Post office recruitment 2020 | syllabus in Marathi
पोस्ट ऑफिस भरती 2020 | अभ्यासक्रम
पेपर क्रमांक 1 : अभ्यासक्रम
पेपर क्रमांक एक मध्ये सामान्य ज्ञान ( 30 प्रश्न ), अंकगणित ( 40 प्रश्न ) व बुद्धिमत्ता चाचणी ( 30 प्रश्न ) या तीन विषयांवर एकूण शंभर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यांचा डिटेल्स अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे.
सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम :
१) भारताचा भूगोल
२) नागरिक शास्त्र / राज्यघटना
३) भारताचा इतिहास व संस्कृती
४) नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास ( Ethics and moral study )
५) चालू घडामोडी व सामान्य ज्ञान
वरील पाच घटकांवर प्रत्येकी चार ते आठ प्रश्न विचारले जाणार आहेत.
अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम :
१) पदावली
२) मूलभूत क्रिया : बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
३) शेकडेवारी
४) नफा व तोटा
५) सरळव्याज व चक्रवाढ व्याज
६) सरासरी
७) काळ व काम
८) काळ, अंतर व वेग
९) ऐकिक नियम ( unitary method )
वरील सर्व घटकांवर प्रत्येकी चार ते आठ प्रश्न विचारले जाणार आहेत.
बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम :
१) शाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी मधील सर्व प्रकरणे
२) अशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी मधील सर्व प्रकरणे
पेपर क्रमांक 2 : अभ्यासक्रम
पेपर क्रमांक दोन स्थानिक भाषा चाचणीशी संबंधित आहे. हा पेपर एकूण 60 मार्कांचा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी ही स्थानिक भाषा आहे. या पेपरचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१) इंग्लिश भाषेतील शब्दांचा अर्थ मराठी भाषेमध्ये सांगणे – 15 प्रश्न व 15 गुण
२) मराठी भाषेमधील शब्दांचा अर्थ इंग्लिश भाषेमध्ये सांगणे – 15 प्रश्न व 15 गुण
३) पत्रलेखन ( 80 ते 100 शब्द ). तीन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन – 15 गुण
४) निबंध लेखन किंवा पॅराग्राफ ( 80 ते 100 शब्द ). तीन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन – 15 गुण
पेपर क्रमांक ३ : अभ्यासक्रम
हा पेपर data entry skill याच्याशी संबंधित आहे. हा पेपर एकूण 40 गुणांचा आहे. हा पेपर फक्त इंग्लिश या भाषेमध्येच असणार आहे. या पेपरचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
Skill test of data entry for 20 minutes on computer.
Data entry of 2000 key depressions ( +/- 5% )
Thanks
Thanks
Mail gard chi exam kadhi kontya date la