PSI STI GUESS PAPER 1

PSI STI ASO GUESS PAPER 1
MPSC GROUP C GUESS PAPER 1

1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. विधेयकाचे दोन प्रकार असतात.
B. कोणत्याही विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये करण्याच्या पाच अवस्था आहेत.
C. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यास त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे

2. राज्यघटना दुरुस्त करण्याची तरतूद कोणत्या कलमा मध्ये आहे ?
1. कलम 370
2. कलम 368
3. कलम 358
4. कलम 360

3. राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. कलम 215 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद केलेली आहे.
B. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक संबंधित घटक राज्याचे राज्यपाल करतात
C. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B व C बरोबर आहेत
4. फक्त C बरोबर आहे

4. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
1. 1960
2. 1964
3. 1984
4. 1994

5. 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. कलम 148 नुसार भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.
B. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा कालावधी सहा वर्षे असतो.
C. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे असते.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे

6. भारतामध्ये सर्वप्रथम कोणती युरोपियन आले ?
1. इंग्रज
2. पोर्तुगीज
3. डच
4. फ्रेंच

7. भारतामध्ये गॉथिक स्थापत्यकलेची सुरुवात कोणी केली ?
1. इंग्रज
2. डच
3. पोर्तुगीज
4. फ्रेंच

8. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. डचांनी भारतातील पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली.
B. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1605 साली झाली.
C. इंग्रज व डच यांच्यात 1759 साली बेदराचे युद्ध झाले.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे

9. भूमार्गाने भारतामध्ये येणारा पहिला ब्रिटिश प्रवासी कोण ?
1. जॉन मिल्डेनहाल
2. वास्को दि गामा
3. कॅप्टन हॉकिन्स
4. थॉमस एडवर्ड

10. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
B. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यावेळी एलिझाबेथ टेलर प्रथम ही इंग्लंडची राणी होती.
C. इंग्लंडचा राजा जेम्स प्रथम यांनी 1615 साली ईस्ट इंडिया कंपनीला अनिश्चित काळासाठी व्यापाराचे अधिकार दिले.
1. फक्त A बरोबर आहे
2. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
3. फक्त C बरोबर आहे
4. फक्त B बरोबर आहे.

11. राज्य फुलपाखरू असा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1. गुजरात
2. मध्य प्रदेश
3. महाराष्ट्र
4. कर्नाटक

12. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. मुंबई या द्वैभाषिक राज्यात मराठी व गुजराती भाषिकांचा समावेश होता.
B. यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
C. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 106 हुतात्मे झाले.
1. फक्त A बरोबर आहे
2. फक्त B बरोबर आहे.
3. फक्त C बरोबर आहे
4. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.

13. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते ?
1. 26
2. 30
3. 36
4. 24

14. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे.
B. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे आठशे किलोमीटर आहे.
C. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण रुंदी सुमारे 620 किलोमीटर आहे.
1. फक्त A बरोबर आहे
2. फक्त A व B बरोबर आहे.
3. फक्त C बरोबर आहे
4. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.

15. महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूभाग व्यापलेला आहे ?
1. 9.26
2. 9.16
3. 9.36
4. 9.46

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3