Pune Mahanagarpalika Clerk Paper 10 October 22 Second Shift

PUNE Mahanagarpalika Paper

PMC Clerk Paper

Exam Date – 10 / 10 / 2022

Second Batch

1. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?
9.28 टक्के

2. पुणे शहरातील लाल महाल कोणी बांधला आहे ?
छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या आदेशानुसार दादोजी कोंडदेव यांनी बांधला.

3. महाराष्ट्राच्या विधानसभेची लोकसंख्या एकूण किती आहे ?
288

4. नरसोबाची वाडी कोणत्या तालुक्यात आहे ?
शिरोळ जिल्हा कोल्हापूर

5. गुढीपाडवा हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये साजरा करतात ?
चैत्र

6. रुपया हे चलन कोणत्या देशाचे आहे ?
भारत

7. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ?
आळंदी, इंद्रायणी नदीच्या तीरावर

8. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये आहे ?
पुणे, स्थापना 1960

9. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
शेखर कपूर

10. भारताचे 49 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
उदय ललित ( महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत )

11. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा ज्योतिबा फुले, 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे.

12. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने कोणते पदक जिंकली आहे ?
रौप्य पदक ( Silver Medal )