Pune Museums Stadiums Mahotsav

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

1. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांनी केले आहे.

2. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात 1953 साली झाली.

3. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन आर्य संगीत प्रसारक मंडळ ही संस्था करते.

4. पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ हा संगीत महोत्सव सुरू केला.

5. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दरवर्षी डिसेंबर  महिन्यामधील पहिल्या दोन आठवड्यांमध्ये आयोजित केला जातो.

6. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे या ठिकाणी केली जाते.

7. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव भारतीय शास्त्रीय संगीताशी संबंधित संगीत महोत्सव आहे.

8. सुरुवातीला या महोत्सवाचे नाव फक्त सवाई गंधर्व संगीत महोत्सव असे होते, परंतु आता या महोत्सवाचे नाव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असे आहे.

9. पंडित भीमसेन जोशी भारतीय शास्त्रीय संगीतामधील किराणा घराण्याशी संबंधित आहेत.

10. सध्या या महोत्सवाचे आयोजन पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा श्रीनिवास जोशी व श्रीकांत देशपांडे हे करतात.

वसंतोत्सव

1. वसंतोत्सवाचे आयोजन दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पुणे येथे केले जाते.

2. वसंतोत्सवाची सुरुवात राहुल देशपांडे यांनी केली.

3. वसंतोत्सवाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान या संस्थेमार्फत केले जाते.

4. वसंतोत्सवाची सुरुवात 1985 साली मुंबई या ठिकाणी झाली.

5. सध्या वसंतोत्सवाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे या ठिकाणी केले जाते.

6. नाना पाटेकर वसंतोत्सवाचे आधारस्तंभ आहेत.

7. राहुल देशपांडे यांचे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ वसंतोत्सव साजरा केला जातो.

8. वसंतराव देशपांडे भारतीय शास्त्रीय संगीत, ठुमरी या गायन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते तबला व हार्मोनियम सुद्धा वाजवत असत.

9. वसंतराव देशपांडे हे संगीतकार, गायक व नट होते.

10. कट्यार काळजात घुसली हे वसंतराव देशपांडे यांचे प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकामध्ये ते खान साहेब आहे ही भूमिका साकारत असत.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( FTII )

1. FTII ची स्थापना भारत सरकारने 1960 साली पुणे येथे केली.

2. FTII चे सध्याचे अध्यक्ष शेखर कपूर आहेत. ( ऑक्टोंबर 2022 )

3. FTII ही संस्था प्रभात स्टुडिओ ( Prabhat Film Company ) च्या जागेवर आहे.

4. प्रभात स्टुडिओची स्थापना 1929 साली कोल्हापूर या ठिकाणी झाली होती. 1933 साली प्रभात स्टुडिओ पुणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला.

5. FTII ची स्थापना 1960 साली झाली तेव्हा या संस्थेचे नाव Film Institute of India असे होते.

6. या संस्थेला 1971 साली Film and Television Institute of India असे नाव देण्यात आले.

7. FTII ही संस्था भारत सरकारच्या ministry of information and broadcasting या मंत्रालयांतर्गत येते.

8. FTII पुणे येथे 1974 सालापासून दूरदर्शन या वाहिनीसाठी कलाकारांना ट्रेनिंग देण्यास सुरुवात झाली. या अगोदर हे ट्रेनिंग दिल्ली येथे दिले जायचे.

9. FTII ही स्वायत्त संस्था आहे.

10. FTII मध्ये सुरुवातीला 5 कोर्सेस होते पण आता या संस्थेत 11 कोर्सेस चालतात.

11. FTII या संस्थेमध्ये प्रभात संग्रहालय, wisdom tree आहे.

पुण्यातील महत्त्वाचे स्टेडियम्स

1. पुण्यातील स्वारगेट मध्ये सारस बागेच्या जवळ जवाहरलाल नेहरू स्टेडियम आहे. या स्टेडियमवर पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत असत, पण आता होत नाहीत.

2. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कसबा पेठ या ठिकाणी आहे.

3. श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हाळुंगे रोड, बालेवाडी  या ठिकाणी आहे. या ठिकाणीच श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ आहे.

4. गहुंजे या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम ( MCA Stadium ) आहे. या स्टेडियमवर IPL चे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतात. या स्टेडियमला सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम सुद्धा म्हणतात.

5. TMGA – Tendulkar Middlesex Global Academy पुण्यात The Bishop’s School येथे आहे.
या ठिकाणी सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी नवीन क्रिकेटरला प्रशिक्षण देतात.

पुण्यातील संग्रहालये

1. महात्मा फुले वस्तू संग्रहालय :
अ. महात्मा फुले वस्तू संग्रहालयाचे आधीचे नाव लॉर्ड रे औद्योगिक हस्तकला वस्तुसंग्रहालय (लॉर्ड रे इंडस्ट्रियल क्राफ्ट्स म्युझियम) होते.
ब.  महात्मा फुले वस्तू संग्रहालय घोले रस्ता पुणे या ठिकाणी आहे.
क. या वस्तूसंग्रहालयाची स्थापना 1890 साली झाली. तेव्हा ते पुन्हा औद्योगिक संग्रहालय म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर या वस्तू संग्रहालयाला लॉर्ड रे संग्रहालय असे नाव दिले.
ड. 1968 साली या संग्रहालयाला महात्मा फुले वस्तू संग्रहालय असे नाव देण्यात आले.

2. केशवराव जगताप एरंडवणे अग्निशमन संग्रहालय
अ. हे भारतातील एकमेव अग्निशमन संग्रहालय आहे.
ब. एरंडवणे अग्निशमन संग्रहालयाची स्थापना 18 डिसेंबर 2016 रोजी झाली.
क. या अग्निशमन संग्रहालयाची संकल्पना सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी एल. एन. राऊत यांची आहे.

3. राजा दिनकर केळकर संग्रहालय
अ. संग्रहालय शुक्रवार पेठ, पुणे येथे आहे.
ब. केळकर संग्रहालयाची स्थापना डॉ दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी यांनी केली आहे.
क. केळकर संग्रहालयाची स्थापना 1920 साली झाली.
ड. कोथरूड येथील मस्तानी महाल केळकर संग्रहालयामध्ये आहे.
इ. राणी एलिझाबेथ यांनी सुद्धा केळकर संग्रहालयाचे कौतुक केले आहे.

4. पेशवे संग्रहालय
अ. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी १७९५ साली पर्वती टेकडीवर पेशव्यांचा राजवाडा बांधला.
ब. पेशवे संग्रहालय पर्वती टेकडीवर आहे.
क. पेशवे, मोगल व ब्रिटिशांच्या काळात वापरलेल्या नाणी व चलनांचा संग्रह या संग्रहालयामध्ये केलेला आहे.