Post office recruitment 2020 | exam pattern पोस्ट ऑफिस भरती 2020 | परीक्षेचे स्वरूप

Post office recruitment 2020 | exam pattern
पोस्ट ऑफिस भरती 2020 | परीक्षेचे स्वरूप

एकूण तीन पेपर होणार आहेत.

पेपर क्रमांक एकचे स्वरूप :
१) पहिला पेपर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट या स्वरूपाचा असणार आहे. या पेपर मध्ये जनरल नॉलेज, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या तीन विषयांंवर प्रश्न विचारले जाणार आहेत.
२) या पेपरमध्ये ऑब्जेक्टिव स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
३) पेपर एक 100 मार्कांचा असणार आहे.
४) पेपर एक यासाठी एकूण वेळ 90 मिनिटे आहे.
५) पेपर एक मराठी, इंग्लिश व हिंदी या भाषांमध्ये असणार आहे.

पेपर क्रमांक दोनचे स्वरूप :
१) पेपर क्रमांक दोन लोकल लॅंग्वेज टेस्ट म्हणजेच स्थानिक भाषा चाचणीशी संबंधित आहे.
२) पेपर क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणावर सर्व प्रश्न असतील.
३) हा पेपर दोन स्वरूपात होणार आहे. मराठी व्याकरणावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट या स्वरुपात असतील. मराठी व्याकरणावर डिस्क्रिप्शन स्वरूपाचे सुद्धा प्रश्न येणार आहेत. डिस्क्रिप्शन स्वरूपाचे प्रश्न पेन व पेपर चा वापर करून लिहायचे आहेत.
४) पेपर क्रमांक दोन एकूण 60 मार्कांचा असणार आहे.
५) पेपर क्रमांक दोनची एकूण वेळ 45 मिनिटे असणार आहे.

पेपर क्रमांक तीनचे स्वरूप :
१) पेपर क्रमांक 3 data entry skill test चा असणार आहे.
२) पेपर क्रमांक 3 ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या स्वरूपात होणार आहे.
३) पेपर क्रमांक 3 हा पेपर कॉम्प्युटर वर होणार आहे.
४) पेपर क्रमांक तीन एकूण 40 गुणांचा असणार आहे.
५) पेपर क्रमांक 3 ची एकूण वेळ 20 मिनिटे आहे.
६) पेपर क्रमांक 3 हा पेपर फक्त इंग्लिश भाषेमध्येच होणार आहे.

10 COMMENTS

Comments are closed.