुंचन
क. आदर × अनादर
ड. स्वस्थ × महाग

13. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमांनुसार आहे ?
अ. भासा वृद्धीसाठी राष्ट्रातील सरव व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत.
ब. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातिल सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत.
क. भाषा वृधिसाठी राष्ट्रातील सर्व ववहार त्याच भाषेत झाले पाहिजेत.
ड. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत.

14. माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचे आहे ?
अ. विनायक दामोदर सावरकर
ब. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
क. भगत सिंह
ड. गणेश दामोदर सावरकर

15. पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ?
अ. बिनधोक
ब. आमरण
क. तोंडपाठ
ड. गैरहजर

16. तो आला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळातील रूप ओळखा.
अ. तो येतो.
ब. तो येत जाईल.
क. तो येत असेल.
ड. तो आला असेल.

17. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
तेथे मुले खेळतात.
अ. अन्य वचन
ब. द्विवचन
क. एकवचन
ड. अनेकवचन

18. खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा.
अ. मी लिहीत आहे.
ब. मी येणार आहे.
क. मी लिहिणार असतो.
ड. मी आलो.

19. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.
अ. हरी पुस्तक वाचतो.
ब. पोलिसांनी त्याला शोधून काढले.
क. हरीने पुस्तक वाचले.
ड. योगी तप आचरतो.

20. खालील वाक्यप्रकार ओळखा.
आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.
अ. मिश्र वाक्य
ब. केवलवाक्य.
क. उद्गारार्थी वाक्य.
ड. संयुक्त वाक्य.

शेवटचे 5 प्रश्न उताऱ्यावर आधारीत होते.