ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न 40 Gramsevak Question Paper 2020 Part 3 रायगड ग्रामसेवक प्रश्नपत्रिका 2020 भाग 3

ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न 40
Gramsevak Question Paper 2020 Part 3
रायगड ग्रामसेवक प्रश्नपत्रिका 2020 भाग 3
परीक्षा दिनांक : 25 / 01 / 2020
———————————————————————
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

61. कोकण किनारपटटीस ……….. कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
A) ७२०     B) ५२०     C) ७८०     D) ६५०
62. डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय ……………. या ठिकाणी आहे.
A) रत्नागिरी                      B) चिपळूण
C) सावंतवाडी                   D) दापोली
63) भात, नागली, भूईमुग इत्यादी पिकांकरीता  ……………….  से.मी. खोलीवर मातीचा नमूना घेतला जातो.
A) ०५ ते १० B ) १० ते १५  C) १५ ते २० D) २० ते २५
64) भाताच्या …………. या जातीची शिफारस खार जामिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली
आहे.
A) जया     B) रत्ना     C) मसुरी     D) पनवेल-१
65) खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही.
A) चवळी    B) ताग    C) बरसीम    D) भूईमूग पेंड
66. खालीलपैकी कोणते सेद्रिय खत नाही.
A) कंपोस्ट B) शेणखत C) गोबरगॅस स्लरी D) धैंचा
67. खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही.
A) एस.एस.पी.            B) डीएपी
C) निमकोटेड युरिया    D) करंज पेंड
68. गांडुळाच्या …… जातीचा वापर गांडुळखत निर्मितीसाठी केला जातो.
A) आयसेनिया फेटीडा    B) आमोनिया फेटीडा
C) अल्जेरीयन गांडूळ     D) स्थानिक गांडुळ
69. खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त आहे.
A) म्युरेट ऑफ पोटॅश      B) रॉक फॉस्फेट
C) एस.एस.पी.              D) युरिया
70. १०:२०:२० हे– ——— प्रकारचे खत आहे.
A) नत्रयुक्त खत             B) स्फुरदयुक्त खत
C) संयुक्त खत               D) मिश्र खत
71. युरीया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण ……. टक्के असते.
A) ३६      B) ४०      C) ४६      (D) ५६
72. भाताच्या जया वाणाचा पिक कालावधी …………. दिवस आहे.
(A) ९० ते १००                  B) १०० ते ११०
(C) ११० ते १२०                D) १२५ ते १३०
73. भाताची खालीलपैकी कोणती जात गरव्या प्रकारची आहे.
A) कर्जत-१८४ B) रत्ना C) कर्जत-३ D) रत्नागिरी -२४
74. भात पिकाची खालीलपैकी कोणती संकरीत जात आहे.
A) जया      B) विक्रम   C) सहयाद्री   D) आर.पी. ४-१४
75. उती संवर्धनाव्दारे निवड केलेल्या नागली पिकाच्या वाणाचे नाव —- आहे.
A) नाचणी – १                 B) दापोली नं – २
C) दापोली – १                D) यापैकी नाही
76. “कोकण सदाबहार ही —- या पिकाची जात आहे.
A) चवळी    B) कुळीथ    C) तूर    D) उडिद
77. कोकणात भात पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमख पिक—
A) तूर      B) मिरची      C) कडवा वाल       D) कुळीथ
78. “कोकण ट्रॉम्बे टपोरा’ ही या पिकाची जात आहे.
A) वाल    B) चवळी     C) भूईमुग              D) उडिद
79. भात पिकावरील …….. ही प्रमुख किड आहे.
A) खोड किडा B) करपा C) उद्यवता D) तपकिरी ठिपके
80. पर्यावरणाच सतुलन राखून रोगांची/किडीची संख्या आर्थीक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यास अवलंबिलेल्या उपाययोजनेस ………. असे म्हणतात.
A) एकात्मिक खत व्यवस्थापन
B) एकात्मिक किड व्यवस्थापन
C) एकात्मिक रोग/किड व्यवस्थापन
D) यापैकी एकही नाही
81. खालीलपैकी ——– ही पेरु या पिकाची जात आहे
A) शुगर बेबी   B) सरदार   C) वेंगुर्ला-७  D) बाणवली
82. हापूस जातीच्या आंबा झांडाना ……… फलधारणा होत असते.
A) प्रतिवर्षी                           B) वर्षाआड
C) दोन वर्षाआड                   D) यापैकी नाही
83. हापूस जातीच्या आंबा झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी …………. या संजिवकाचा वापर केला जातो.
A)२-४-D                             B) अमोनियम क्लोराईड
C) पॅक्लोब्युट्रॉझॉल               D) यापैकी नाही
84. खालीलपैकी ……………..ही जात काजू पिकाची नाही.
A) वेगुर्ला-४ B) श्रीवर्धन रोठा C) वेंगुर्ला-७ D) वेंगुर्ला-१
85. फणस पिकाची “कोकण प्रॉलिफिक” ही अधिक उत्पन्न देणारी ………. फणसाची जात आहे.
A) बरका    B) सुगंधा    C) कापा    D) यापैकी नाही
86. जांभुळ पिकाची ———– ही जात अधिक उत्पन्न व मोठी फळे देते.
A) रत्ना B) कोकण बहाडोली C) जामून D) वेगुर्ला-४
87. करवंदामध्ये ——– जिवनसत्व विपूल असते.
A) “अ”     B) “ब”      C) “क”       D) “ड”
88. गुटी कलम पध्दतीने ——— या पिकाची अभिवृध्दी केली जाते.
A) आंबा   B) पेरू     C) केळी     D) काजू
89. नारळाची ———— ही संकरीत जात आहे.
A) बाणवली                       B) प्रताप
C) डी x टी – २                   D) लक्षब्दीप ऑडर्डीनरी
90. सुपारी झाडावर ————– या प्रमुख रोगाचा प्रादुर्भाव होतो.
A) कोळे रोग                 B) कडा करपा
C) पर्णगुच्छ                  D) यापैकी नाही
91. चिकूची ……….ही जात प्रसिध्द आहे.
A) घोलवड  B) वेगुर्ला  C) कालीपत्ती  D) बाणवली
92. ————– ही केळी पिकाची जात नाही.
A) हरिसाल B) श्रीमंती C) सफेद वेलची D) शुगर बेबी
93. ————– ही अधिक दूध देणारी संकरीत गाईची जात आहे.
A) गीर    B) रेड सिंधी    C) सहिवाल    D) जर्सी
94. गिरीराज कोंबडीची निर्मिती ………….. या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे.
A) बंगलोर  B) नागपूर  C) धारवाड  D) अकोला
95. जिताडा हा मासा सवयीने ———- आहे.
A) शाकाहारी B) मांसाहारी C) सर्वभक्षक D) यापैकी नाही
96. वांगी या भाजीपाल्याचे पिक ……हंगामात घेतले जाते.
A) खरीप      B) रब्बी        C) उन्हाळी    D) सर्व हंगामात
97. चंदन वृक्षाला वर्षातून ——– वेळा फुले येतात.
A) १            B) २             C) ३            D) ४
98. अति लघु पाणलोट——– हेक्टर क्षेत्रापर्यंत असतो.
A) १०         B) २०          C) ३०          D) ४०
99. “वनामती” प्रशिक्षण केंद्र ———– येथे आहे.
A) पुणे       B) मुंबई        C) नागपूर     D) कोल्हापूर
100. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ——– वर्गातील शेतकऱ्यांना विहिर व इतर बाबीचा लाभ दिला जातो.
A) सर्वसाधारण                B) अनुसुचित जाती
C) अनुसुचित जमाती        D) वरील सर्व

उत्तरे
61 – A, 62 – D, 63 – D, 64 – D, 65 – D, 66 – D,
67 – D, 68 – A, 69 – D, 70 – D, 71 – C, 72 – D,
73 – C, 74 – C, 75 – B, 76 – A, 77 – C, 78 – C,
79 – A, 80 – C, 81 – B, 82 – B, 83 – C, 84 – B,
85 – C, 86 – B, 87 – C, 88 – B, 89 – C, 90 – A,
91 – C, 92 – D, 93 – D, 94 – A, 95 – C, 96 – D,
97 – B, 98 – A, 99 – C, 100 – B