पोलीस भरती अभ्यासक्रम POLICE BHARTI SYLLABUS IN MARATHI

पोलीस भरती अभ्यासक्रम
POLICE BHARTI SYLLABUS IN MARATHI

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी चार विषयांवर प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात. सर्वात जास्त प्रश्न सामान्य ज्ञान या घटकावर विचारले जातात. कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारावेत याचे प्रमाण निश्चित नाही.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 100 प्रश्न विचारतात. 100 प्रश्नांपैकी साधारणतः 45 प्रश्न सामान्य ज्ञान या घटकावर विचारले जातात. मराठी व्याकरणावर साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. अंकगणित या विषयावर साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. बुध्दिमत्ता चाचणी या विषयावर सुध्दा साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.

सामान्य ज्ञान या घटकामध्ये पुढील विषयांवर प्रश्न विचारले जातात –

चालू घडामोडी : महाराष्ट्रातील, भारतील व जागतिक चालू घडामोडी. महाराष्ट्रातील चालू घडामोडी वर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.

इतिहास : भारताचा इतिहास ( विशेषत: आधुनिक भारताचा इतिहास ), महाराष्ट्राचा इतिहास.

भूगोल : महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल. सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोल वर विचारले जातात.

भारतीय राज्यघटना : राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था / न्यायमंडळ, नियंत्रक व महालेखापरीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, महान्यायवादी, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, घटनादुरुस्ती, पंचायत राज, मुलकी प्रशासन, पोलीस प्रशासन.

अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :
संख्यांची किंमत, संख्यांचा लहान मोठेपणा, विभाज्यतेच्या कसोट्या, संख्यांचे प्रकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, मसवि व लसावि, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, चलन, काळ, अंतर व वेग, काळ व काम, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, घतांक, बोट व प्रवाह, नळ व टाकी, भूमिती, महत्वमापन.

मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :
मराठी भाषेची उत्पत्ती व विकास, संत साहित्य, वर्णमाला, संधी,  लिंग, वचन, विभक्ती, शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, शब्दसिध्दी, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, समानार्थी शब्द, विरूध्दार्धी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, साहित्यिक व टोपननावे, ध्वनीदर्शक शब्द, अलंकार, वृत्त

बुध्दिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :
अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम.